५-उलटे पडले फासे
५-उलटे पडले फासे

५-उलटे पडले फासे

उलटे पडले फासे
तीन मित्रांची कथामालिका
भाग-५
संतोषने बाईंकडे तक्रार केली.पण मनिषने राहूल माझ्यासोबत होता.त्याने असे काही केले नाही असे सांगून
राहूलला वाचवले.
(मनिष: अरे मित्र आहोत ना आम्ही. एकमेकांविरुद्ध कसे बोलणार?)
उलटे पडले फासे कथामालिका पुढे वाचा…
दिनांक
मी रोज दोघांनाही समजवतो.पण पालथ्या घडावर पाणी असा प्रकार होत आहे.
राहूलचे चोऱ्या करणे सुरुच आहे.त्याच्या जवळ सगळे असूनही तो चोऱ्या करतो हेही आश्चर्यच आहे.आणि मनिष कायम खोटे बोलून त्याला साथ देतो.
मनिषची आई शाळेत शिक्षिका आहे तरी हा असा का वागत असेल?
यांच्या  घरी कळले तर आईवडिलांना काय वाटेल हा विचार नसेल येत का?
(मनिष- तेव्हा नाही कळायचे काही.एकतर तुझ्याएवढी संवेदनशीलता नव्हती आमच्यात  आणि  तुझ्याएवढे प्रगल्भही नव्हतो आम्ही)
दिनांक 
उद्या परवा दोन दिवस सुट्ट्या आहेत.मनिष खूप दिवसांपासून मागे लागला माझ्या आणि राहूलच्या त्याच्या गावी चला म्हणून. मी बाबांची परवानगीही घेऊन ठेवली.उद्या जायचे म्हणतोय. मला फिरायला खूप आवडते पण मी जास्त कुठे फिरलो नाही.
आमच्याजवळ खूप पैसे नाहीत शिवाय बाबा सुट्ट्यांमध्ये पण अभ्यास करायला लावतात. ते म्हणतात अभ्यास केलेला कधी वाया जात नाही.
पण मी ठरवले,मोठा झालो कि मोठी गाडी घ्यायची आणि आजी,आईबाबा,विणाला घेऊन लांबदूर फिरायला जायचे.
किती छान दिवस असतील ते.
आजी राहली पाहिजे तोपर्यंत. आणि रमाही सोबत असेलच.तिची आठवण येत राहते.
(मनिष: भारी स्वप्ने होती तुझी.ती पूर्ण करायचे सोडून कुठे गेलास तू? आणि तुझे गुपित  रमाबद्दल कधी बोलला नाहीस तू. )
दिनांक
आज दुपारी मनिषच्या गावावरुन वापस आलो.गाव सुरेख आहे त्याचा माझ्या आजोळसारखा. सगळी छोटी छोटी घरे.झाडे आणि डोंगरांनी वेढलेले गाव. झूळुझूळु वाहणारी नदी,पक्ष्यांची किलबिल. खूप प्रसन्न वाटले तिथे.आज दुपारी परतलो मनिषच्या घरुन. घर छन आहे.छोटेसे,टूमदार.घरापुढे मोठे  वडाचे झाड आहे.त्याच्या पारंब्या पकडून खूप  झूललो आम्ही,मजा आली.
मनिषची आई किती प्रेमळ आहे.त्यांनी आम्हाला त्यांची शाळा पण दाखवली. शाळेत मुले त्यांच्याशी खूप आदराने वागत होती.मला खूपदा वाटले मनिषच्या आईला त्याच्या वाईट सवयीबद्दल सांगावे.पण नाही सांगू शकलो.
मी पहिला आलो म्हणून माझे खूप  कौतुक करत होत्या.आणि मनिषकडे लक्ष  ठेवत जा….वगैरे सांगत होत्या.
एका आदर्श शिक्षिकेचा मुलगा असूनही मनिष चोऱ्या करतो ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे.
(मनिषः आता ते सगळे आठवले कि मलाही लाज वाटते विनय.आईला तेव्हा समजले असते तर कोलमडून गेली असती ती.आधीच किती दुःखी होती. नशिबाने तिला कधी समजले नाही चोरीचे.
खरेच ही डायरी आमच्या हातात नसती पडली तर मी आणि राहूल कुठे राहिलो असतो.हा विचारही अस्वस्थ करतो.)
दिनांक
कमी मार्कस्  आणि नापास झाल्यामुळे राहूल आणि मनिष दोघेही थोडा थोडा  अभ्यास करायला लागले. चोरीची वाईट सवयही कमी झाली होती.चारपाच दिवसात  अजयच्या दफ्तरातील चाॕकलेटची चोरी केलीच पण राहूलने.दोन चाॕकलेटस् होत्या.राहूलने चोरुन एक स्वतः खाल्ली आणि एक मनिषला दिली.
माझे दोन्ही मित्र कधी सुधरणार देव जाणे.
(  आज सुधरलो आम्ही.तुला आमचा अभिमान वाटण्याइतपत सुधरलो.पण तू कुठे  आहेस मित्रा? )
दिनांक 
आज बाबांना पत्र पाठवले. मनिषच्या गावी गेलो होतो ,मजा आली,अभ्यास करतो,नीट जेवतो….वगैरे सांगितले.
विणा सातवीत आहे. तिलाही पुढे शिक्षणासाठी इथेच यायचे आहे. तिला डाॕक्टर बनायचे आहे.
बाबा म्हणतात मी चांगला शिकलो,अभ्यास केला तर ती पण करेल.
मी दादा आहो नं तिचा. ती अभ्यासात हूशार आहेच. चवथीत स्काॕलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिली आली होती.
मी पण सातवीच्या स्काॕलरशिपच्या परीक्षेत पहिला आलो होतो.
बाबांचे मित्र ,शेजारी,नातलग सगळे बाबांना म्हणतात.
‘मनोहरराव  पैशांची नसली तरी बुद्धीची श्रीमंती आहे तुमच्या घरात.’ बाबा पण मग अभिमानाने आमच्याकडे बघतात. आईबाबा,आजी सगळ्यांना आमच्या बुद्धीचे कौतुक  आहे.
( तेव्हा आम्ही दाखवत नव्हतो पण आम्हालाही तुझा,तुझ्या बुद्धीचा अभिमान वाटायचा.)
दिनांक 
मनिष आणि  राहूल खूप जवळचे वाटतात मला.जशी विणा वाटते तसेच. त्यांनीही खूप अभ्यास करावा.आणि मोठे  झाल्यावर अभिमानास्पद काहीतरी करावे.
त्यांच्या चोरीच्या सवयीचे घरी कळले तर आईवडील किती 
दुखावले जाणार.
मनिषच्या आईला तर मनिषशिवाय कोणीही नाही.
देवा,माझ्या मित्रांना सद्बुद्धी दे. 
(तुझ्या डायरीने दिली सद्बुद्धी)
Next Part
उलटे पडले फासे….कथामालिका कशी वाटत आहे….
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!