वृक्षवल्ली-लेख
वृक्षवल्ली-लेख

वृक्षवल्ली-लेख

वृक्षवल्ली-लेख

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…..!!!

“झाडे लावा झाडे जगवा” हे घोष वाक्य जाहिराती पुरते राहिले असे व्हायला नको त्याकरिता आपली वसुंधरा हिरवाईने नटून रहावी या करिता आता प्रयत्न होणे गरजेचे आहे.

करोना नामक भीषण महामारीत कितीतरी लोक प्राणवायू पुरवठा वेळीन न झाल्याने आपल्यातून निघून गेली आहेत. यावरुन लक्षात येत की, प्राणवायुचे महत्व या गोष्टीकडे बारकाईने पहाण्याची वेळ आता आली आहे.

आपल्या जीवनासाठी अमुल्य अशा प्राण वायुची निर्मिती या वृक्षवल्ली दिनरात कोणत्याही प्रकारची अपेक्षा नं ठेवता अविरत करीत असतात. आणि आपण मानव प्राणी शहरीकरणाच्या नावांखाली झपाट्याने जंगल नष्ट करीत आहोत.

जंगलतोडीमुळे एक गोष्ट लक्षात येते की, वन्यप्राण्यांची हक्काची रहाण्याच्या जागेवरच हल्ला केल्याने वन्य पशू रात्री बेरात्री शहरात आल्याची उदाहरणे आजकाल बघावयास मिळतात. त्यांचा काही दोष नसतांना भितीपोटी जनतेकडून मारहाण होवून दगावल्याची उदाहरणे बघावयास मिळतात.

शहरीकरणाच्या नावांखाली सिमेंटची जंगल उभी रहात आहेत. झाडांची कत्तल यामुळे पक्षांना आश्रय देणारे त्यांचे हक्काचे घर नष्ट झाले आहे.

रस्त्यावरुन उन्हातान्हात चालत असलेल्या वाटसरुंवर आईच्या पदरासारखी मायेची सावली धरणारा वृक्ष , त्याचवेळी अगणित पसरलेल्या फांद्यावर चिवचिवणा-या खगांचा व त्यांच्या लहानग्या पिलांचा आसरा बनतो.

दरवर्षी २१ मार्च आपण जागतिक वृक्षारोपण दिन म्हणून साजरा करीत असतो. त्या दिवशी विविध
संघटना मार्फत वृक्षारोपण केले जाते. हा एकच दिवस साजरा न करता वर्षभर हे कार्य सुरु ठेवले तर वृक्ष वाढीस चालना मिळेल व महत्व वाढेल. वृक्षारोपण केल्यावर असे निदर्शनास आले आहे की, काही अंशी लावलेली रोपे ही ब-याचदा पाण्या अभावी वाढ न होताच कोमेजून जातात. कारण वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते केले जाते. फोटो व सेल्फी व वेगवेगळ्या माध्यमांद्वारे बातम्या प्रसारीत होतात विषय येथेच संपतो. त्यांनंतर चुकूनही कोणी त्या रोपांना बघायला जात नाही त्यांचे संवर्धन केले जात नाही.

एक सांगावेस वाटते आपण सकाळी बरेच जण फिरायला जातो प्रत्येकाने एक लिटर , दोन लिटर पाणी सोबत नेलं आणि रोज एखाद्या रोपाला घातलं तर एखाद रोप जगवल्याच सत्कार्य आपल्या हातून निश्चितच घडू शकेल असं माझ मत आहे.

झाडांचे संवर्धन हे आपले आद्य कर्तव्य मानून समाजातील प्रत्येक व्यक्तीने जसे; आपण आपल्या कमावलेल्या मिळकतीतून आपल्या मुला-बाळां करिता, आपल्या भावी पिढी करिता गुंतवणूक करुन त्यांचे पुढील भविष्याचा विचार करतो त्याचप्रमाणे येणाऱ्या भावी पिढीसाठी झाडे लावण्याची गुंतवणूक करणे आपण आपले कर्तव्य समजायला हवे.

चला तर आता पावसाळा जवळ आलेला आहे आपण सर्वजण मिळून मनाशी अगदी पक्का निश्चय करु की, एक तरी रोप लावून मी त्यांचे संगोपन करणार. नक्कीच हा आपला खारीचा वाटा असेल पण थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे संगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच झाडांची संख्या वाढण्यास मदतच होईल.

वसुंधरेचे आपल्या मानवावर अगणित उपकार आहेत. जसे जन्मदात्री आईचे आपण उपकार फेडू शकत नाही तसेच काहीसे परुंतू या वसुधेने आपल्यावर केलेल्या मायेची काही अंशी जाण ठेवत आहोत हे समाधान नक्कीच मनाला आनंद देवून जाईल.
.शीला रंगारी

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

13 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!