जीवनगाणे भाग -२
जीवनगाणे भाग -२

जीवनगाणे भाग -२

जीवनगाणे

नमस्कार ,

मित्र मैत्रीणींनो आज योगा दिवस व  जागतिक  संगीत दिवसाच्या निमित्ताने आपल्या  दैनंदिन जीवनात योगाप्रमाणे संगीत देखील किती   महत्वाचे आहे हे मी माझ्या परीने आजच्या लेखात   मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 

मी सर्टीफाईड  मुझ्यिक थेरेपिस्ट आहे .पुण्याचे नामवंत  मुझ्यिक थेरेपिस्ट संतोष घाटपांडे सर यांच्याकडे या  विषयीच प्रशिक्षण घेतल आहे .मी आज थोडक्यात संगोतोपचारा विषयी सांगणार आहे .

संगीतोपचाराची व्याख्या 

” ठराविक संगीत ठराविक वेळी ठराविक काळापुरतं ऐकणे “. अशी सोपी आहे.

आपल्या शरीरातील सात चक्र व त्या चक्रांशी संबधीत आजारांवर त्या त्या चक्रांशी संबंधीत संगीतातील स्वरांच्या माध्यमातुन वैज्ञानिक दृष्टा अभ्यास करून वेगवेगळ्या आजारांवर संगीत आखल जातं. यात कंठसंगीत तसेच  वादय संगीताचा वापर किंवा उपयोग केला जातो . 

ही उपचार पद्धती शून्य वयोगट ते 100 वर्षाच्या वृद्धासाठी वापरता येते मुख्यत्वेकरून यात भारतीय शास्त्रीय संगीताचा उपयोग केला जातो . 

ही उपचार पद्धती रक्तदाब  , मधुमेह, थायरॉईड तसेच इतरही शारीरिक आणि मानसिक व्याधीवर परिणामकारक आहे . 

“याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत “ कारण आपण यात शरीरात कोणतेही औषध किंवा गोळी घेत नाहीत तर फक्त संगीत ऐकतो. 

आपल्या मनावरचा ताण हलका करणासाठी हे एक उत्तम साधन आहे . सध्याच्या पँडेमिकच्या काळात सर्वच जण ताण ग्रस्त आहेत  त्यामुळे संगीत ऐकणे हे गरजेचे आहे.

 ताणामुळे आपल्या शरीरावर बरेच प्रतिकूल परिणाम होतात त्यामुळे संगीतोपचाराच्या मदतीने आपण आपला ताण कमी करण्याचा प्रयत्न करूया आणि स्वतःसोबत इतरांपर्यंत सकारात्मकता पोहेचवण्याचा देखील प्रयत्न करूया .

 “यामुळे कोरोना बरा होत नाही कारण तो बाहेरून आलेला विषाणू आहे शरीरातील झालेला बदल नाही “. हो पण एकंदरीतच या आजारामुळे येणारा ताण आणि त्यामुळे कमी होणारी प्रतिकार शक्ती यावर संगीतोपचार १००टक्के प्रभावी आहे . 

आपण  जी गाणी ऐकतो किंवा दिवसभर रेडिओवर वेगवेगळी गाणी ऐकतो ते आपल्या आनंदासाठी हे उत्तमच आहे.पण त्याच्या Therapatic effect होत नाही . 

त्याच्या सोबतीने आपण हळूहळू  भारतीय शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात करायला हवी संगीताच्या मदतीने सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करूया .

आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात प्रचंड शक्ती आहे  आपण ती एकदातरी अनुभवली पाहिजे. संगीताच ज्ञान असेल तर उत्तमच पण नसेल तरी काही हरकत नाही आपल्याला फक्त हवी आहे ती यावरची श्रद्धा.

बहुतेक जणांच अस म्हणण असतं की आम्हाला शास्त्रीय संगीतामधलं काही कळत नाही मग आम्ही कस ऐकणार?पण  त्यासाठी संगीत कळायला हवं अस काहीच नाही. आपण बरेचदा चित्रप्रदर्शन बघायला जातो तेव्हा कुठे आपल्याला  चित्रातलं सगळचं कळत असतं फक्त आपण त्याचा आनंद घेत असतो अगदी तसचं आहे इथेसुद्धा.

संगीतामधील प्रत्येक वाद्यात , प्रत्येक सुरात माणसाला अंर्तबाह्य बदलण्याची ताकद आहे. मनावरचा ताण कमी करण्यासाठी संगीता ईतकं दुसरं कोणतही जालीम औषध शोधूनही सापडणार नाही.

गाण्यासोबत आपण जर योग अभ्यास केला तर दुग्धशर्करा योग जुळून येईल कारण गाणं म्हणत असताना देखील नकळत प्राणायाम घडत असतो  आपण श्वासावर नियंत्रण करायला शिकतो.

अधिक माहिती साठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे – 8591341433.

धन्यवाद.

 प्रतिमा कुलकर्णी – जोशी.

 या लेखाचा भाग १ पण तुम्ही नक्की वाचा आणि शेअर करा कारण संगीतोपचाराविषयी जागरूकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य हेतु आहे.

you can watch the video about music theropy on our shabdaparna you tube  channel

https://youtu.be/eRBqSNgyDDg

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णवर  इतर साहित्य वाचा पुढील लिंकवर
विविध सिनेमांचे समीक्षण वाचण्यासाठी खालील लिंक बघा.

https://marathi.shabdaparna.in/सिनेमा

https://marathi.shabdaparna.in/प्रेमकथा

शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

 

3 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!