Marathi article-आयुष्य म्हणजे
Marathi article-आयुष्य म्हणजे

Marathi article-आयुष्य म्हणजे

Marathi article-आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे नेमकं काय हो ? तुम्ही म्हणाल यात काय

अगदी सोप्पा प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे पण उत्तर थोडसं   अवघड आहे .

ते कसे काय ? अहो हीच तर खरी गंमत आहे ना आपल्या

जीवनाची. शाळेतल्या परीक्षेसारखं वास्तवातलं जीवन बहुधा

नसतं  त्यात थोडफार साम्य असू शकत पण ते प्रश्नांवर

अवलंबून असत.

परीक्षेत गणित चुकलं आणि स्टेप्स बरोबर असतील तर

स्टेप्सचे मार्क्स मिळतात पण आयुष्याचे गणित चुकले की

संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकतं. आयुष्य जगताना

नात्यांची गोळाबेरीज करता करता प्रेम , आपुलकी , कर्तव्ये

गुणता गुणता आपण त्यातुन स्वतःला कधी वजा करतो हेच

समजत नाही. आणि जेव्हा  हे लक्षात येतं कीआपण केलेल्या

गोळाबेरजेची किंमत तर शून्याहूनही कमी आहे मग वाटतं

आपल जगणं totally minus मध्येच आहे.

असेच दिवस , दिवसापाठोपाठ महिने ,महिन्यांपाठोपाठ वर्षही

सरतात पण हातात शेवटी काय तर  minus …. च……!

आता मात्र आपल्या मनानी ठरवलेलं असतं की या minus ला  घेऊनच जगूया पण आनंदाने कारण [ (-) (-)= + ].

हे आपलं परीक्षेतील गणिती समीकरण आयुष्याच्या परीक्षेत

तंतोतंत लागू पडत.मग खरचं आपण त्या minus ला आपल्या

Minus ची जोड देऊन plus करायची धडपड करायला लागतो

आणि बघता बघता आपल्याला ते छान जमायलाही लागतं

पण त्यासाठी आपण वापरलेल्या tricks and steps योग्य

असल्या पाहिजेत कारण आता जर  step चुकली तर परत

Minus व्हायला वेळ लागणार नाही.

मग अशा वेळी स्वतःलाच थोडासा वेळ देऊन शांतपणे ते

गणित सोडवायला घ्यायच आणि हळूहळू एक एक step

सोडवत जायची पण शेवटची step सोडवताना पुन्हा एकदा

तपासून बघायच की एखादा हातचा घ्यायचा विसरला तर

नाही ना ? मग काय finally problem is solved.

Because always minus  minus = + 

शाळेत असताना गणित हा विषय मला कधी आवडलाच नाही

पण आयुष्याची गणितं सोडवण आता हळूहळू जमायला लागलीत.

बघा तुम्हालासुद्धा नक्कीच जमेल. ( आणि नाहीच जमलं तर

माझ्यासारख्या गणिततज्ञाची मदत घ्या ना)

धन्यवाद !

: प्रतिमा कुलकर्णी – जोशी.

   

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

  

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!