हरवून गेल्या जाणिवा
दर्शना भुरे
७-हरवून गेल्या जाणिवा
वैकुंठा फणकाऱ्याने स्वयंपाकघरातून निघून गेली.
तशी इतका वेळ शांतपणे बसलेली नर्मदा आत्या तिच्या आईला म्हणाली,
विमल.. काही खरे नाही तुझ्या या लेकीचे .जरा काही मनाविरुद्ध घडले की रुसून बसते.लहान आहे तोवर ठीक आहे.मोठी झाल्यावर कसे व्हायचे?पोरीच्या जातीला असा एवढा राग,हट्टीपणा शोभत नाही विमल.
लहान आहे ग ..आक्का वैकुंठा अजून.. येईल हळूहळू समज तिला.घरात सगळ्यांची लाडकी आहे म्हणून तिचे शब्द झेलल्या जातात. मोठी होत जाईल तशी होईल समजदार.
तू नको काळजी करू.
पाठमोऱ्या जाणाऱ्या वैकुंठाला बघत रत्नाआत्या म्हणाली…
स्वयंपाकघरातून रागाने बाहेर पडत असताना वैकुंठाला
अंगणात बैलगाडी थांबल्याचा आवाज आला.
कोण आले हे पाहण्यासाठी ती तिकडे धावली तर…
गाडीतून एक बाई, एक माणूस आणि दोन मुली असे चौघेजण तिला खाली उतरताना दिसले.. त्या सर्वांचे दारा आडूनच ती बारीक निरीक्षण करु लागली..
बाई गोरी गोरी पान दिसत होती..केसांचा छान अंबाडा अन् त्यावर गजरा ..अंगावर भरगच्च काठ असलेले लाल पातळ .. लाल रंग तिच्यावर अगदी उठून दिसत होता..
तिच्या हातात सुबक नक्षीकाम केलेली एक पिशवी होती..
तिच्या सोबतच्या माणसाने डोक्यावर भरजरी फेटा लावून अंगावर पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केले होते. एका हाताने सारखा मिशीला पीळ देत दुसऱ्या हाताने धोतराचा काठ पकडून ठेवत उतावीळपणे इकडे तिकडे हिंडत कोणाला तरी शोधत होता..
त्याला सारखा..सारखा आपल्या मिशीला पीळ देत इकडे तिकडे हिंडताना पाहून तिला खूप हसू येत होते.
पण मोठ्या प्रयत्नाने ते दाबत ती
तिथे उभी होती..
या या पाहुणे वाटेने काही त्रास तर नाही झाला ना..
आबा समोर येत त्याची गळाभेट घेऊन म्हणाले,
आबाच्या आवाजाने तिचे कान एकदम टवकारले ..
म्हणजे आबा यांना चांगलेच ओळखतात तर..
पण कोण असावी बरे ही पाहुणे मंडळी?
आपण तर यांना या पूर्वी कधी पाहिल्यासारखेही वाटत नाही..
ती तिथेच ताटकळत उभी राहून त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करू लागली..
तिला तिथे उभे राहिलेले पाहून
त्या बाईने खुणेनेच जवळ बोलावून घेतले..
व आपले दोन्ही हात तिच्या गालावरून प्रेमाने फिरवले.
तिच्या वडिलांना विचारले,
हीच का तुमची वैकुंठा मधुकरराव?
किती मोठी झाली.. अगदी गोड दिसते आता..
तेव्हा आबा उत्तरले,
हो.. हीच आमची वैकुंठा.. आणि वैकुंठाला म्हणाले,
वैकु हे विनायक चे आई आप्पा आहेत बरं का? तू ओळखले का यांना..
आबाचे बोलणे ऐकून तिने ए गोंधळून , घरात बसलेल्या विनायककडे बघितले. हातवारे करत आश्चर्याने तिच्या आबाला म्हणाली,
काय? त्या विन्याचे आई आप्पा आहेत हे..
पण लगेच घाबरून आपण हे काय बोलून बसलो असे वाटून पटकन दाताखाली जीभ चावली.
आई ए आई बाहेर ये न बघ विनायकचे आई आप्पा आलेत.. अशा हाका मारतच आत पळाली.
तिला तसे घाबरून घरात पळालेले पाहून सर्वांना एकदम हसू फुटले.
खोडकरच आहे जरा पोरगी आमची..
असे म्हणत मधुकररावने नौकरांना आवाज देत पाहुण्यांचे सामान उतरून घेण्यास सांगून.. पाहुण्यांना घरात नेऊन हातपाय धुण्यासाठी पाणी दिले..
व त्यांच्या पत्नीला आवाज दिला. वैकुंठाची आई बाहेर येऊन विनायकच्या आईला आत घेऊन गेली.आणि स्वयंपाकघरात चहापाण्याची व्यवस्था करायला लागली.
विनायकच्या आई-सोबत गप्पा मारत बसले ..
पाहुण्यांसाठी वैकुंठाच्या हाती चहाचे कप देवून आई स्वतः नाश्त्याच्या प्लेट घेऊन बैठकीत आली.
वैकुंठा चहाचे कप घेऊन बैठकीत आली. तिला
विनायक त्याच्या आई आप्पा च्या बाजूला बसून काहीतरी बोलताना दिसला. वैकुंठाला तो त्याच्या आईला आपली चुगली करत आहे असे वाटले.
तिने मनाशी ठरवून टाकले
“मी आता यापुढे पुन्हा विनायकशी कधीही भांडणार नाही “
कथामालिका आवडत असल्यास नक्की सांगा
Previous part link
https://marathi.shabdaparna.in/६-
next part




छान लिहिले..
Wah chhan
छान कथा