८-हरवून गेल्या जाणिवा
बालविवाह
दर्शना भुरे
(प्रिय वाचक खरेदीसाठी आप्पा कुटूंबाला घेऊन तालुक्याच्या ठिकाणी निघाले…आता पुढे वाचा)
राधा आणि प्रमिला.. विनायकच्या दोन बहिणी… राधा विनायक पेक्षा वयाने मोठी..
राधा सात-आठ वर्षाची असताना तिचा बालविवाह गावातील नानासाहेब देशमुख यांचा थोरला मुलगा नागेशसोबत झाला..
राधा जाणती झाल्यानंतर पहिल्यांदाच सासरी नांदायला जाणार असल्याने राधाला आता सासरी पाठवण्याची तयारी सुरु होती..
लवकरच तिच्या सासरची मंडळी तिला न्यायला येईल..तेव्हा परत लवकर भेट होणार नाही म्हणून रत्नामामीने राधाला आणि नागेशला डोहाळेजेवणाच्या निमित्ताने बोलावून घेतले होते. वयात आलेली राधा आणि नागेश चोरुन एकमेकांकडे कटाक्ष टाकत होते.
वयात आल्यानंतर प्रथमच एकमेकांना बघत होते.एकमेकांकडे बघण्यात लज्जा,उत्सुकता,प्रेम दिसत होते.पाहूणे बरीच असल्यामुळे राधासोबत बोलण्याचे धैर्य नागेशला होत नव्हते.तो काळच तसा होता.सर्व जाणिवा लपवून जगण्याचा.एका गावात असूनही ते भेटत नव्हते.
धाकटी प्रमिला विनायक पेक्षा वयाने लहान. तिचेही लग्न जुळले बाजूच्या गावात जुळले होते.तिचे सासरही श्रीमंत होते.
प्रमिला जवळपास वैकुंठाच्याच वयाची.पहिल्या भेटीतच तिचे आणि वैकुंठाचे सुत जमले होते.
दोघी अगदी सोबत सोबत राहत होत्या..
आताही दोघी अंगणात भातुकलीचा खेळ मांडून बसल्या होत्या.
सकाळचे अकरा.. साडेअकरा वाजले होते..
आबासाहेब तालुक्याला निघण्याची घाई करत होते.. घरातील सर्व लोकांची चहा, नाश्ता, जेवणं आटपेपर्यंत
त्यांनी रामूकाकाला निरोप धाडून बैलगाड्या पण मागवून घेतल्या..
बैलगाड्या सज्ज झाल्या.
तालुक्याला खरेदीसाठी निघण्याची तयारी सुरु झाली.. .
आई, आबा , रत्नाआत्या, काका आणि काकी एवढे जण जाणार आणि बाकी मंडळी घरी थांबणार होती.. पण आईच्या आग्रहाखातर विनायकची आई पण सोबत निघाली..सोबत विनायक पण होताच.
तालुक्याला जायचे आणि ते ही बैलगाडीतून वैकुंठा तर खूप आनंदात होती. बैलगाडीतून फिरणे वैकुंठाला खूप आवडायचे.मुळात फिरणे हा तिचा आवडता विषय होता.
वैकुंठा तालुक्यातुन तिच्यासाठी काय काय विकत घ्यायचे याचा मनोमन विचारकरू लागली.. तिने प्रमिला सोबत बैलगाडीत बसण्यासाठी आधीच स्वतः ची जागा पटकावली.
एका गाडीत वैकुंठा, आई-आबा, आत्या आणि सोबत प्रमिला आणि दुसऱ्या गाडीत बाकीचे बसले.. तालुक्याकडे जाण्यासाठी प्रवास सुरू झाला.
लांबचा प्रवास असल्याने यायला उशीर होणार होता. संध्याकाळच्या जेवणाची सोय म्हणून लोणचे, दशमी, भाजी, चटणी वगैरे सोबत बांधून घेतली.
गप्पाटप्पा चालू असल्याने प्रवास रमत गमत सुरु झाला.वेळ कसा सरला कोणाच्याही लक्षात आले नाही..गाव आता कोस ..दिड कोसभर दूर राहिले होते.भिमाशंकराचे देऊळ मागे पडले आणि गाडी हिसके वचके खात डोंगर वाट पार करीत घाटातून उतरत होती.
हिसके बसत असले तरी डोंगरमाथ्यावरची वाट रम्य होती.
सूर्य डोक्यावर येवून एव्हाना उन्ह चांगलेच तापले होते.. मजल दरमजल करीत गाडी तालुक्याला पोहचली..
तोवर पोर तहान भुकेने व्याकुळले म्हणून मथुकाकीने म्हणजेच विनायकच्या आईने सोबत आणलेले लाहीपीठ पाण्यात कालवून पोरांना दिले.
पोर आनंदाने गप्पा मारत लाही पीठ खावू लागली.
प्रवासात विनायक आणि वैकुंठाचे एकदाही भांडण झाले नाही. दोघे एकमेकांशी चांगले बोलायला लागले.
हा विन्या मला वाटते तेवढा वाईट नाही…वैकुंठा मनातच पुटपुटली. आणि विनायक,प्रमिलासोबत गप्पा मारु लागली.
विनायक-वैकुंठाला एकत्र हसत खेळत बघून मधुकाकी त्याच्या आप्पा ला म्हणाली.
विनायक आणि वैकुंठाची जोडी कशी दिसेल?
दिसायला गोड आणि स्वभावाने लाघवी आहे पोर.मनानेही निर्मळ आहे.आपल्या ओळखीतील तोलामोलाचे घर आहे.तिच्यावर संस्कारही चांगले आहेत.
आप्पा म्हणाले, मधुकरराव तयार असतील तर वैकुंठा ला सूनबाई करून घ्यायला मी केव्हाही तयार आहे…
क्रमशः
वैकुंठा आणि विनायकचे लग्न होते का….वाचा पुढील भागात.
Previous Part
https://marathi.shabdaparna.in/७-हरवून-गेल्या
next part




छान लिहिले
Chan