२-हरवून गेल्या जाणिवा-marathi story
दर्शना भुरे
ओवीला जुन्याफोटोंचा अल्बमा सापडला.ओळखीच्या चेहऱ्यांमध्ये एक अनोळखी चेहरा दिसला.
सुधाला तो फोटो बघून वैकुंठाआजी,तिचे आयुष्य आठवत गेले
सुधा म्हणाली,ओवी खरचं काय योगायोग आहे न तू आज कपाट आवरायला घेतले आणि अल्बममधील फोटो पाहून मला वैकुंठाआजी आठवली.
पण मध्येच ओवीचे बाबा बाहेरुन आल्यामुळे त्यांना चहा करून देण्यासाठी उठावे लागल्याने दोघींचे बोलणे अर्धवट राहिले..
सुधाला उमरगावला बऱ्याच वर्षानंतर एका लग्नाला योग आला. तिला संपूर्ण गावाचा कायापालट झालेला दिसला..पूर्वीच्या आठवणी धूसर झाल्या होत्या तरी मनात कायम होत्या. त्या झुळझुळ वाहणाऱ्या नदीचे पात्र आटले होते त्यामुळे पूर्वी असणारी माणसांची नदीवरील गर्दी कमी झाल्याने नदीकाठी शांतता पसरली होती.
वैकुंठाआजीच्या जुन्या वाड्याचे रुपांतर आता मोठ्या इमारतीत झाले होते.. मोठ्याआईचा, वैकुंठाआजीचा ऐंशी वर्षापूर्वीचा जुना बालपणीचा काळ त्या इमारतीला बघून सुधाला आठवू लागला..तिच्या मोठीआई ने सांगितलेल्या एकुण एक आठवणी एखाद्या चित्रफितीप्रमाणे तिच्या नजरेसमोरून जावू लागल्या.
सुधाची मोठीआई उमरगावची ..एका लहानशा खेड्यातील.
लहानसे खेडे पण सुधाचे आवडते ठिकाण होते ते.
तिच्या लहानपणी मोठीआईसोबत उमरगावला जायला खूप आवडत असे.
तिथली झुळझुळ वाहत जाणारी नदी,आजूबाजूला असलेली डोंगरांची गर्दी,
व त्या सोबतच हिरव्यागार भरगच्च अशा झाडांवरून ऐकू येणारा पक्ष्यांचा सततचा चिवचिवाट मनला अगदी तृप्त करून जाई..
गावातील माती उडवणाऱ्या कच्च्या पायवाटेने जेव्हा गावातील मुली धुणे धुण्यासाठी नदीवरील जात तेव्हा सुधालाही त्यांच्या सोबत जावून नदीकाठच्या वाळूतून
शंख शिंपले गोळा करण्यात खूप मजा येई ..
एकंदरीत तेथील निसर्गरम्य वातावरणाची सुधाला भुरळ पडली होती..
मोठीआई तिला सांगत असे हल्लीच्य पिढीसारखे पूर्वी नसे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती..
तीन पिढ्या एकत्र गुण्यागोविंदाने नांदत.. पूर्वी घरातील वडीलधाऱ्या माणसाच्या शब्दाला खूप मानत.. आमच्या घरात मधुकर काका सर्वात मोठे.
घरातील सर्व कारभार ते सांभाळीत असले तरी मोठी बहीण नर्मदा च्या शब्दाबाहेर कधीही जात नसे.
त्या घराची मुखिया त्यांची बहिण म्हणजे आमची मोठी आत्या..नर्मदा आत्या होती. घरातील सर्व सुत्रे तिच्याच हाती होती आमच्या वडीलाची आई त्यांच्या लहानपणीच प्लेगच्या साथीत अडकून मरण पावली आणि लहान भावंडांना सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी नर्मदा आत्यावर येवून पडली..त्यामुळे तिने जन्मभर अविवाहित राहून लहान भावंडांना सांभाळण्याचा निर्णय घेतला…
नर्मदा आत्या खूप कडक शिस्तीची.. तिच्या तोंडुन निघालेला शब्द शेवटचा शब्द राहि.. तिने घेतलेला प्रत्येक निर्णय मग तो चांगला असो वा वाईट सर्वांना पाळावच लागे..
पूर्वीच्या काळी मुलींवर कडक नियम लादले जात.. मुलीच्या जातीने कस सतत विनम्र असावे, कोणाशी जास्त बोलू नये ,खाली मान घालून रहावे..मुलांपेक्षा कमी खावे,कमी शिकावे, उशिरापर्यंत झोपू नये,मुलांच्या बरोबरीने शिकू नये. त्यांच्या कपड्यालत्त्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत त्यांच्यावर बंधनेच बंधने लादली जात..अशा कडक बंधनाखाली व नर्मदा आत्याच्या शिस्तीत आम्ही मुले वाढत होते..मुले असल्याने नर्मदा आत्याचा फक्त आमच्या भावंडांवर जीव होता.. आम्हा मुलींना ती सतत परक्याचे धन म्हणून तिच्या शब्दांतून तिच्या वागणुकीतून दाखवून देई ..
घरातील मुलींवर लादलेले नियम त्या घरातील लागू होते.. पण आपल्याच घरात असे का? असे आम्ही आईला कधी विचारले तर जमीनदार घराणे आहे आपले एवढेच उत्तर ती द्यायची…
क्रमशः
प्रिय वाचक,कथामालिका कशी वाटत आहे? तुम्हीही तुमचे लिखाण शब्दपर्णवर पाठवू शकता.
पुढीलभागाची लिंक
https://marathi.shabdaparna.