४-हरवून गेल्या जाणिवा
दर्शना भुरे
वैकुंठाच्या सर्वात लहान आत्याला रत्नाला पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आणल्यावर लगेच सातव्या महिन्यातील डोहाळेजेवणाचा कार्यक्रमाचा बेत आखला.. त्यानुसार घरात सर्वांची धावपळ चालू होती.. रत्ना सर्व बहिण भावांत शेंडेफळ आणि त्यांच्या पिढीतील होणारे तिचे हे शेवटचेच बाळंतपण म्हणून या आपल्या लाडक्या शेंडेफळ बहिणीचे डोहाळे जेवण अगदी थाटामाटात पार पडावे असे तिच्या भावाच्या मधुकरच्या मनात होते.म्हणून
डोहाळे जेवणाचा सर्व खर्च मधुकरने स्वतः उचलायचे ठरवले.तो तयारीला लागला. ज्याची त्याची कामे त्याने वाटून दिली.
डोहाळे जेवणाचा कार्यक्रम शेतातील मोकळ्या व हवेशीर जागेत करण्याचे निश्चित केले सर्व पाहुणे मंडळी ना बोलावणे धाडले.
नर्मदा आत्या, आई आणि घरातील इतर बायका पाहुण्यांचे स्वागताचे ठरवत होत्या. स्वयंपाकघरात स्वयंपाक करता करता चर्चा करत होत्या.
रत्ना आत्या छोट्या वैकुंठाची नाराजी काढण्यात गुंतली होती.वैकुंठाला आबाने तिच्यासाठी काल जत्रेतून आणलेली नवीन बाहुली मैत्रिणींना
दाखवायला आताच बाहेर जायचे होते..पण कडाक्याचे ऊन तापल्याने तिला आताच घरातून बाहेर पडण्यास मनाई केली होती. त्यामुळे ती गाल फुगवून बसली होती.. तिला शेवंता आणि वंदनाला नवीन आणलेली बाहुली कधी दाखवू न कधी नाही असे झाले होते.. ती बाहुली त्यांना दाखवण्यासाठी ती अगदीच उतावीळ झाली होती.पण उन्हामुळे घरातच फुरगटून बसली होती. पण रत्नाआत्याच्या समजवण्यामुळे तीही पाहुणे येणार म्हणून त्यांच्या सरबराईत गुंतली….
वैकुंठाचा सारा दिवस तिच्या शेतकरी मैत्रिणींसोबत झाडांवरील चिंचा, बोरे तोडण्यात तर कधी भातुकलीच्या खेळात निघून जाई..
तिला भातुकली खेळायला खूप आवडत असे..
तिच्या भातुकली मध्ये तवा, पातेले,पोळपाट-लाटणे,चमचे…. इत्यादीपासून अजून कितीतरी मातीची भांडी सामील होती..शेतातील आखाड्यावर त्यांची भातुकली रंगत असे.. सर्व मुली मिळून ओढ्याकाठच्या काळ्या मातीपासून स्वतः च्या हाताने चूल बनवित आणि त्या चूलीवर झाडांच्या पानांची खोटी खोटी भाजी,पोळी रांधत.. भातुकलीच्या खेळातील बाहुला -बाहुली चे लग्न लावून त्यांचा छोटा दाटीमुटीचा संसार मांडीत..
वैकुंठाला बाहुल्यांची विशेष आवड असल्याने तिने
तिच्या कडे कापडा, प्लास्टिकच्या बऱ्याच बाहुल्या जमवल्या होत्या..
त्यांना ती जिवापाड जपत होती.. तिच्या या बाहुल्या तिचे संपूर्ण विश्व बनल्या होत्या.. त्यांना तिने वेगवेगळे नावेही दिली होती..
त्यांचे खोटे खोटे संसार थाटले होते.त्या खोट्या खोट्या संसारात ती रमून जात असे.
(भातुकलीच्या खेळात रमणाऱ्या वैकुंठाचा संसार कसा होता…..वाचत रहा पुढील भाग)
https://marathi.shabdaparna.in/५-हरवून
Chhan
छान कथा पण अजून शीर्षकाचा काही संदर्भ लागत नाहीये.
वैकुंठा नाव खूप आवडलं.