२-सुंदरा मनामध्ये भरली
२-सुंदरा मनामध्ये भरली

२-सुंदरा मनामध्ये भरली

सुंदरा मनामध्ये भरली
भाग-२

हिल्या भागात तुम्ही वाचले.अरविंद आणि जाईची पहिली भेट.पहिल्या भेटीतच अरविंदला जाईबद्दल सहानुभूती,जिव्हाळा वाटायला लागला.आजपर्यंत एकाही मुलीली आयुष्यात न येऊ देणारा अरविंद जाईला आयुष्यात स्थान देतो का?
ही सुंदरी त्याच्या मनात भरते का?
वाचा खालील भागात.

आज घरी गेल्यावर पडल्यापडल्याच डोळे केव्हा लागले ते कळलेच नाही. मध्येच मला जाग आली तो दिवा चालू होता मी उठून इकडे तिकडे पाहीले तो अरु खडूने जमिनीवर जाईचे चित्र काढत बसला होता . मला धक्का बसला. पाणी कुठेतरी मुरतंय हे लक्षात आलं.

मी उठून त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या केसावरून हात फिरवत गालातच हसले म्हणाले,

वेडाच आहेस तू आणि दिवा शांत केला.

पुन्हा डोळे मिटले दुसरे दिवशी सकाळी सात वाजताच जाग आली. अरु त्याचं सगळं आटोपून कामावर निघून गेला.

पाच वाजता येतो असं सांगून गेलेला अरु नऊ वाजले तरी येण्याचा पत्ता नव्हता. मी मात्र आज चतुर्थीनिमित्त हलवाई ला जाणे कबूल केले होते पण कशाचे काय शेवटी साडेनऊ वाजता दरवाजाची बेल वाजली.





मी दार उघडले तो अरू होता मी विचारले किती उशीर केलास? कुठे बाहेर गेला होतास का? हो जाई कडे, त्याने शांतपणाने उत्तर दिले.

काय ssss ? विजेचा धक्का लागल्यावर जीव तडफडतो त्या भरातच मी विचारले . अरे पण ती तर एक …….!
मला तिचे बद्दल फारसे बोलवलेच नाही.

होय, पण मी तिच्यावर प्रेम करायला लागलोय ग दीदी.
अरु, तू बावळट आहेस, नालायक आहेस, अविचारी आहेस.

मी वाटेल ते बोलण्यास सुरुवात केली तसा तो खालमानेने बोलू लागला.

तू हवं ते बोल पण दीदी न रहावून मी आज कालच्याच वेळी तिथे गेलो होतो आणि तिथे जाई आली अगदी कालच्याच वेशात.

पुन्हा तेच ….

अरे कल हमने पैसे मांगे तो आप चले गये l चलो आज सौ मे सौदा पक्का कर लेते है l चलो साहब चलो l

मी मात्र गोंधळून गेलो होतो. मी मुकाट मनानं तिच्यामागे गेलो . स्टार हॉटेलात . खुर्चीत बसल्यावर मध्येच माझ्यावर नजर टाकून डोळे फिरवत तिने विचारले…

क्या बात है साहब आप बहुत कम बोलते है l

तसं नाही. मेरा नाम अरविंद है हिंदी भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला आणि मग भितीला बाजूला सारून पुढाकार घेतला.

हे सांग जाई तू हे काम का करतेस ? शिवाय तुझे आई वडील?

क्या बात कर रहे हो आप साब l मेरे मा बाप तो मैने जिंदगी मे देखेच नही और रही बात काम की तो कुछ मजबुरीयाँ भी होती है ना साहब l

थोडे थांबून ती बोलायला लागली.

कोठे वाली बाई बोलती है कि तुम जब पाँच साल कि थी तब तुम्हारे मा बाप ने तुम्हे बेचा थाl

मी जोरात टेबलावर थाप मारली. कानावर हात ठेवला, ओरडलो.

बस.

मी पुढे बोललोच नाही मला सारं ऐकवेनासे झालं. माझा चेहरा उतरला .

जाने दो ना साहब l चलो काम की बात करे l

तिने आपले पाणावलेले डोळे रुमालाने टिपले . कंठात दाटलेले स्वर मुकाटपणानं विरून टाकले. या साऱ्या गोष्टीचा मला आश्चर्य वाटलं तितकीच कणव आली धाडस करून पुढे मी तिला म्हटलं,

जाई हे बघ तू ही सारी काम सोडून दे. मी तुला अगदी मनातून स्वीकारेल . आपण दोघं छानसं घर उभं करू . संसार फुलंवु. घर सजवू. मी स्वप्नात रंगून गेलो तसं तिनेच मला जागं केलं.

साहब ये आप किधर खो गये और साहब हमारी एक रेस की तरह जिंदगी होती है l जो जादा पैसा देगा उसे हम हात मिलाते है l आज तुम तो कल कोई और मर्द l आप ऐसा कीजिए एक अच्छी सी लडकी देख कर शादी किजिये l चाहो तो हम जरूर आपको बधाई देने आयेंगे l

आणि मी तिथून उठलो तो ते थेट घरीच . पण दीदी तिचं ते गोंडस नाव गोजिरे रूप ते मादक डोळे बोलण्यातील आर्तता या सर्वच गोष्टीवर मी भाळलोय.

मी मात्र चक्रावून गेले होते. दिवस कसे जात होते समजत नव्हते शिवाय मागील दोन दिवसात नवीनच जाई प्रकरण उभं राहिलं होतं.

या सर्व प्रकारानंतर परवाच्या दिवशी सकाळीच आपण काढता पाय घ्यावा या विचारात मी रात्र घालवली.

अरुची ही अवस्था मला बघवत नव्हती.

तो नीटसा झोपत नव्हता की बोलतही नव्हता त्याचा एकच पाढा
दीदी मला तिची कहाणी ऐकवत नाही ग .

अरु अरे मला पण तिची कहाणी भयानक वाटली पण तू त्या एका वेश्येला तुझी पत्नी म्हणून घरात आणणार ?
अरे इतर हजारो मुली सोडून तुला नेमकी तीच कशी रे आवडली ?

आपली संस्कृती समाज तिची पवित्रता या सर्व गोष्टीचा तू विचारच कसा रे करत नाहीस,

मी विरोध दर्शविला तसा तो म्हणाला,

ती ज्या समाजात वाढली त्याला कारण तिची परिस्थिती आहे तिचे आई-वडील आहेत लहानपणी तिला हे कळलं असतं तर ? म्हणून दोष तिचा नसून आई-वडिलांचा आहे त्याची शिक्षा का म्हणून भोगावी .

शिवाय माणूस हा परिस्थितीनुरुपच बदलत असतो. तशी बदलेल तीही.

अरुच्या जाई शी आता गाठी-भेटी चांगल्याच वाढल्या.एकमेकांना ती दोघ चांगली ओळखू लागली, समजू लागले होती.

आज अरु सकाळीच कामावर गेला तो आज ही नऊ वाजताच येणार होता पण दहा वाजले तरी त्याचा पत्ता नाही मी मात्र एकटी. जाम चिडले शेवटी कधी एकदा अंबाजोगाई गाठेल असं झालं होतं.

आजही अरु जाई कडेच गेला असावा हे निश्चित होतं. शेवटी दहा वाजता अरुने दरवाज्यावरची बेल वाजवली.
तसे मी तावातावानं मोठ्या स्वरात विचारलं’

कुठे गेला होतास मला एकटीला सोडून ? आणि पहाते तो काय अरू एकटा नसून जाई पण त्याच्या सोबतच होती .

विषेशतः तिने अबोली रंगाचा ब्लाऊज तसेच फिक्कट अबोली साडी जाईचा सुगंध पसरवणारा गजरा केसात माळलेला पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोल चुटुक टिकली लावलेली गळ्यात स्त्रीचे सौभाग्य मंगळसूत्र घातलेली जाई दारात त्याच्यासह पत्नीच्या रुपात उभी होती.

तिचे पहिले रूप आणि आताचे स्वरूप यात कमालीचे अंतर होते.

क्षणिक वाटले मी झोपेत तर नाही ना तेवढ्यात अरु स्मितहास्य करत म्हणाला दीदी देवळात गेलो होतो देवानं प्रसाद म्हणून हे जाईचे फूल पदरात टाकलंय .

जाईला जवळ घेत प्रसन्न मनानं हसला . लक्ष्मी पहिल्यांदाच घरात येते म्हणून मी औक्षणाचे ताट तयार करून आणलं . त्या दोघांनाही औक्षण केलं आणि माप ओलांडायला लावलं .

तरीही मला सत्य पचेना. सत्याचा भास वाटत होता. अरु आणि जाई कडे मी बघतच राहिले . अगदी शून्यातून निरुत्तरित नजरेने .

खरच माणसाला जीवनात हवं ते मिळाल्यावर तो किती सुखी समाधानी जीवन जगू शकतो याचं प्रात्यक्षिक मी पाहिलं होतं.

 


समाप्त

Previous Part

https://marathi.shabdaparna.in/१-सुंदरा

अरविंद-जाईची ही प्रेमकथा आवडल्यास comment मध्ये नक्की सांगा.

तुमची प्रतिक्रिया आम्हाला लेखनास प्रोत्साहन देते.
सौ. प्रिया (गोस्वामी ) देशपांडे

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!