Reunion
मराठी कथा
भाग-१
राधा चल आॕफिसमध्ये जाता जाता तुला सोडून देतो
कुठे रे?
अग,आज तुम्ही काॕलेजचे मित्रमंडळ भेटणार आहात नं
अरे ते संध्याकाळी.आताच जावून काय करु? एवढे पण तुझ्या लक्षात नाही
अरे यार या कामाच्या गडबडीत विसरुनच गेलो.आज एक रिपोर्ट सबमिट करायचा आहे.
असू दे.तुझे नेहमीचेच आहे हे.
बरं तू जा.येता येता मी घ्यायला येतो.
नको रे मी येईल एकटी.
तू जेवून ये येता येता
मी जेवूनच येईल पण सोबत येवू या नं आपण.तुझे आटोपले की call कर ना
okk
राधाला बाय म्हणून शालीन आॕफिसमध्ये गेला.
राधाने मोबाईलवर काॕलेजचा गृप उघडला.कोण कोण येणार चेक करु लागली.
श्रावण…त्याचे नाव नाही list मध्ये …असे पुटपुटत मैसेजेस वाचू लागली.
नव्यानेच गृप बनला होता. सगळे पुन्हा भेटणार म्हणून गृपचे नाव Reunion ठेवले.
जसे सवंगडी मिळतील तसे add करणे सुरु होते. जेवढे गृपमध्ये add झाले त्यांनी भेटायचे असे ठरले.
श्रावणचे नाव गृपमध्ये नाही म्हणजे तो अजून सापडला नसेल.हरवायची सवय आहेच त्याला….असे बोलत तिने मोबाईल बाजूला ठेवला.
रमाताई येऊन सगळी कामे करुन जायच्या.राधाचा जाॕब Online त्यामुळे दिवसभर ती घरीच असायची.
बँकेत मॕनेजर असलेला शालीन संध्याकाळी सात-आठ वाजेपर्यंत घरी यायचा. घरी येतायेताच तो थकून जायचा.राधाला संध्याकाळी शालीनसोबत बाहेर फिरायला जावे,एखादा सिनेमा बघावा असे वाटायचे पण शालीनला या गोष्टीत रस नव्हता.
राधा खूप मागे लागली तर तो एखादेवेळी तयार व्हायचा.
इतका कसा रे अरसिक आहेस तू?
राधाच्या या प्रश्नाचे काहीही उत्तर न देता केवळ हसायचा.
शालीन नावाप्रमाणेच शालीन असल्यामुळे राधा त्याला जास्त काही रागवायची नाही.
एकेकाळी कविता वाचनाची ,ऐकण्याची,नाटकांची,सिनेमाची आवड असलेली राधा आता शालीनच्या रंगात रंगली होती.
आज बाहेर जायचे म्हणून राधाने अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती.दूपार टळली.संपदाचा फोन आला.
झाली का ग तयार?
होतच आहे.
address पाठव.मी येते तुला घ्यायला.
राधाने संपदाला address पाठवला आणि तयारी करु लागली.
ती तयार झाली.सपदा आणि ती दोघीही क्लबमध्ये पोहचल्या.तिथेच सगळे भेटणार होते.
दोघी गळ्यात आधी पोहचल्या.
एकेकजण येत होते. सुवर्ण,जुही,आदित्य,हर्ष,मधूरा, आसीफ,रागिणी ….असे सगळे एकेक आले.
काॕलेजमध्ये जवळ असलेले पण मधल्या काळात दुरावलेले मित्र एकमेकांना बघून गहिवरले.
जुन्या आठवणी निघाल्या.सुवर्ण-मधूरा काॕलेजमध्ये फेमस असलेली जोडी सोबत आली.घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघांनी लग्न केले होते.
व्वा इश्क रंग लाया हर्षा सुवर्णची फिरकी घेत बोलला. नंतर बऱ्याच जोड्यांचा विषय निघाला. कुणाला कोण आवडायची….अशी बरीच सीक्रेटस् बाहेर पडायला लागली.
मधली एवढी वर्ष या एका भेटीने जणू पुसल्या गेली.
श्रावण नाही आला….मधूराने राधाकडे कटाक्ष टाकत विचारले.
तो श्रावणसर आहे.त्याच्या लहरीने वागणारा,मनमौजी वाटेल तेव्हा येईल आघृ वाटेल तेव्हा परतेल राधा बोलली.
कुठे असतो श्रावण सध्या? संपदाने विचारले.
माहित नाही.कुणी त्याच्या संपर्कात नाही.मी आहो रे…सुपर्ण बोलला.
सध्या तो अमेरिकेत आहे.इथे येऊन स्थायिक होण्याचा विचार करत आहे.
बोलता बोलता बराच वेळ झाला की.मला निघायला हवे.तिने मोबाईलकडे बघत म्हंटले.शालीनचे दोन मिस् काॕल होते.
संपदा निघायचे का?
चल निघूया.
संपदा राधाला तिच्या घरी सोडून पुढे निघाली.
काय ग मी किती काळजीत होतो. फोन तरीउचलायचा.
घरात येणाऱ्या राधाला शालीन बोलला.
अरे फोन सायलेंटवर होता.जेवला का तू?
येता येता आॕफिसच्या कँटीनमध्ये खाऊन आलो.
मी जरा आॕफिसचे काम करतो.
काय रे घरी पण आॕफिसचे काम आणतो तू
शालीनने काहीच न बोलता लॕपटाॕप सुरु केला.
राधा फ्रेश होऊन आली.काय माणूस आहे हा?ना कोण कोण भेटले ते विचारले ना उशीर का झाला ते…ती मनातच बोलली.
श्रावण…सुवर्णला माहीत आहे श्रावण कुठे आहे ते?विचारावे का त्याला?
नको…त्याला माहीत आहे सगळं
लग्न केले असेल का श्रावणने कि तसाच असेल आठवणीत?
आणि त्याच्या कविता…लिहित असेल का अजूनही….
शालीन आटोपले का काम…तिने बेडरुममधूनच विचारले.
नाही ग.
त्याला Goodnight म्हणून राधा झोपली.
पहाटे उठून तिने शालीनचा डब्बा बनवला.आज रमाताई येणार नव्हत्या.शालीन आॕफिसमध्ये गेला.लॕपटाॕप सुरु करण्याआधी whatsapp messages वरुन नजर फिरवली.
Reunion गृप
श्रावण ॲड झालेला दिसला.
तसाच दिसतोय…त्याने टाकलेले फोटो बघत ती पुटपुटली.
call करु का त्याला? नको तो मोह नको आता.
तिने आॕफिसचे काम सुरु केले.पण आॕफिसच्या कामात तिचे लक्ष लागत नव्हते.
Reunion च्या मैसेजेसकडे तिचे लक्ष होते.
मी गृपमध्ये आहे हे माहीत असेल का श्रावणला?
Good morning friends
श्रावणने मैसेज टाकला.
Good morning
राधाने टाईप केले.
तिच्या मोबाईलवर मैसेज आला
राधा कशी आहेस?
खूप दिवसानंतर श्रावणशी बोलायला मिळेल….या विचाराने राधाने त्याला call केला.
श्रावण
बोल sweetheart
राधा चूप होती.ह्दय धडधडत होते,मन अस्वस्थ होत होते.
मधली वर्ष जणू पुसल्या गेली.
कुठे आहेस राधा?
इथेच.
तू सोडून गेला तिथेच….ती मनात पुटपुटली.
मी परत येत आहो राधा….
क्रमशः
पुढील भाग वाचा खालील लिंकवर
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/





Apratim
छान कथा