हाफ तिकिट -भाग-२
ज्योती रामटेके
अरे गंगाराम… फिरु दे वैनीले. आतालोक लय कष्ट केले त्यायन. शेतात रामपारी जाऊन बकरीसाठी गवत आनन भाकर..तुकडा करून तुंगा घेउन वावरात जान..घरी आल का अजुन सैपाक. कटायल्या आता त्या.
अरे सखाराम.. तुय समद खरं हाये. केले तिन कष्ट पन समद तोंडान वाया घालवलं तिन. कोनाले बी घालुन..पाडुन बोलन.लगन नाई होत त आठ दिवसात अलग निंगा लागल मले. माया भेकाडपना पाहुन नीरा पोतीरा केला तिन माया. काई म्हटल का लेकरु घेऊन निंगाली माहेराले.मी नाक घासत जाईपर्यंत येत नोती. लेकरासाठी मले जा लागे. तुय अन माय लगन सारखच झाल.वैनीन कस बरोबर घर सांभाळल. कोनी दिसल का हासुन बोलन खुशाली विचारन. तुया वेनीले या गोष्टी कदी समजल्या नाई. सारे नातलग, लहानपणापासूनचे सवंगडी सबन तोडले तिन.
अरे बाबा मले समद माईत आहे गंगाराम. पन काय करत.
मले त लय भेव वाटते तुया घरी या चा.तुले रोज भेटासाठी पारावरच या लागते..तुया घरी आल का जीव धास्तीत रायते. वैनी कदी काय बोलन सांगता येत नाई बापा. आपले लगन झाले होते त्यावक्ताले आपल्या शेजारची सुला आली होती अन तु कवा आली व अस इचारल होत तवा वैनीनं पायल अन सार गाव जमा केलं वैनीन.अन लेकरु घेऊन माहेराले चालल्या गेल्या.अन पंधरा दिसानी बापाला सोबत आनल होत. काका भाऊ सबन आले होते.पोरीले समजाऊन सांगन दुरच पन तुलेच दम देऊन गेले.
हो सखाराम.तवापासुन गावातल्या बायाशी बोलन सोडुन देल. त्या सासुरवाशीन पोरी दोन दिसाले येत होत्या.लहानपनी संग.. मंग खेयलो आपन.मनुन वाटे दोन सबद बोलु.. खुशाली इचारु..कायच..काय..नीरा भांडन
एसटीची सवलत भेटली तवापासुन सलु..नलु लय येऊन रायल्या.दुरुन पायतो मी.. बोलता थोडीच येते. ते घरी नसली का नातवाला इचारते आबाजी.. सलुसंग बोलला काय मनुन…सांग आता..
तुयासोबत तरी कधी चांगली बोलली काय. तु लय समजदार आहेस म्हणून आपल नात टिकुन हाये.तिच्यासोबत कसा संसार केला हे मलेच माईत हाये.
त्या तुंग्यातल्या बाया लय भितात तिले. ते जस म्हनन तस करा लागते बायाले.सखु बुढी म्हनल का चिडीचूप होत्यात सारे. तिले फक्त तिच्या सुनेने थंड केल.एक वर्ष लय राबवल
आता बसते जराशी शांत.सुन तिच्यापेक्षा सव्वाशेर हाये.बचत गटासाठी खामगावच्या बॕकेत जाते. तिथं बी भांडन करते.घरी येता..येता एसटीत एक दोन भांडन करतेच.अरे त्या कंडक्टरले नाही सोडत.
वयाच्या मानान जरा समजदारी आनाले पाहिजे त आता घे थैला अन् जाय गावाले अस सुरु हाये. पावना दोन दिसाचा बरा रायते उठसुठ गेली का नाकातोंडात बसते. सगळ्याला आपला प्रपंच रायते.तिचे भाऊ..भावजया बी म्हतारे झाले आता. या वयात पडली.. झडली तर कोन करन तीच.अन मले किती काव आनन. अशा स्वभावापायी कोनी तिच्या जवळ येत नाई. दहशत हाये गावात तिची.एका पाहुन्याले खावु घालत नाही ते. त्या पाहुन्यादेखत भांडन करते अन
थैली घेऊन स्टॕडवर जाते.तुले त सबन माईत हाये.
बुढी फक्त टीव्ही समोर शांत बसुन रायते. तिच्या त्या दोन..तीन सिरीयल हायेत त्या त आमाले जबरदस्तीने पहा लागते.काय करत नाही तर भांडं होते.
समद आयुष्य असच गेल. लेकरासाठी सहन केल सार. घरी काय ताल चालु हाये माईत नाई. बबन्यान केला का नाई सैपाक समजुन नाई रायल.मले सुचत नाही आता अन बबन्या कटायला.
अरे गंगाराम बबन्या इकडे येऊन रायला.काय रे बबन्या काय म्हनत.
बाबा.. मी सैपाक करुन कावलो आता. या दोघी नीरा फिरत रायतात.या सरकारन बायाले अर्धी तिकीट केली. काऊन केली ते बी कोनाले समजुन नाही रायल. बाया लय फायदा घेउन रायल्या .निरा उठल्या का चालल्या खामगावले. तिथ बम साड्याचे सेल सुरु हाये.रातच्या हल्टींगन घरी येत्यात.
आपल्या गावातल्या अर्ध्या बाया खामगावले राहत्यात. सरकारन बायाले सवलत देऊन लय बेकार केल. आज सैपाकाचा कटाया आला मले.
सदा पिझ्झा खावुन रायला.मी बी पायतो खावुन कसा लागते त. तुम्ही खावुन पायता काय जरासा
हे पाय बबन्या.. मी ते काई खात नाई.मी मायासाठी शेवया उकळतो अन् खातो दुधासंग.चल घरी.
अरे सदा कावुन धावत येऊन रायला.
आबाजी..आबाजी.. चला घरी.. आजी आली. आई बी आली.संग अजुन दोन बुढ्या आनल्या.
एक आजीची
माय.. अन् एक माया आईची माय
बबन.. आपल काई खर नाई रे बाबा….
बाबा.. थांबा आता… लय झाल. आता सदाच्या आईची सटकच काढतो चांगली…. पाय बापा बबन्या काय करत त चला घराकड आता
क्रमशः
या आधीचा भाग वाचा खालील लिंकवर
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/








छान ..पुढील भागाची उत्सुकता
माय,,, काव आपला बाप्पा या हाफ टिकीट न….मस्त जमोली बैना
वर्हाडी शब्द भांडार विपुल दिसतोय.
गंमतीदार कथा