२- तृष्णा(प्रेमाची)
अमोलला परदेशात शिकायला जायचे आहे.पैशांची गरज आहे.वडिलांचे गावी असलेले घर विकून पैसे जमवायचे या हेतूने घर विकण्यासाठी अमोल गावी जातो.निसर्ग आणि फोटो,व्हिडियोची आवडा असणाऱ्या अमोलचा प्रवास रमणीय होतो….पुढे
काकाचा विश्वास अमोलवर बसेना.त्याने त्याच्या मालकाला आवाज दिला. अमोलने त्यांना कागदपत्रे दाखवली.घर अमोलच्या बाबांच्या नावावर होतेच. अमोलला त्यांनी power of attorney दिली होती.
त्यांनी काकाला अमोलसोबत घरात जायला सांगितले.जरा घर साफ करुन दे असेही सांगितले.
अमोलला काही गरज पडली तर आवाज दे असे बोलून ते निघून गेले.
विजय,काका आणि अमोल घरात गेले.
बावीस वर्षानंतर ते घर उघडल्या गेले. सगळीकडे धूळ,कोळीष्टिके होती.
काकांनी ह्या दोघांना बाहेर थांबायला सांगितले आणि एका तासात जरा साफसफाई करुन बाहेर आले.
जा साहेब आता आत.
अमोल,विजय आत गेले.
घरात कुबट वास होताच.पण मघापेक्षा आता जरा बरे वाटत होते.
अमोलने विजयला मी जरावेळ थांबतो इथेच असे सांगून त्याला जायला सांगितले. अमोल आता एकटाच होता.
मुंबईला फ्लॕटमध्ये राहत असलेल्या अमोलला हे घर एकदम प्रशस्त वाटले. घराच्या मागे पुढे अंगण.घरातच एक झोपाळा होता. भिंतीवर दोन,तीन पेंटींग्ज लावून होते.
एक छोटा पाळणा दिसत होता.कुणाचा असेल हा पाळणा?
माझा?
पण आई तर म्हणाली कि मी कधी इथे आलोच नाही.
कोणी भाडेकरु ठेवले असेल का बाबांनी?
तो जरा पुढे गेला डाव्या हाताला किचन होते.तिथे ओट्यावर गंजलेली शेगडी आणि काही भांडी पडून होती.
स्टीलचा हंडा होता. भिंतीवर पांढऱ्या टाईल्स होत्या.
बाजूला बेडरुम होती.तिथे स्त्रीचे जीर्ण झालेले कपडे होते.कपाट होते.
भिंतीवर काही कविता फ्रेम करुन लावल्या होत्या.
बहूतेक त्या स्त्रीच्याच असणार.
कविता अतिशय सुंदर शब्दात बांधलेल्या आणि अर्थपूर्ण होत्या.अमोल दुसऱ्या बेडरुममध्ये गेला.तिथे छोट्या बाळाची एक दोन खेळणी पडून होती.
तिथेही भिंतीवर कविता फ्रेम करुन होत्या.सगळ्या कविता बाळ आणि आईवर होत्या.कविता वाचून अमोलला पटकन आईची आठवण आली.
तो परत हाॕलमध्ये आला.
एका लाकडी टेबलवर त्याची नजर गेली. टेबलवर काही नव्हते . एक मोठा ड्राॕवर होता.थोडा उघडा असलेला.
अमोलने जवळ जाऊन बघितले.
ओ…तो ओरडला.
त्याला प्रचंड आवडत असलेला व्हिडिओ कॕमेरा होता तिथे.
त्याने खूप प्रयत्न करुन ड्राॕवर उघडला.
दूपार टळून गेली होती. विजय बाहेरुनच त्याला आवाज देत होता.
अमोलचे जेवणही राहले होते.
त्याने तो व्हिडिओ कॕमेरा सोबत घेतला आणि बाहेर येऊन बाजूच्या काकाला आवाज दिला.
कोणी घरासाठी गिऱ्हाईक असतील तर बघा असे सांगून विजयसोबत हाॕटेलमध्ये परतला.
जे हाॕटेलमध्ये होते खाल्ले .विजय परत गेला आणि अमोल रुममध्ये गेला.
आधी आईसोबत बोलला. अमोली घरी नव्हती. बाबा आॕफिसमध्ये होते.आई त्याला काळजी घे.नीट जेव अशा सुचना पुन्हा पुन्हा देत होती.
अमोल थकला होता.आईसोबत बोलला आणि झोपला.
तो उठला तेव्हा संध्याकाळ झाली होती तो गावात जरा फेरफटका मारायला निघाला..मुंबईच्या तुलनेत खूप छोटे असलेले हे गाव ,तिथली शांतता त्याला आवडली.
छोटे रस्ते,कमी वाहतूक, लोकांच्या गरजा कमी म्हणून दुकाने कमी संख्येत. या सगळ्या गोष्टींमुळे गावाला नेटके स्वरुप प्राप्त झालेले.
फिरताफिरता आठ वाजायला आले.गाव आता जवळपास शांत झाले होते.दुकाने बंद,रस्ते सामसूम.अमोलही हाॕटेलकडे परतला. हाॕटेलमालकालाही त्याने घरासाठी गिऱ्हाईक बघायला सांगितले.
दुपारी उशिरा खाल्ल्यामुळे त्याला आता भूक नव्हती,रुममध्ये एवढ्या लवकर जाऊन काय करायचे म्हणून तिथेच हाॕटेलच्या बाहेर खूर्ची टाकून बसला. मुक्ताला फोन लावला,आज दिवसभरात तिच्यासोबत बोलताच आले नाही.
ती नेहमीसारखी तू इथेच एमबीए कर.मला सोडून जाऊ नकोस वगैरे बोलायला लागली.
तिच्याशी बोलत असतांनाच हाॕटेल मालक बाहेर आला.त्याला हाॕटेल बंद करुन जायचे होते.
अमोलला आता रुममध्ये जाण्यावाचून पर्याय नव्हता.
तो फोनवर बोलत बोलतच रुममध्ये गेला.मुक्ताला दिवसभर काय झाले,ते घर,तिथे कोणी स्त्री राहायची ते,तिच्या कविता हे सगळे सांगून फोन ठेवला.
दुपारी झोपल्यामुळे आता लवकर झोप येणे अशक्य होते.
त्याने त्या घरुन आणलेला कॕमेरा काढला.
किती वर्ष बंद आहे कोण जाणे
सुरु असेल का
असा विचार करत त्याने कॕमेरा कव्हरमधून बाहेर काढला.
सुरु करण्याचा प्रयत्न केला.चार्जिंगवर लावला.
कॕमेरासोबत त्याला सहा सात व्हिडिओ कॕसेटसही दिसल्या.
काय असेल यात?कॕसेटस् बघून अमोलची उत्सुकता ताणली जात होती.त्याने मुंबईवरुन येतांना आणलेला व्हिडीओ कॕमेरा काढला.आणि त्यात एक नंबर लिहून असलेली कॕसेट टाकली. नशीबाने कॕसेट सुरु झाली.
सुरुवातीला जरा खरखर झाली.चित्र थोडे धूसर दिसत होते.पण एकंदरीत ठीकच होती कॕसेट.
एक देखणी तरुणी स्क्रीनवर आली. हिरवी साडी,हातभर बांगड्या,गळ्यात मंगळसुत्र,हाताला पुसटशी मेंदी.नवीन लग्न नववधू वाटत होती.घर तेच जिथे अमोल आज जावून आला होता.
अमोल कॕमेरा लॕपटाॕपला जोडत होता.तो जोडता जोडताच मंजूळ आवाज कानी पडला.
क्रमशः
Previous part link
कॕमेरामधील मंजूळ आवाज कुणाचा आहे…पुढील भाग अवश्य वाचा.
शब्दपर्णवरील वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या कथामालिकांच्या लिंक पुढे दिल्या आहेत.
आभास हा छळतो मला
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
सुंदरा मनामध्ये भरली
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.





Khup chhan katha
छान गूढ कथा
पुढची उत्सुकता ताणल्या गेली आहे