विजय मातृत्वाचा-मराठी लघूकथा
भैरवी आज ..सकाळ पासूनच खूप बेचैन होती …तिचे मन ..आशा आणि निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत होते .. त्याला कारण ही तसेच होते …
भैरवी आणि सागरच्या लग्नाला पाच वर्ष होउन गेली होती .. पण अजून दोघेही बाळाच्या प्रतीक्षेत होते …..
ही एक गोष्ट सोडली तर बाकी ..कशाचेही काहीच कमी नव्हते त्यांच्या जीवनात.
दोघेही उच्चशिक्षित असून नोकरी करणारे होते ….
पण म्हणतात ना …ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात नसतात ..त्यालाच आपण खूप महत्त्व देत असतो …तसेच काहीसे भैरवीचे झाले होते .. ती दिवसेंदिवस उदास रहायला लागली …तिची ही उदासी सागरला पहावेना …शेवटी दोघांनी मुल दत्तक घ्यायचे ठरवले …सगळे सोपस्कार पूर्ण करुन झाले होते ..आता बाळ ..घरी घेऊन जा …या पत्राच्या प्रतीक्षेत .दोघे जण होते ..
त्यात दोन ..तीन ..दिवसांपासून .भैरवीला ..बरे पण वाटत नव्हते .. आपल्याला बाळाचा काहीच अनुभव नाही ..त्या दडपणामुळे .असे होत असावे असे तिला वाटले ..पण ..सागराच्या आग्रहाखातर ते दोघे दवाखान्यात गेले … आणि काही टेस्ट करून घरी आले ….
संध्याकाळी …पोस्टमन ने …एक पत्र तिच्या हातात दिले ….ती ते फोडणार ..तेवढ्यात गेट चा आवाज आला ..म्हणुन ती बघायला गेली …सागरच्या पण हातात ..एक पाकीट होते…
दोघांनी ते आपापले ..एकदमच .उघडायचे ठरवले …
तिच्या लिफाफ्यात …बाळं आपण उद्या ..घेऊन जाऊ शकता ..अशा आशयाचा मजकूर ..तर …त्याच्या पाकीटात ..
ती आई होणार … Pregnancy test is positive ..
असा रिजल्ट …
शेवटी काय ..तसे बघितले तर ..दोन्ही कागदाचेच तुकडे ..
पण ..त्यासाठी ..किती किती प्रतीक्षा करावी लागली होती …
दोघांच्याही डोळ्यातून…अश्रुंच्या धारा ..वाहू लागल्या …
एक कागदाचा तुकडा ..दोघांच्याही जीवनात ..किती आनंद घेऊन आला ….एका कागदाच्या तुकड्याने ..
शेवटी ..मातृत्वाचा विजय केला होता.
.…….वैशाली जोशी खोडवे……..
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा








छान
छान लघुकथा
अलक
आई होणे ही सगळ्यात मोठी आणि छान ओळख असते स्त्रियांची.
छान
छानच लिहिले …
छान
Chan