केंद्रीय विद्यालय, अजनी, नागपूर
नमस्कार, मी शाल्की शिंदे
‘कोरोना टाळेबंदी’, खरं सांगायचं तर आता हा शब्द सुद्धा सर्वांना नकोसा झालाय. कारण यामुळे सर्वांचे नुकसानच झालेले आहे. पण अगदीच खरं सांगू काय, आम्हा लहान मुलांचे जग ना फार वेगळे असते बुवा. खरं तर हे सगळं वाईट झालं होतं. पण आम्हाला सुट्ट्या लागतो तसा आनंद झाला होता. हळूहळू सगळं बंद झालं. आणि बघता बघता आमची शाळा पण.मग काय मज्जाच मज्जा. शाळेचा गणवेश नको, पायात मोठे बूट नको, भलं मोठ दप्पर नको आणि दिवसभर शाळेमध्ये टांगून राहणे नको. अशा एक ना अनेक गोष्टी शाळा बंद झाल्यामुळे घडून आल्या. आणि मग सुरू झाली आमची ‘ऑनलाईन ‘शाळा. सुरुवातीला याच फार कौतुक वाटल आम्हाला सगळ्यांना.कोणी झोपून, कोणी लोळत तर कुणी नावापुरता क्लास करू लागले पण हळूहळू आमचं वर्ष संपलं. मी आठवीतून नववीत गेले. मैत्रिणी, खेळ, शिक्षकांची आपुलकी या सर्व गोष्टी हळूहळू लोप पावल्या. आणि बघता बघता दुसरं वर्ष पण असंच जाते की काय याची भीती वाटायला लागली. परंतु आता आमची शाळा परत सुरु झालेली आहे. अर्थातच ज्यांची मर्जी असेल त्यांनीच शाळेत यावं असं फर्मान काढले बुवा.
मला चित्रकलेची प्रचंड आवड आहे. माझे स्वतःचे यूट्यूब चैनल आहे. Shalki zs असं नाव असलेलं आणि मला जो काही घरी राहून वेळ मिळाला त्या वेळेत मी अनेक माझे ड्रॉइंग चे व्हिडिओ तयार केले. तसेच युट्यूब वर व्हिडिओ बघून मी जपानी भाषा देखील शिकले आणि हॊ माझ्या आई सोबत मी स्वयंपाक, बागकाम, आणि घरातील इतर छोटी-मोठी कामे पण करायला शिकले. माझी आई पण एक कलाकार व वरिष्ठ महाविद्यालयाला प्राध्यापिका आहे, त्यामुळे तिने या काळात मला बरेचसे कलागुण शिकविले. आणि वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे शिकवलं. अर्थात आमच्यावर पण आर्थिक संकट कोसळलं होतंच पण माझी आई धीराची, तिने माझ्या सांगण्यावरून पेंटिंग तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आणि कसे तरी आम्ही दोन वर्ष वाईट परिस्थितीला तोंड देत गेलो.
ऑनलाइन शाळेत मी अनेक समस्या बघितल्या ,
या सर्व परिस्थितीतून माझे गुण मी कमी होऊ दिले नाही व माझा अभ्यास सुरु ठेवला. आपल्यावर आलेल्या संकटाचा आत्मविश्वासाने सामना करायचा, हेच यातून कळलं, विस्कळीत झालेली परिस्थिती पुन्हा एकदा सुरळीत होईल, अशी आशा करूया, धन्यवाद!
(मित्रांनो Shabdaparna.in वर येणाऱ्या पुढील स्पर्धांमध्ये अवश्य भाग घ्या. तुमचे मराठी,हिंदी,English साहित्य तुम्ही शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.






