संदेसे आते है, हमे तडपाते है*
*चिठ्ठी आती है के पुछे जाती है*
*घर कब आओगे लिखो कब आओगे*
*कहो कब आओगे के तुम बिन ये घर सुना सुना है*
भारतीय जवान , निसर्गाच्या सानिद्ध्यात , डोंगरदर्याच्या पायथ्याशी अविरत लढतात ते सिमेवर …..
म्हणुन वरील गीताच्या ओळी नुसार …….
संदेसे आते है ……
आग्रहपूर्वक केविलवाणी विचारणा केली जाते.
त्या विचारणेमुळे त्याचे हृदयद्रावक मन कुजलेल्या छता प्रमाणे गळायला लागते. विनवणीपर प्रश्नार्थक विधानाने सारखे मन हळहळते…… कारण तुझ्या विरहात घर अंगण सारखे स्तब्धच….
नखशिखांत श्रृंगारलेली प्रियसी बाह्य तथा आंतरमनातून व्यथा मांडल्याचे कळते. कधी काजळी नयनांचे भाव तर कधी तिच्या गजर्याचा सुगंध त्याच्या मनाला दरवळून जातो. ती त्याच्या मिलनाला नेहमीच आतुरलेली आणि एकटीच स्वत: मध्येच रममाण झालेली….. कारण तुझ्या वाचून माझं मन नेहमी एकटंच उदासीन आहे, तुझं आलिंगन , तुझा स्पर्श अगदी नव्याने अनुभवावा इतकं…..
गावातील आमराईने सुद्धा कळकळून विचारणा केली. गावाकडील संपूर्ण निसर्गानेही इच्छा व्यक्त केली, पुन्हा-पुन्हा भेटण्याची विनवणी केली.
घरचे अंगण, आईच्या सावलीचा पदर, वेदनेची कळवळ, तिच्या थांबवण्याची धडपड…..
तो मुक्तपणे वाहणाऱ्या वाऱ्याला विनवणी करतो , माझं थोडं ओझं वाहुन नेणार का ? माझ्या गावी जाऊन मित्र सवंगड्यांना माझा स्नेहरुपी निरोप दे, त्याच गावात माझ्या मनाला भावणारी , माझी मनमोहिनी तिला माझं प्रेमामृत प्राषण करायला दे आणि त्याच थोड्या अंतरावर माझी म्हातारी आई आहे तिला ही स्पर्शून नमस्कार घे. …… हे मदमस्त वाहणाऱ्या वाऱ्या आई-बाबांना, सवंगड्यांना माझा नमस्कार सांग आणि मी परतणार असा माझा निरोप दे तसेच एक दिवस नक्कीच येणार असं आवर्जून सांग…..!
भारतीय जवान कुटुंबाच्या अलिप्त राहून , इच्छा आकांक्षांचे दमन करुन त्यांना तिलांजली देऊन निष्ठेने जगत असतात….
कधी एकाएकी त्यांना घरी येण्याचे झाल्यास आणि पुन्हा ड्युटीवर रुजू होण्याचा कालावधी ठरलेला नसतो….अशात ते येण्या जाण्याची राखीव तिकीटं घेत नसतात.
ते ट्रेनच्या प्यासेज मध्ये किंवा दाराशी प्रवास करतात. तासंतास एकाच ठिकाणी ते स्थीर उभे असतात परंतु आमच्या सारखे आरामदायी त्यांना बसण्यास सुद्धा विचारत नाहीत.
त्यांच्या भावनांना ओळखण्याचे सामर्थ्य आम्हा साधारण लोकात नाही.त्यांच्या पुढे आकाशही ठेंगणे भासते.
असीम आकाशापासुन अथांग सागरा पर्यंत आपल्या पराक्रमाची दाद देतो. ज्याच्या समोर पर्वतरांगाही जमिनदोस्त होतात.
ज्याच्या पायाखाली येवुन शिखराची उंची वाढते. उन,वारा,थंडी,पाऊस अशा अनेक परिस्थिंतींशी तो दोन हात करीत असतो.
आपण स्वत: साठी तर जगतच असतो परंतु इतरांसाठीही जगणे
वेगळाच आनंद आणि त्यातून मिळणारं सुख हे अगण्यच…..म्हणुन आपण सर्वांनी आदरपूर्वक त्यांना समजून घेण्याचा आजच्या दिवसाला प्रण करु या.
तुमच्या उद्यासाठी आपला आज अर्पण करणारा….
अशा पोलादी व्यक्ततिमत्वाला माझा मानाचा मुजरा!!!
*जय हिंद*
*अर्चना चव्हाण, नागपुर.*
सुरेख रसग्रहण