प्रणय तोरणे
Smt. N. G. Purandare Highschool 8thA
शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे शाळेची इमारत आपला वर्ग शिक्षक मित्र मैत्रिणी शाळेमध्ये जाण्याची किरकिरी नको अभ्यासाचे टेंशन नको ना सरांचा बाईंचा मारू नको त्यामुळे मुलांना घरी बसल्या अभ्यास करणे पसंत आहे पण हे स्वप्न सत्यात उतरेल असे कोणालाही वाटले नाही आज कोरूना सारखी महामारी सर्वत्र पसरल्याने शाळा महाविद्यालय बंद झाली अशा वेळी आमच्यासाठी ऑनलाइन शिक्षण हे सुविधा उपलब्ध झाले कधीही वाटलं नाही की एका छोट्याशा विषाणूमुळे सर्व जगात हाहाकार माजेल लॉक लोकडाऊन मुळे शाळा बंद झाल्या. आमच्या तर फायनल परीक्षा पण झाल्या नाहीत शाळा बंद असल्यामुळे आमचा अभ्यास थांबला पण त्यावरचा पर्याय म्हणजे ऑनलाइन शिक्षण ऑनलाईन शिक्षण मला आवडले कारण त्यामुळे आमचा अभ्यास तर थांबला नाही व हवा तेव्हा मोबाईल ऑन करून व्हिडीओ पाहून आमचा अभ्यास व्हायचा पहिले पहिले तर करायचे नाहीत पण हळूहळू सर्व माहिती झाली लेक्चर चे टाईम झाले की पटकन मोबाईल वर जॉईन व्हायचं बंद आहे ना नाही तर घरातला सगळा आवाज जायची भीती वाटायची कधी कधी लेक्चर चालू असताना मुलांचे माईक आॕन व्हायचे तेव्हा घरातल्या टीव्हीचा आवाज घरातल्या माणसांचा बोलण्याचा आवाज व इतर आवाज ऐकू यायचे एकदा तर गणित लेक्चर चालू होता सर शिकवत होते आणि कोणाचा तरी माईक चालू झाला तर त्याला ओरडले म्हणाले अरे आवाज बंद कर तुझ्यामुळे सगळ्यांना डिस्टरब होतंय लेक्चर चालू असताना.असे बरेच किस्से online class मध्ये अनुभवायला आले.
(मित्रांनो Shabdaparna.in वर येणाऱ्या पुढील स्पर्धांमध्ये अवश्य भाग घ्या. तुमचे मराठी,हिंदी,English साहित्य तुम्ही शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.






