online competition-अस्मिता उज्वल बोरसे
online competition-अस्मिता उज्वल बोरसे

online competition-अस्मिता उज्वल बोरसे

अस्मिता उज्वल बोरसे
Smt. N. G. Purandare Highschool
9th A
शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे राहते ते वर्ग, फळा ,खडू , व सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक आपल्याला योग्य मार्ग निवडायला मदत करतात व शिक्षणाला मदत करतात पण सध्याच्या covid-१९ च्या प्रभावामुळे ते सर्व जागेवरच थांबले होत्या त्यामुळे शिक्षण पण थांबले होते त्यातूनच उगम झाला तो ऑनलाइन शिक्षणाचा नव्याने रुजू झालेल्या डिजिटल शिक्षण पद्धतीचां . ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्या आता पुन्हा नव्याने चालू झाल्या आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम एका छोट्याशा स्क्रीन मधून समजावून दिला जातो . प्रत्येक शिक्षक आम्हाला वेगवेगळ्या ॲप द्वारे शिक्षण देत होते. नव्याने सुरू झालेल्या शिक्षण पद्धतीची कोणालाच जाणीव नव्हती. म्हणून दररोज होणाऱ्या ऑनलाइन लेक्चर मध्ये मुलांची फजिती व्हायची. म्यूट आणि अन म्यूट चा सावळा गोंधळ असायचा . मोठ्या बरोबरच लहान वर्गांना देखील या ऑनलाइन शिक्षणा ने बांधून ठेवले आहेत. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना मोबाईल चे व्यसन देखील लागू शकते. इंटरनेट चालू असल्याने विद्यार्थी इतर वेबसाईट आणि सोशल मीडिया हाताळू लागले आहेत शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा संवाद सोशल मीडियावरून होऊ लागलेला आहे. .त्याच बरोबर मित्र मैत्रिणीशी आपण संवाद साधू शकत नाही जरी संवाद साधला तरी आपण त्यांना भेटू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाबद्दल ची भीती कमी झाली आहे. काही विद्यार्थी तर कॅमेरा बंद करू टीव्ही सोशल मीडिया बघत असतात. मुलांना तर शिक्षण घेण्याचे अनेक कारणे आता मिळाली आहेत . अनेक मुलं म्हणतात टीचर इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे आणि काही मुलं म्हणतात की मॅप मोबाईलची चार्जिंग कमी आहे असे अनेक कारणे देत असतात. बघायचे झाले तर मुलांचे शारीरिक व मानसिक दृष्ट्या कमकुवत झाले आहे. खेळही कमी झालेला आहे. संवाद कमी झालेला आहे. हे झालं शहरी भागात पण ग्रामीण भागात पाहायचे झाले तर तिथली मुले शिक्षणापासून वंचित आहेत . काही मुलांकडे तो मोबाईल पण नाही असले तरी पण तिकडे ऑनलाइन शिकत असताना इंटरनेट चा प्रॉब्लेम होत आहे. ऑनलाइन शिक्षणाचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही आहेत. माझ्या मते तरी ऑनलाईन शिक्षणापेक्षा प्रत्यक्षात जाऊन शिक्षण घेणे योग्य वाटते…

(मित्रांनो Shabdaparna.in वर येणाऱ्या  पुढील स्पर्धांमध्ये अवश्य भाग घ्या. तुमचे मराठी,हिंदी,English साहित्य तुम्ही शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

संपर्क-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!