रीना रॉय-Reena Roy-शिशा हो या दिल हो आखिर
रीना रॉय-Reena Roy-शिशा हो या दिल हो आखिर

रीना रॉय-Reena Roy-शिशा हो या दिल हो आखिर

रीना रॉय-Reena Roy

१९७९ मध्ये आलेल्या जानी दुश्मन चित्रपटातील…
सारे रिश्ते नाते तोडके आ गयी ले मै तेरे वास्ते सब छोड के आ गयी…
हे अतिशय सुंदर गीत ऐकताना आपल्या नजरेसमोर एक मादक चेहरा लाभलेली अभिनेत्री उभी राहते. त्या अभिनेत्रीचे नाव आहे रीना राॅय..
८० च्या दशकात रीना राॅयने तिच्या मादक सौंदर्याने त्या काळातील तरूण पिढीला घायाळ केले होते. सौंदर्यांसोबत तिच्या अभिनयाचेही लाखो लोक चाहते होते.

या सौंदर्यवान अभिनेत्री रीना राॅयचा जन्म…७ जानेवारी १९५७ रोजी मुंबईत झाला.
वयाच्या सोळाव्या वर्षी तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. तिचा अभिनय असलेला डॅनी डेंग्जोपा सोबतचा पहिला चित्रपट बी आर इशारा साहेब यांचा..नई दूनिया नये लोग… पण काही कारणामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही.

त्यानंतर आलेला तिचा दुसरा चित्रपट जरूरत…हा सुद्धा बी आर इशारासाहेबांचाच यात तिच्यासोबत डेनी डेंग्जोपा सोबत अजून एक नवीन चेहरा होता विजय अरोड़ा…जरुरत या चित्रपटाने तिला बऱ्यापैकी ओळख मिळवून दिली. पण रीना राॅयला पाहिजे तसे यश मिळविण्यासाठी अजून काही हिट चित्रपटांची आवश्यकता होती .

 

त्यादृष्टीने तिचे प्रयत्न चालू होते. तिला यश मिळाले ते तिच्या १९७३ मध्ये आलेल्या जैसो को तैसा या चित्रपटातील अभिनेता जितेंद्र सोबतच्या पावसातील..
अब के सावन मे जे डरे रिमझिम तनपे पानी गिरे.. या गाण्यातील थिरकण्याने तिने केलेल्या पावासातील तिच्या या नाचाने पाहणाऱ्यांना भुरळ पाडली होती.

पुढे १९७५ मध्ये आलेल्या सुभाष घई च्या कालीचरण चित्रपटात ती शत्रुघ्न सिन्हा सोबत नायिका म्हणून झळकली. शत्रुघ्न सिन्हा रीना राॅयची जोडी सुपरहिट ठरली.. त्याच्या सोबत तिने विश्वनाथ ,नशीब, धरम शत्रू,,कालीचरण, मिलाप ,मुकाबला, संग्राम, भूक, चोर हो तो ऐसा, दो उस्ताद,माटी मांगे खून, बेरहम, ज्वालामुखी, हथकडी, हिरामोती, काली बस्ती
असे सर्वात जास्त चित्रपट केले.

सुनील दत्त सोबतचे तिचे आलेले चित्रपट…जानी दुश्मन  , गंगा और सुरज…
तर जितेंद्र सोबतचे तिचे नागीन,आशा, अर्पण, प्रेम तपस्या, जमानत, अपनापन असे बरेच चित्रपट सुपरहिट ठरले.
याशिवाय सनम तेरी कसम, गुलामी, बदलते रिश्ते, ग्यानीजी, वलायती बाबू…..

अशा अजून कितीतरी चित्रपटांच्या रांगा लावीत रीना राॅयने आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
पुढे पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खान सोबत लग्न करून काही वर्षे चित्रपटसृष्टीतून संन्यास घेतल्यानंतर …

अचानकपणे पुनरागमन करीत रेफ्युजी,आदमी खिलोना है यासारख्या चित्रपटातून तिने चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली. आणि आपल्या दमदार अभिनयाने आणि खूबसूरत अंदाजाने पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांत आपली ओळख निर्माण केली.

तेरे संग प्यारमे नही छोडना .. नागिन
शिशा हो या दिल हो आखिर तुट जाता है..आशा
परदेस जाके परदेसिया भूल न जाना पिया.. अर्पण
जा रे जा ओ हर जाई .. कालीचरण
कितने भी तू करले सितम हस हस के
सहेंगे हम …सनम तेरी कसम
ऐसी वैसी ना समज सजना …जानी दुश्मन
आशिकी इम्तिहान लेती है जिंदगी
इम्तिहान लेती है.. नशीब
आशा ओ के सावन मे…. आशा
मेरे पी को पवन किस गली…. गुलामी
मेरी सांसो को जो महका… बदलते रिश्ते
डिस्को स्टेशन डिस्को…हथकडी

ही रीना रायच्या दमदार अभिनयाने सजलेली काही निवडक, सुंदर गाणी….
आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात आणि गुणगुणतात..

अशी ही सुंदर सदाबहार अभिनेत्री रीना राॅय आज ७ जानेवारीला ६५ वर्षांची झाली. तिला
तिच्या आजच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व चाहत्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा..

प्रिय वाचक,लिखाण  आवडल्यास नक्की  Like,Share करा.

Birthday special मोहम्मद रफी.लिंक

https://marathi.shabdaparna.in/मोहम्मद

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण पाठवून शब्दपर्ण टीममध्ये सामील व्हा.आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी  फेसबुक पेज शब्दपर्ण जरुर follow करा.

https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

सौ. दर्शना भुरे हिंगोली….

 

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!