मेरा नाम जोकर-review in marathi
मेरा नाम जोकर-review in marathi

मेरा नाम जोकर-review in marathi

मेरा नाम जोकर-जाने कहाँ गये वो दिन-राजकपूर
मेरा नाम जोकर-review in marathi
 
१९६४ मध्ये आलेला संगम  खूप  चालला.आणि  राजकपूरने त्याचे भव्य स्वप्न साकार करण्यास सुरुवात केली. तब्बल सहा वर्ष  राजकपूरने या सिनेमात गुंतवली.
 
१८ डिसेंबर १९७० मध्ये रिलीज झालेले त्याचे स्वप्न मेरा नाम जोकर  रसिकांनी नाकारला चार तास लांब,दोन मध्यांतर रसिकांना पचनी पडले नाही.
 पडद्यावर अंगभर कपड्यात वावरणाऱ्या नायिकेचे काळात  सिमी गरेवालचे  आंघोळीचे दृश्य प्रेक्षकांना आकर्षित करु शकले नाही.
 प्रदर्शनानंतर फ्लाॕप झालेल्या या सिनेमाला नंतर मात्र  उत्कृष्ट  कलाकृती म्हणून मान्यता मिळाली. 
 
राजकपूर,धर्मेन्द्र,राजेंद्रकुमार,मनोजकुमार, सिमी गरेवाल,पद्मिनी,ऋषी कपूर
यांचा अभिनय असलेला हा सिनेमा.
 
राजूच्या मदतीने मीनू तिची महत्वाकांक्षा पुर्ण करते  पण त्याला सोडून जाते.
जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तिघींवर प्रेम करणाऱ्या राजूला मात्र कुणाचेही प्रेम मिळत नाही.
राजकपूरने बघितलेले भव्य पण भंगलेले स्वप्न ‘मेरा नाम जोकर’
निर्माता,दिग्दर्शक,नायक सबकुछ राज कपूर.

नवनिर्मितीची अफाट क्षमता असलेल्या राजकपूरने काहीतरी आगळेवेगळे बनवायचे या उद्देशाने निर्माण केलेला हा सिनेमा.
नेहमीच्या सिनेमापेक्षा जास्त लांबी,आणि दोन मध्यांतर असलेला दर्जेदार,कलात्मक, पण त्याकाळी रसिकांनी नाकारलेला सिनेमा.
सिनेमाची अर्थपूर्ण आणि सिनेमाला साजेशी गीते शैलेन्द्र आणि हसरत पुरीने रचले आहेत. संगीत शंकर जयकिशनचे आणि आवाज मुकेश आणि मन्नाडे यांचा.
कुणालाही न दुखावणाऱ्या निर्मळ,निरागस ह्दयाचा जोकर राजु आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या तीन नायिका यांच्यावर बेतलेला हा सिनेमा.
राजुचे वडील सर्कसमध्ये काम करतात.तो सर्कसला स्वतःपासून विलग करु शकत नाही. जिच्या आयुष्याचा आधारच राजु आहे ती राजुची आई त्याला सर्कशीपासून दूर ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहते.काळीज हेलावणारे बरेच प्रसंग यात गुंफले आहेत.

सिनेमाची सुरुवात
जीना यहाँ,मरना यहाँ ,
इसके सिवा जाना कहाँ

या गाण्यापासून होते. राजु अवखळ वयात जिच्या प्रेमात पडतो ती त्याची शिक्षिका, सर्कसमधली सेनिया रॕबीनकिना,
streetdancer मीनू मास्टर(पद्मीनी) ह्या तिघीही या गाण्यात आलेल्या दाखवल्या.

तिघींवरही भरभरुन प्रेम करणारा राजुचे प्रेम एकदाही सफल होत नाही.ह्या गाण्यात शेवटी शेवटी ह्दयाचा आकार असलेले खेळणे खाली पडते. ह्दयाचे तुकडे होतात.आपलेही ह्दय ह्या दृश्याने पिळवटून निघते.

जीना यहाँ मरना यहाँ …..गाणे संपले कि सिनेमा आपल्याला राजुच्या शाळेत नेतो.
नुकताच वयात आलेला पण भोळसट राजु ऋषी कपुरने साकारला.शाळेत त्याला शिकवणाऱ्या मिस् च्या प्रेमात पडतो.मिसचे लग्न (मनोज कुमार) सोबत होते.
मिसच्या घरापासून खऱ्या अर्थाने जोकरचा प्रवास सुरु होतो.
नंतर सर्कसमध्ये काम करणारी रशियन कलाकार सेनियाचा राजुच्या आयुष्यात प्रवेश होतो. भाषेचा अडसर प्रेमात निर्माण होत नाही.
पण राजुने तो सर्कसमध्ये काम करतो हे आईपासून लपवलेले सत्य उघडकीस येते .आई हे सहन करु शकत नाही,तिला हार्टअटॕक येवून ती जाते.
सर्कस बंद पडते.सेरिना राजुला सोडून रशियात जाते.
पुढे पद्मिनीत (मीनू) तो गुंततो. महत्वाकांक्षी मिनू राजूच्या मदतीने तिची महत्वाकांक्षा पुर्ण करते  पण त्याला सोडून जाते.

.नायिका बनते आणि नायक असलेल्या राजेंद्रकुमारसोबत विवाहबद्ध होते.

जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तिघींवर प्रेम करणाऱ्या राजूला मात्र कुणाचेही प्रेम मिळत नाही.
प्रत्येकवेळी प्रेमामध्ये विफलता पदरी पडलेला राजु दुःख लपवत लोकांना हसवत राहतो.
त्याच्या ह्दयातील दुःख त्याच्या चेहऱ्यापर्यंत तो पोहचू देत नाही.
सिनेमाचे दिग्दर्शन अफलातून आहे.राजुची आई जाते.तो माॕ माॕ करत आईजवळ उभा तेवढ्यात त्याच्या अदाकारीची वेळ होते.तो सर्कशच्या रंगमंचावर निघून जातो.लोकांना हसवायला लागतो.
असे बरेच करुण प्रसंग आहेत,
ज्याला सतत लोकांना हसवत राहायचे आहे त्याच्या आयुष्यात एकही आनंददायी प्रसंग नसणे हा विरोधाभास सिनेमाभर जाणवत राहतो.
ए भाई जरा देखके चलो…..मन्नाडेने गायलेले गाणे चपखल बसले आहे.

और उसके बाद
माँ नहीं, बाप नहीं
बेटा नहीं, बेटी नहीं
तू नहीं मैं नहीं
ये नहीं, वो नहीं
कुछ भी नहीं रहता है
रहता है जो कुछ वो
ख़ाली-ख़ाली कुर्सियाँ हैं
ख़ाली-ख़ाली तम्बू है
ख़ाली-ख़ाली घेरा है
बिना चिड़िया का बसेरा है
ना तेरा है, ना मेरा है

किती अर्थपूर्ण शब्द आहेत.

जाने कहाँ गये वो दिन


सिनेमा बघतांना हे गाणे अंतरीचा ठाव घेते. राजुच्या दुःखाशी शेवटपर्यंत आपण या गाण्यांमुळे समरस होऊ शकतो. त्यातील काही संवेदना गोठवून टाकणाऱ्या आहेत काळजात खोलवर रुतणाऱ्या काही ओळी

अपनी नज़र में आज कल, दिन भी अंधेरी रात है
साया ही अपने साथ था, साया ही अपने साथ है
जाने कहाँ गए वो दिन …

इस दिल के आशियाने में बस उनके ख़याल रह गये
तोड़ के दिल वो चल दिये, हम फिर अकेले रह गये
जाने कहाँ गए वो दिन …

काही सिनेमांवर कितीही लिहिले तरी लिखाणात काहीतरी कमी आहे का असा प्रश्न पडतो.
त्यातीलच हा एक सिनेमा ‘मेरा नाम जोकर’.

चित्र-साभार गुगल

 
शब्दपर्णवरील इतर सिनेमांचे रसग्रहण वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.

https://marathi.shabdaparna.in/Movie

https://marathi.shabdaparna.in/Song

https://marathi.shabdaparna.in/Bollywood

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण पाठवून शब्दपर्ण टीममध्ये सामील व्हा.आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी  फेसबुक पेज शब्दपर्ण जरुर follow करा.

पेजची लिंक

https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

प्रिती

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!