Burfi बर्फी-movie review in marathi
Burfi बर्फी-movie review in marathi

Burfi बर्फी-movie review in marathi

Burfi बर्फी-movie review in marathiबर्फी…

.असे सिनेमे फार कमी येतात.

.सिनेमापेक्षा  कविता अधिक वाटणारे.भाषेशिवाय असलेला तरीही निःशब्द नसलेला  सिनेमा.मौनातच सगळे अर्थ साठवलेला .
नायक-नायिका सिनेमाभर काहीही बोलत नाहीत पण तरीही त्यांच्या सगळ्या भावना आपण उमजत जातो ते त्यांच्या चेहऱ्यावर,डोळ्यात उमटलेल्या भावांवरुन.
त्यांच्या आनंदात ,वेदनेत सामील होत जातो. त्यांची निरागसता, मनाची निर्मळता…सगळेच आपल्यापर्यंत पोहचते.अनुराग बासुने अफलातून मांडले आहे सगळे.
आपल्यासमोर कलाकार अभिनय करत आहेत….छे. हा विचार शिवतच नाही मनाला इतका जिवंत अभिनय.
बर्फी आणि झिलमिलची प्रेमकथा तीन तास खिळवून ठेवते

. पात्र अधूरे आहेत.पण प्रेमाचा प्रवास पूर्ण आहे.

सिनेमाची सुरूवात फ्लॕशबॕकने होते. श्रुतीच्या (इलियाना) आठवणींपासून सिनेमा सुरु होतो.
तिच्या आठवणीतून बर्फीचे रुप उलगडत जाते.

नेपाळी आईवडील असलेला बर्फी –
आई मर्फी रेडियोवरुन मर्फी नाव ठेवते.
पण तो रेडियोसारखा बोलका नाही मुकबधिर असतो. मित्र मर्फीचे नाव बदलून बर्फी करतात.
बर्फीच्या स्वभावात बर्फीसारखी मिठास जाणवत राहते. खोडकर बर्फी  नकळतपणे काही ना काही खोड्या करत राहतो.मोठा झाल्यावरही त्याची ही सवय जात नाही.
तो लहान असतांनाच आई जाते.चालकाचे काम करणारे वडील जंग बहाद्दुर एकटेच त्याला सांभाळतात.
दार्जिलिंगमध्ये राहणारा बर्फी तिथे काही दिवसांसाठी आलेल्या   श्रुतीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतो.तिलाही तो आवडतो पण 


‘खामोशीमें प्यार खामोश हो जाएगा’

या तिच्या आईच्या वाक्यात
‘खामोशीमेंभी प्यार होता है’

हे वाक्य मागे पडते.तिचे लग्न होते.पण तिच्यात असलेल्या बर्फीला ती मागे सारु शकत नाही,या ना त्या निमित्ताने तो तिच्या आयुष्यात येत राहतो आणि तिच्याबरोबर आपणही त्या वेदनेची अनुभूती घेतो.

रणबीर कपूरचा अभिनय, त्याचे दिसणे सगळेच सिनेमाची जमेची बाजू आहे.
आॕटीस्टिक झिलमिल -श्रीमंत घरची पण आईवडीलांमुळे जगाशी काहीही संबंध न येणारी

. बर्फीचे वडील आजारी पडतात त्यांच्या उपचारासाठी पैसे नसणारा बर्फी श्रीमंत झिलमिलचे अपहरण करतो

बर्फी आणि ती एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि सुरु होतो नितांत सुंदर प्रेमप्रवास. स्वच्छ,नितळ मनाचा बर्फी आणि निरागस,अजाण झिलमिल. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाशिवाय काही नको असते.
प्रेमाला शब्दांची गरज आहे का?
हा प्रश्न हा सिनेमा बघतांना सतत पडत राहतो.
आपण नेहमीपेक्षा पडद्यावर काही वेगळे बघत आहोत याची जाणीव सिनेमा सुरु झाल्याबरोबर होते.
आयुष्य आनंदी जगण्यासाठी फार कमी गोष्टींची निकड असते. बस त्या गोष्टी कोणत्या हे आपल्याला कळायला हवे.
सिनेमातील काही चटका लावणारी दृश्ये.
सहा वर्षानंतर श्रुती आणि बर्फी भेटतात.बर्फी झिलमिलच्या प्रेमात पडलाय हे तिच्या लक्षात येते.
त्या दोघांच्या नात्यासोबत ती तिच्या आणि रणजितच्या (तिचे पती) नात्याची तुलना करते.
मै और रणजीत बात तो करते थे
पर दिल खामोश थे।

बर्फी अधूरा था पर पूरा था।
श्रुतीच्या मनात द्वंद्व सुरु असते.

झिलमिल घरी परत येते.बर्फी तिच्या घरी येऊन वेड्यासारखा तिला शोधतो.ती कुठेही दिसत नाही.तो परत जायला निघतो. झिलमिल बर्फी बर्फी … असा आवाज देते.बर्फीपर्यंत आवाज पोहचणे शक्य नसते.सोबत असलेल्या श्रुतीला झिलमिलची साद ऐकू जाते.
बर्फीला सांगायचे कि नाही ही जीवघेणी चलबिचल तिच्या चेहऱ्यावर दिसते.

आपणही ती सांगेल कि नाही ह्या द्वंद्वात फसतो.
तिने सांगितले  नाही तर बर्फी-झिलमिल कधीही भेटणार नसतात.
 
शेवटचे दृश्य बर्फी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर.
झिलमिलला सोडून जातो तो.
निरागस, अजाण असलेल्या झिलमिलला बर्फीशिवाय आयुष्य नसतेच.
झिलमिल त्याला एकट्याला जाऊ देईल?
झिलमिल बर्फीशिवाय जगणे शक्यच नव्हते.

सिनेमाची गाणी सिनेमाला चार चाँद लावतात.
सगळी गाणी नायकाच्या जिंदादिलीला साजेशी.
एकापेक्षा एक सरस गाणी. संगीत प्रितमचे,

क्यूँ, न हम-तुम
चले टेढ़े-मेढ़े से रास्तों पे नंगे पाँव रे
चल, भटक ले ना बावरे
क्यूँ, न हम तुम
फिरे जाके अलमस्त पहचानी राहों के परे
चल, भटक ले ना बावरे
इन टिमटिमाती निगाहों में
इन चमचमाती अदाओं में
लुके हुए, छुपे हुए
है क्या ख़याल बावरे

गीतरचना- नीलेश मिश्रा

सगळ्या विंवचना सोडून खाचखळगे असलेल्या रस्त्यावरुन मनसोक्त भटकणे.

इत्ती सी हँसी
इत्ती सी ख़ुशी
इत्ता सा टुकड़ा चाँद का
ख़्वाबों के, तिनकों से
चल बनाएँ आशियाँ

गीतरचना स्वानंद किरकिरे

अतिशय तरल गाणे. थोडे हसू,थोडासाच आनंद,चंद्राचा छोटासा तुकडा, छोटे स्वप्न घेऊन एक घर बनवायचे.
ह्या संपूर्ण गाण्यातील सगळे शब्दच जादूभरे.

 

फिर ले आया दिल मजबूर
क्या कीजे
रास न आया रहना दूर
क्या कीजे
दिल कह रहा उसे मुकम्मल कर भी आओ
वो जो अधूरी सी बात बाकी है
वो जो अधूरी सी याद बाकी है
 
 
 
ही आणि  बाकी सगळीच गाणी श्रवणीय आणि प्रेक्षणीय आहेत.
झिलमिल-बर्फीचा प्रवास बघतांना खूपदा डोळ्यात आसवे जमा होतात.पण मध्ये मध्ये सिनेमात जी विनोदाची पेरणी आहे त्याने झिलमिलसारखेच आपल्या चेहऱ्यावरही निखळ हसू येते.
अर्थात याचे श्रेय दिग्दर्शक अनुराग बासु आणि रणबीर कपूरचे.
रणबीर कपूरचा सिनेमाभर वावर प्रसन्नता निर्माण करतो.
सगळ्या भावना शुद्ध, प्रामाणिक असलेली झिलमिल प्रियंकाने समरसून वठवली आहे.
इलियानाचा संयत अभिनय ,सौरभ शुक्लाचा विनोदी अभिनय दाद देण्यासारखा.
 
प्रिती
 
 
 
 

 

शब्दपर्णवरील इतर सिनेमांचे रसग्रहण वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.

https://marathi.shabdaparna.in/Movie

https://marathi.shabdaparna.in/Song

https://marathi.shabdaparna.in/Bollywood

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण पाठवून शब्दपर्ण टीममध्ये सामील व्हा.आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी  फेसबुक पेज शब्दपर्ण जरुर follow करा.

पेजची लिंक

https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

6 Comments

    1. Anand Kulkarni

      व्वा! अतिशय छान समीक्षण लिहिले आहे. खरोखर किती सुंदर कलाकृती बनली! सगळ्या कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!