beeti na bitai raina  गुलजार  song review in marathi
beeti na bitai raina  गुलजार song review in marathi

beeti na bitai raina  गुलजार song review in marathi

beeti na bitai raina -song review in marathi
नुकतीच आई गेलेली रमा,तिचे वडिल निलेश  मृत्यूच्या दारात उभे.रात्रीची वेळ….मनात दुःख आणि  आठवणींचा डोंब उसळलेला.
१९७२ मध्ये आलेला परिचय.
 गुलजारने शब्द पेरत नेहमीसारखे जादूमयी लिहिलेले गाणे,राहूलदेव बर्मनने त्यात सुरांची जादू ओतली,लता चा जादूमयी आणि  भूपेंद्र सिंग यांचा  धीरगंभीर आवाज,अभिनयाची उपजतच जाण असलेले संजीवकुमार,जया भादूरीचा पडद्यावरचे सगळे खरे भासावे असा अभिनय…..एवढ्या सगळ्या सुंदर  ,सुरेल ,जादूई गोष्टी जुळून आल्यावर जादूई गाणे जन्माला नाही आले तरच नवल.
पंचमदाने राग यमन आणि  राग खमाजचा वापर करुन ही मधूर धुन बनवली. सितार आणि  तबला ही वाद्ये प्रामुख्याने या गाण्यात ऐकायला मिळतात.
या गीतासाठी लता मंगेशकरला  १९७२ चा सर्वश्रेष्ठ गायिकेचा पुरस्कार मिळाला.
 गुलजारचे  शब्द  गोड,मधूर,बेमिसाल …..असतातच.
 पण त्या शब्दांच्या सोबत  जेव्हा  ‘चांद आणि  रात’ हे दोन शब्द  येतात तेव्हा त्या शब्दांची मोहिनी काही औरच असते.
चाँद की बिंदी वाली, बिंदी वाली रतिया….कविकल्पनेची उंची आणि  त्या कल्पनेला दिलेले हे शब्द.
भीगी हुई अँखियों ने लाख बुझाई रैना….असे एकेक  शब्द ऐकत आपण पुढे  जातो.गाणे अनुभवू लागतो.शब्दांचे मर्म आपसूक मनाच्या गाभ्यापर्यंत पोहचवत राहतो.आपल्याही काही मर्मबंधातील ठेवी आठवत राहतो.
ही अशी उदास,विरहाने डाचणारी  रात्र संपता संपत नाही आहे. ओलावलेल्या पापण्यांआडून कितीही आसवे गाळा रात्र  भिजून विझत नाही आहे.
गाण्याची सुरुवातच अशी करणारे गुलजारचे शब्द पुढे  पुढे
ह्दय अजून कासावीस करत जातात.
गेलेले क्षण कोणीतरी आणावे,कोणीतरी जुन्या नावाने साद घालावी.
पण आता असे होणे नाही.
चंद्रावर बिंदीसारखा  डाग आहे तशी ही बिंदीवाली रात्र डोळ्यापर्यत पोहचत नाही आहे.
वर्ष येणार,संपणार.पण आठवणीत राहणारे क्षण?ते कुठे  आहेत? ते नाही परत आणता येणार.
ही रात्र खूप  उदास आणि निराश आहे.झोप हरवलेले डोळे रात्रीला  संपण्यासाठी आर्जव करत आहे.पण रात्र ऐकायला तयार नाही. ती संपता संपत नाही.
,
बीती ना बिताई रैना, बिरहा की जाई रैना
भीगी हुई अँखियों ने लाख बुझाई रैना
बीती हुयी बतियाँ कोई दोहराए
भूले हुए नामों से कोई तो बुलाये
चाँद की बिंदी वाली, बिंदी वाली रतिया
जागी हुयी अँखियों में रात ना आयी रैना
युग आते है, और युग जाए
छोटी छोटी यादों के पल नहीं जाए
झूठ से काली लागे, लागे काली रतिया
रूठी हुयी अँखियों ने, लाख मनाई रैना
हे अर्थपूर्ण गाणे
मनु आणि सौम्यच्या मधूर आवाजात ऐकण्यासाठी  शब्दपर्ण YOU TUBE CHANNEL ची खालील लिंक बघा.
प्रिती

प्रिय वाचक,तुम्हीही तुम्हाला आवडणाऱ्या गीताचे रसग्रहण शब्दपर्णवर पाठवू शकता.

Email-shabdaparnamarathi@gmail.com

शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

प्रिय लेखक,लेखणीचे मोल कोणी करु शकत नाही. सर्वांनाच हे प्रतिभेचे देणे लाभत नाही.ज्यांना हे देणे लाभले त्यांनी लिहिते रहा…..

9 Comments

  1. Anand Shrikant Kulkarni

    गाण्यांची निवड आणि त्यामागच्या भावना समजून विश्लेषण करण्याची जबरदस्त देण लाभली आहे तुम्हाला ! 👍

  2. Vaishali joshi

    खूप योग्य समीक्षण ….आणी मनू च्या आवाजाची सुरेल साथ….क्या कहेना….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!