बाल कविता-दर्शना भुरे जैन
बाल कविता-दर्शना भुरे जैन

बाल कविता-दर्शना भुरे जैन

बाल कविता-दर्शना भुरे जैन

 

आळशी झिंगी

 

एक होती मुलगी तिच नाव झिंगी

होती ती आळशी शाळेला मारी बुट्टी

मुलींनी धरली मग कट्टी

धावत आईजवळ आली घरा

रडत बसली ढळा.. ढळा

डोळ्यातून आसू लागले गळू

आई म्हणाली उगी.. उगी बाळा नको रडू

आईने दिला अर्धा लाडू

आता पूर्ण कसा मागू

तिला आला राग.. रुसून बसली दारात

भूक काही सोसेना.. राग काही राहवेना

ध्यानात आले मग तिच्या

हट्टीपणा नाही बरा.. राग काही नाही खरा

हळूच आली घरात लाडे.. लाडे

म्हणाली आईला लाडू देना गडे

आईने दिला लाडू .. लाडू केला फस्त

लाडू खाऊन झिंगी झाली स्वस्थ…

कोल्हूदादा…न…कोंबडी ताई

 

कोल्हू दादा निघाले फिरावयास घाई घाई..

रस्त्यात दिसली कोंबडीताई..

बघून कोल्हू दादा म्हणतो तिला..

कोंबडी ताई कोंबडीताई तुला कसली ग एवढी घाई…

जरा बोल की ग माझ्याशी बाई…

कोंबडी ताई म्हणते काय बोलू तुला दादा …

वाटते मला गावात मारावा एक फेरफटका…

मला पाहून थांबलास कसा…

अगं ऐक ना आलं माझ्या मनात सांगतो.. 

तुझ्या कानात…

विठ्ठल विठ्ठल विठाबाई छंद लागो.. तुझे पायी…

असं म्हणून झेप घालणार..

तेवढ्यात कोंबडी ताई म्हणते…

नको नको दादा थांब जरा तिथच…

तू कर भजन मी बसते फांदीवर..

फांदीवर बसून म्हणते कशी…

तुला भजनाची रे किती आवड..

 पण मला नाही बाई जरा सवड..

जा रे बाबा तू तुझ्या घरी..

तुझी संगत नाही बरी….

 

म्हातारी

आग…आग…
म्हातारे चालली गे कोठें…
शेताले…
शेताले व कशाले..
भाजी आणाले….
शेताले व जाशील कशी…
बीगी बीगी बीगी बीगी…
भाजी आणशील व कशी…
खाली ‌वर पारडे भर…
भाजी खुडशील व कशी…
खट्टा खट्टा खट्टा खट्टा…
भाजी वतशील व कशी..
भसा भसा भसा भसा…
भाजी घेऊन चालशील व कशी….
लुटू लुटू लुटू लुटू..
भाजी धुशील व कशी..
चुळुक‌ बुळुक चुळुक बुळुक…
भाजी चिरशील व कशी..
चरा चरा चरा चरा…
भाजी करशील व कशी….
रट्टा मट्टा रट्टा मट्टा…
भाजी खाशील व कशी….
चट्टा मट्टा चट्टा मट्टा…
मी येवू का गे पावणा..
चालता व्हय रं रावणा..

 

बेडुक

बेडकाने केले डराव डराव

काळेकुट्ट झाले आभाळ

ढगांचा गडगडाट

विजांचा कडकडाट

पाणी आले सप् सप्

पाऊस पडला रप् रप्

नदीला पाणी वाहे झरझर

बांधावर पाणी आले खळखळ

वेली फुटल्या सर सर

सृष्टी दिसे झक् झक्

मुले खेळावयास आली लगबग

नाचू लागली धपाधप

पडू लागली रपारप

पृथ्वी ओलीचिंब झाली

मुलांनी धूम ठोकली

 

परीराणी

हिरवा हिरवा गार गालीचा

झोपाळा त्यावर सुंदर फुलांचा

परी आली हिरव्या राणी

झोपाळ्यावर बसून गाऊ लागली गाणी

गाणी ऐकताच आले बंदर मामा

वाजवत सुरात बँड बाजा

राघू मैना ने वाजवली पिपाणी

हत्ती दादाने फुले उधळली

परीराणी हरखून गेली

राज हंसाने फवारले सुगंधीत अत्तर

नाचू लागला पिसारा फुलवीत मोर

दूरवरून आले रंगीत फुलपाखरू

परिराणी च्या डोक्यावरती लागले उडू

जणू काही परिराणी च्या डोक्यावर फुलांचा मुकुट

परी राणीच्या आले मनात

येथेच खेळावे हिरव्या रानात

हसू आले खुदकन गालात

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!