- १९७४ …मध्ये प्रदर्शित झालेल्या
…आपकी कसम..
चित्रपटातील जिंदगी के सफर मे ….. हे गीत ऐकताना आजही आपण भावूक होतो . आनंद बक्षी- यांनी लिहिलेल्या या गीतातील बोल आपल्या मनाला अगदी च स्पर्शून जातात.
नुकतेच यौवनात प्रवेश केलेले नायक नायिका कमल आणि सुनीता यांची काॅलेज मध्ये पहिली भेट होते. सुरवातीला दोघांमध्ये काही लाडीक कुरबुरी चालू होतात. व या लाडीक कुरबुरी नंतर ती दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात…
त्यांच्या प्रेमाला घरातील वडीलधारी मंडळी आनंदाने
स्विकारतात आणि राजीखुशीने त्यांचे लग्न लावून देतात… इथून राजाराणीच्या सुखी संसाराला सुरुवात होते. पण पुढे थोड्या गैरसमजूतीमुळे कमलच्या मनात संशयाचे बिज निर्माण होते .
प्रेमात घेतलेल्या सर्व शपथा .. सर्व वचने विसरली जातात … आणि ती दोघं एकमेकांना सोडून देतात.
त्यांचा स्वप्नवत सुखी असा संसार कायम चा उध्दवस्त होतो.
तिकडे सुनिताचा एकटेपणा तिच्या वडिलांना पहावत नाही त्यामुळे तिच्या मनाविरुद्ध तिचे ते दुसरं लग्न लावून देतात.
कमल च्या जीवनातून त्याची प्रेमिका कायमची दूरवर निघून जाते.ती कधीही न परतण्यासाठी…
तिचा विरह तिच्या आठवणी कमलला बैचेन करू लागतात .. आता कमलजवळ उरतात फक्त सुनीता सोबत घालवलेल्या प्रत्येक सोनेरी क्षणांच्या आठवणी ..
त्याचा एकटेपणाचा प्रवास….एकाकी आयुष्य … आणि पश्र्चाताप…
ज़िंदगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत मनुष्याचे जीवन एखाद्या यात्रेसमान असते.बालपण,तरूणपण,म्हतारपण अश्यारीतीने त्याचे
आयुष्य पुढे पुढे सरकत असते त्यामुळे मागे पडलेल्या (घडून गेलेल्या) घटनांचा क्रम फिरून पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात परत येत नाहीत.. - फूल खिलते हैं, लोग मिलते हैं
फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर
पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं
वो बहारों के आने से खिलते नहीं - नवीन फुले उमलतात.नवीन नवीन लोक मिळतात.
परंतु….
फुलांचा नवां बहार आला तरी
पानगळती मघ्ये कोमेजली तीच फुलं परत नव्या जोमाने उमलत नाही. - कुछ लोग जो सफ़र में बिछड़ जाते हैं
वो हज़ारों के आने से मिलते नहीं
उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम.. - त्याप्रमाणे काही लोक आपल्या जीवनातून एकदा का निघून गेली तर तिचीे आपल्या हृदयात असलेली जागा हजार व्यक्ती आल्या तरी ही कोणी च घेवू शकणार नाही.
कायम स्मरणात राहील. - वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
ज़िन्दगी के सफ़र में …
आँख धोखा है, क्या भरोसा है
आँख धोख है, क्या भरोसा है सुनो दोस्तों शक दोस्ती का दुष्मन है
डोळ्यांनी पाहिलेल खरं समजून एकदम च कोणताही निर्णयावर येवून मनात शंका उत्पन्न करू नका. मित्रांनो शंका ही एखाद्या शत्रूप्रमाणे असते. - अपने दिल में इसे घर बनाने न दो
कल तड़पना पड़े याद में जिनकी
रोक लो रूठ कर उनको जाने न दो - आपल्या मनात शंकेला महत्त्वाचे स्थान देवू नका.वेळेवर सावध व्हा नाहीतर आपल्या आयुष्यातील अनमोल व्यक्तीला कायम हरवून आयुष्यभर पश्र्चातापाच्या आगीत होरपळू.
- बाद में प्यार के चाहे भेजो हज़ारों सलाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
ज़िन्दगी के सफ़र में … - वेळ निघून गेल्यावर तुम्ही त्यांच्या समोर किती ही वेळा आपुलकीच्या भावनेने नमतं घेतलं तरी पुन्हा परतून येणार नाही.सुबह आती है, शाम जाती है
सुबह आती है, शाम जाती है यूँही
वक़्त चलता ही रहता है रुकता नहीं
एक पल में ये आगे निकल जाता
आदमी ठीक से देख पाता नहीं - दिवसामागे रात्र रात्रीमागे दिवस
सरत जातात. वेळ कधी कोणासाठी थांबत नाही . आयुष्य क्षणा क्षणाला पुढे सरकते.
माणूस बेसावध असताना च..
और परदे पे मंज़र बदल जाता है
एक बार चले जाते हैं जो दिन-रात सुबह-ओ-शाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
सभोवताली ची परिस्थिती अचानक बदलले.आणि मागे सरलेले तेच दिवस .. रात्र सकाळ .. संध्याकाळ पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात कधी च परतत नाही त.
किशोर कुमार यांनी आपल्या अनोख्या अंदाजात गायलेल्या ह्या गाण्याला संगीतबद्ध केलेयं संगीतकार राहूलदेव बर्मन यांनी
राजेश खन्ना आणि मुमताज यांची प्रमुख भूमिका असलेला …आपकी कसम… हा चित्रपट आपल्याला जीवनात बरंच काही शिकवून जातो.यातील
जिंदगी के सफर मे..
हे सुंदर आणि अद्भुत गाणं जीवनातील वास्तविकता दर्शवित.. मनाला भावूक करून जाते. - …. दर्शना भुरे जैन…









सुंदर
सुंदर
छान समीक्षण
खुप खुप छान
Nice🌹🌹🌹
Waahwaa