सावन का महिना -मिलन -रसग्रहण
सावन का महिना -मिलन -रसग्रहण

सावन का महिना -मिलन -रसग्रहण

पाऊस आणि  पाऊसगाणी  नेहमीच प्रेक्षणीय आणि श्रवणीयही…
मोहिनी मॕडम रसग्रहण सुरेख,मधुर

सावन का महिना-मिलन-रसग्रहण

1967 मध्ये  आलेला हिंदी चित्रपट  मिलन हा तेलगू चित्रपट मोगा मानसूलु चा रीमेक आहे . सुनील दत्त- नूतन जमुनाचा दमदार अभिनय सोबत प्राण आणि देवेन वर्मा. पुरस्कार प्राप्त लोकप्रिय संगीत लक्ष्मी प्यारे यांचं.
गंगा नदी तीरावर राहणाऱ्या गोपी नावाचा नावाडी आणि सधन कुटुंबातील राधा यांची कथा.
सुनील दत्त नूतन पती-पत्नी असलेले  सात जन्म यात दाखवले.  पहिले पाच जन्म व सातवा ते जोडीदार असतात. पण सहाव्या जन्मी त्यांची ताटातूट होते पण अंतिम प्रवास मात्र त्यांचा सोबत होतो.
मिलन चित्रपट म्हणजे त्यांचा सहावा जन्म.
त्यातील अजरामर गाणे. अलौकिक स्वर असलेले लतादीदी आणि मुकेश यांच्या आवाजातील.
सावन का महीना
राधाला कॉलेजच्या कार्यक्रमात गाणे गायचे असते .तिने गोपीचे नाव हाकताना गुणगुणणे ऐकले असते. ती गोपीकडून गाणं शिकते ते म्हणजे ….
सावन का महीना पवन करे सोर
मु: सावन का महीना, पवन करे सोर
ल: पवन करे शोर
मु: पवन करे सोर
ल: पवन करे शोर
मु: अरे बाबा शोर नहीं सोर, सोर, सोर
ल: पवन करे सोर

हां, जियरा रे झूमे ऐसे, जैसे बनमा नाचे मोर
हो सावन का महीना …

मौजवा करे क्या जाने, हमको इशारा
जाना कहाँ है पूछे, नदिया की धारा
मरज़ी है तुम्हारी, ले जाओ जिस ओर
जियरा रे झूमे ऐसे …

रामा गजब ढाए, ये पुरवइया
नइया सम्भालो कित, खोए हो खिवइया
पुरवइया के आगे, चले ना कोई ज़ोर
जियरा रे झूमे ऐसे …

जिनके बलम बैरी, गए हैं बिदेसवा
लाई है जैसे उनके, प्यार का संदेसवा
काली अंधियारी, घटाएं घनघोर
जियरा रे झूमे ऐसे …
पाऊस सर्व आबालवृद्धांचा आवडता. म्हणून गाणं शिकवताना गोपीने पाऊस विषय निवडला.  गोपी एक नावाडी,  म्हणून पाणी नदी पाऊस त्याचे विशेष प्रिय .
तो अशिक्षित असल्याने त्याच्या बोलीभाषेत थोडी अशुद्धता आहे पण नायिकेने ते शुद्ध करून गायलेलं त्याला रुचलं नाही. गोपी सारखेच राधेने गावे असा त्याचा आग्रह.
गीतकार आनंद बक्षींनी शब्द उच्चारण्यावर विशेष भर दिला  आहे.
त्याच्या गाण्याचा अगदी सरळ साधा अर्थ आहे अगदी त्याच्या भोळ्या स्वभावासारखा.
श्रावणात वादळ वाऱ्याचा शोर होतो . पाऊस आणि वाऱ्याच्या धुंद वातावरणात वनात नाचणाऱ्या मोरासारखा आपलं पण मन थुई थुई नाचत असतं .
अंतरामध्ये गोपी राधाला नावेतून पैलतीरी सोडायला जातो. *मौजवा करे क्या जाने हमको इशारा*……
सोप्या भाषेत प्रेमाची वाट ही कठीण आहे . पुढे घडणाऱ्या भविष्याचा अंदाज घेऊन प्रेमीजनांनी नदीच्या तरंगासारखे पुढे जायचं . एकमेकावर असणारा विश्वासच मार्ग दाखवेल.
प्रेमाची  वाट जिकडे जाईल तिकडे प्रेमी त्या वाटेवरून प्रवास करतो . त्या वाटेवर आपला प्रियकर किंवा प्रेयसी भेटेलच हे त्याला माहीत नसते म्हणून तो त्याच्या दैवाला नदीच्या धारेच्या मर्जीवर सोडून देतो   हवे तिकडे तुझ्यासोबत घेऊन चल.
रामा गजब ढाये ये पुरवैया…..
या ओळींमध्ये  प्रेमींचा एकमेकावर असलेल्या विश्वासाची जाणीव दिसते . म्हणजे नौकेला वाऱ्यावर पुरवैया वर पूर्ण विश्वास आहे . ती जिकडे नेईल तिकडे तिला वाहत नेईल.
जिनके बलम बैरी…
या ओळीमध्ये दोघांचा विरहामुळे आलेलं दुःख आहे. प्रेमीजनांच्या विरहापुढे जगातील आनंद खुशी ला काही मोल नाही . विरहाच्या प्रत्येक क्षणी आठवणींचे काळे मेघ दाटून येतात .
कदाचित श्रावणातील सरी प्रियकर प्रेयसी साठी काही संदेश घेऊन येतील.आणि मन वनातल्या  मोरा सारखं पुन्हा आनंदाने बेहोश होऊन नाचेल.

मोहिनी शैलेश

प्रिय वाचक,श्रावणधारांनी धरा चिंब झाली की आनंदोत्सव सुरु होतो.अशा रम्य पावासाळी वातावरणात तुम्हालाही काही पाऊसगाणी आठवत असतील….पाठवा तर मग पावासाळी गीताचे रसग्रहण
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

6 Comments

    1. शिवकुमार देशमुख

      अतिशय सुबक व दर्जेदार मांडणी मानला भावणारी कथा,…💐💐

  1. प्रशांत

    नायक आणि नायिकेच्या…..पाण्याच्या प्रत्येक लाटे सोबत आंदोलीत होणाऱ्या भावना अप्रतिम विश्लेषीत केल्या आहेत.
    गित तर सुंदर आहेच पण गाण्याची चाल मनात घर करणारी…!!
    अप्रतिम रसग्रहण…सुंदर प्रस्तुती..!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!