song review in marathi-केतकीच्या बनी तिथे-
song review in marathi-केतकीच्या बनी तिथे-

song review in marathi-केतकीच्या बनी तिथे-

 

केतकीच्या बनी तिथे

song review in marathi

नमस्कार….. रसिक श्रोत्यांना माझा भावभीना सलाम…
मनभावलेल्या गीत शृंखलेत…

song review in marathi
आजचं गीत.. वर्षानुवर्षे मराठी रसिक श्रोत्यांच्या मनात रुंजी घालणारं असं आहे ..song review in marathi
मला आठवतं.. मी लहान असताना माझी आई काम करत बरेचदा हे गाणं गुणगुणायची ,वाटायच कित्ती गोड आहे हे गाणं…मग कळत्या वयात मला ही आवडू लागलं आणि मी ही गाण्याचा प्रयत्न करू लागले. आजतागायत करतेय.. गायला अवघड अस हे गाण ..काही काही जागा तर इतक्या सुंदर घेतल्याआहे कि गाण संपल्या वर ही ते शब्द कानी निनादत राहातात….मनास खिळवुन ठेवतात..कारण का शब्द आणि सूर गळ्यात उतरतील पण गायिके च्या आवाजातील लकबी नी भावना …. थोड कठिणच ….”””सुमन कल्याणपूर “” ह्याना दैवीदेणच ते ..त्यांच्या आवाजातील गाणी ऐकताना मन वेगळ्या च विश्वात रमत ..समाधिस्थ व्हायला होत ..गाण्यातील सर्व भावना स्वयंप्रचित जाणवतात…मी फार भाग्यवान समजते स्वतःला .बालपणी मानसपटला वर कोरलेल्या ह्या गीता बद्दल या वयात लिहायची संधी मिळाली..मीडिया चे आभार मानावे.. तितुके थोडे..ज्यांनी आपल्याला जुन्या काळची जुनी गाणी नव्याने ऐकण्याची सोय करून दिली. आज आपण मना भावलेली आणि मनात रेंगाळत राहिलेली गीते ऐकू शकतो .असच हे एक हळुवार गीत आहे…

 

 

“”केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर
…. पापणीत साचले अंतरात रंगले
प्रेम गीत माझिया मनामनात धुंदले
ओठावरी भिजला ग आसावला सूर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर…
केतकी च्या बनी तिथे नाचला ग मोर…..
…. भाव फुल रातीचा
अंतरंगी रंगलेले
धुक्यातुनी कुणी आज
भावगीत बोलले
डोळीयात पाहिले
कौमुदीत नाचले
स्वप्न रंगी स्वप्नीच्या
मनामनात थांबले
झाडावरी दिसला ग
भाळला चकोर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर
केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर

  इतक्या भावपूर्ण अर्थपूर्ण अलवार गीताची शब्दरचना”””अशोक  परांजपे “””ह्यांनी  केली  आहे.   जी कानी पडता मन मोहरून जातं,असे हे प्रेम गीत ऐकून मन प्रणयी होतं.
             असं हे अवीट गोडी च गीत ,स्वर साज चढवला आहे विशिष्ट उंची गाठलेले संगीतकार ( फार लवकर संगीत करतात  अशी ख्याती आहे की त्यांना कुठल्याही गीताची चाल लवकर गवसते .उत्तम संगीत निमिषात सुचतं ) “””अशोक पत्की जी “”” अतिशय सुरेश स्वर रचना मांडत “”बागेश्री”” राग उलगडला आहे त्यांनी या गीतात .सुंदर स्वर संगती  (जी भावना उलगडून मांडते )घेतलेली आहे .फारच सुरेल  हृदय स्पर्शी ,तरल , हळुवार ,मनास भिडणारं  अस हे गाण आहे . या सुंदर शब्दांना आणि या सुरेल चालीला दैवी सूर लाभलेली, निरागस गायिका “सुमन कल्याणपुर “यांचा आहे.. राजस ,स्वर्गलोकीय आवाज लाभलेली ही गायिका अतिशय भावपूर्ण  गाते(म्हणतात न , गाणं शब्द आणि संगीता च्या पलीकडे आवाजाच्या भावनेवर उलगडत जात) अगदी तसं .  काही गाणी अशीच आहेत,जी ऐकत  ,डोळे मिटून सूरांच्या हिंदोळ्यावर झूलत अखंड प्रवास करत रहावा आणि  गाणी मनात साठवत रहावी अशी.इतकी सुरेल . तसच हे गाण काळीज काबीज करणार ….
              “”केतकीच्या बनी तिथे नाचला ग
              मोर
             गहिवरला मेघ नभी सोडला ग
             धीर
               केतकी च मनमोहक  अस फूल असतं ,खूप सुंदर, सुगंध ल्यायलेल. जेव्हा  ते उमलत संपूर्ण आसमंत दरवळून जातो .अस हे केतकी च बन बहरल आहे त्या सुगंधी  वातावरणात  मयूर नृत्य  करीत आहे .नभांगणी  आच्छादित  पावसाळी ढग ती धुंध ,ते नृत्य पाहून धीर सोडून  बरसू पाहात  आहे.
               प्रेमभावने चा स्पर्श कळू  पाहणार मन ,ज्याला “सौंदर्याची ” च भूल  पडते ,माझा  मते कवि  सांगू पाहातो  कि सृष्टी  सौंदर्य  न्याहळत  मन मयूर आसक्ती  ने थिरकू  पाहातो आहे .   ते पाहून आकाशात ला ढग  ही अधीर होऊन मनसोक्त  बरसत आहे .हे मनातील मोर प्रेम भावनेने ओथंबून नाचत आहे आणि संपूर्ण सृष्टी ,नभ, धरणी त्या प्रेम भावनेने भिजत आहे.
                 पापणीत साचले अंतरात रंगले
                प्रेमगीत माझिया  मनामनात धुंदले
                ओठावरी  भिजला  ग आसावला सूर
                गहिवरला मेघ सोडला ग धीर
                प्रेमाची किमया  वेल्हाळ..प्रणयगीत रोमरोमी झंकारत आहे.अंतरंगात विसावल  आहे.पापण काठ भिजतो आहे नजर भिरभिरते आहे .प्रीती  च्या सर्व  रंगानी गात्रा  तील अणुरेणू माखलेल आहे……हाकेला साद हवी  ,सादे ला प्रतिसाद ,मन प्रणयी धुंद  होताना हे प्रेमगीत गाताना, ओठांवरील  उमटलेला सूर आसावलेला, भिजलेला येतो..अशी ही  विविध रंगी प्रीती…
                भावपूर्ण रातीच्या अंतरंगी रंगलेले
                धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
                डोळीयात पाहिले कौमुदीत नाचले
                स्वप्न रंगी स्वप्नीच्या मनामनात थांबले.
                झाडा वरी दिसला  ग भाळला चकोर
                गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर..
भावभीनी रात्र,, सर्वत्र चहूकडे धुक्याच साम्राज्य,,. अंतरंगी व्यापलेली  प्रीती ..अश्या मन हिरावणाऱ्या  या समयी  कुणी हळूवार  हाक दिली आहे. भावगीत गायलं आहे..अशी ही अलवार मनोनित भावनां डोळ्यात  साठवून रजनी गात्री उमलणारी कौमुदी समवेत बेधुंद वावरताना च सप्तरंगी स्वप्न   .. प्रत्येक  हळव्या मनात विसावलेली .थांबलेली . अशा समयी लगत  च्या  झाडा वर चकोर पक्षी (जो बरसत्या पावसाच च पाणी पितो ..). भाळलेला आनंदी दिसत आहे …प्रेमा ची आसक्ती ..स्वप्नपूर्ती ची अपेक्षा  ही मनामनात सारखीच ..
.@$
सरिता बायस्कर यांनी गायलेले केतकीच्या बनी…गीत ऐकण्यासाठी खालील लिंक बघा

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण पाठवून शब्दपर्ण टीममध्ये सामील व्हा.आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी  फेसबुक पेज शब्दपर्ण जरुर follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

7 Comments

    1. Vaishali

      खूप छान ….केतकीच्या वनात …फिरुवून आणल्या बद्दल धन्यवाद

Comments are closed.

error: Content is protected !!