स्त्री चं मन समजून घेणं फार अवघड पण हीच स्त्री घराचं नंदनवन करते, तर हीच स्त्री घराला नरक सुद्धा करू शकते.
प्रत्येक व्यक्तीला संकटांचा सामना करावा लागतो. जीवन जगत असतांना
आनंदाचे क्षण येतात, त्यातूनही मार्ग काढण्यासाठी येणाऱ्या आव्हानांना सामोरे जायचं असतं तेव्हाच तर जीवनाचा गुंता सुटेल ना!
स्त्री ही आदिशक्ती आहे. असे उगीच म्हणत नाही, तर तिच्या कर्तृत्वाने संसाराचा रथ चालत असतो. दोन्ही चाक जर व्यवस्थीत चालत असेल, तर कुठलाच घात होत नाही, आणि गाडी एकसारखी सुरळीत सुरू असते.
माझे लग्न होवून मी सासरी आले, तेव्हा आम्ही भाड्याच्या घरातच राहत होतो. मी नौकरी करत होती. माझ्या
जीवनात मी स्थिरस्थावर व्हायची होती. मी संगीत शिक्षिका या पदावर कार्यरत होते. जिल्हा परिषद हायस्कूल
मोहाडी या शाळेत होतें. मला नंतरही नौकरी करायची होती, म्हणून मी जास्त खोलात न जाता जिल्हा परिषद मध्येच काम करणारा मुलगा बघायचा,म्हणजे, दोघांनाही एकत्र राहता येईल या उद्देशाने लग्न केले ते माझ्या आई
बाबा यांच्या पसंतीने. खूप श्रीमंतीची
हाव कधीच केली नाही पण निदान आपल्याला चांगल जेवण करता येईल एवढंच!
लग्न झाले आणि माझं जाणं येणं सुरू झालं.माझी नौकरी मोहाडी येथे होती व मी माझ्या माहेरी भंडारा येथून जाणं येणं करत होती. असा प्रवास सुरू असतांना विनंती अर्ज दिला. सुट्टीच्या दिवशीही प्रवास करावा लागायचा त्यामुळे शरीराला प्रवासाची दगदग सहन होत नव्हती त्यात सतत पाणी बदल, त्यामुळे सर्दी खोकला व्हायचा.ह्या प्रवासात दोन वर्षानंतर मी माझ्या सासरी बदली होऊन आले.
संगीत शिक्षिका म्हंटल्यानंतर शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम करता करता थकून जायची. सुट्टीत घरी यायची.
मी परमेश्वरासमोर हात जोडून एकच मागणं मागायची
देवां माझ्या जीवनात मला स्थैर्य लाभू दे !
आणि माझी बदली माझ्या , स्वगावी म्हणजे आमगाव ला दोन वर्षानंतर झाली. त्यानंतर त्याच वर्षी जिल्हा परिषदेचे जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम आमगाव येथे आयोजित करण्यात आले होते. तेव्हा माझ्या मोहाडी च्या शिक्षिका व मुली माझ्या घरी आल्या. माझ्या घरच्या माझ्या सासूबाईंच्या आणि माझ्या मिस्टरांच्या आदरतिथ्याने भारावून गेल्या. सर्वांनी मला मिळालेल्या माझ्या सासरच्या लोकांच खूप कौतुक केलं.त्यावर्षी मी नुकतीच आमगाव ला आल्यामुळे सादर केले नव्हते.
आमगावात आल्यानंतर जोपर्यंत जिल्हा परिषदेचेकार्यक्रम व्हायचे तोपर्यंत असं एकही वर्ष गेलं नाही
की शाळेला कधी शिल्ड मिळाली नसेल.
२६जानेवारी तहसील कार्यालयातील संपूर्ण शाळेतून शिल्ड आणणे,आणि जिल्हा परिषदेतून प्राप्त करणे ह्यासाठी माझी मेहनत असायची व मुलीचं सहकार्य व घरूनही सहकार्य असायचं.तेव्हाच तर सारे ओळखायला लागले.
नंतर १९९४ मध्ये मला माझी पहिली मुलगी झाली आणिमाझ्या जीवनाला कलाटणी मिळली. संसाराचे खरे चटके
तारेवरची कसरत सुरू झाली. मुलगी झाल्यानंतर अडीचमहिन्यानंतर मी कामाला सुरुवात केली.
त्यातच आम्ही डॉ. वाळके यांच्याकडे किरायाने राहत होतोत्यांच्या इलेक्ट्रिक मध्ये कोणते गौडबंगाल होते कोण
जाणे आम्हाला फारच जास्त इलेक्ट्रीक बील यायचं.
माझे दीर मिल्ट्रीतून आले आणि आपण घर बांधू असेम्हणाले. आमच्या आईंचा प्लॉट होता, त्यात घर बांधायचे
असे ठरले. त्यांच्याच पसंतीचा नकाशा सर्व त्यांच्यापसंतीने त्यांनी ठरवले.भूमिपूजन केलं आणि आपल्या
मिल्ट्रीच्या नोकरीस चालले गेले.आम्ही दोघे ही घराच्या मागे सकाळ संध्याकाळ
बघायला लागलो तेव्हा त्यांना मी पहिली स्कूटर घेऊनदिली होती.ते गोरेगावला जायचे यायचे यातच ते थकून
जायचे. माझ्या मुलीला माझ्या सासूबाई बघायच्या आम्ही दोघेही सर्व पहात होतो . करता करता घर पूर्ण झाले.
माझी मुलगी ही दीड वर्षाची नवीन घरात राहायला आली.गल्लिभरचे तिचे लाड करायचे शाळेत जायच्या वेळेस
शोधावे लागायचे, कुठे आहे म्हणून. तिचं सर्व करुन जाणे म्हणजे कसरतच, माझ्या शाळेच्या मूली सुद्धा माझ्यावर
खूप खूष होत्या , त्यांच्या समूहगीताची,नृत्याची तालीम आम्ही गच्चीवर करायचो. असे हे आनंदाचे दिवस संपले.
मग दिराचे लग्न ठरवले.मुलगी माझे पती आणि दिराने पसंत केली आणि लग्न ठरवून आले. साखरपुडा करायचा दिवस ठरला. तो माझी संपदा जेव्हा झाली, १२जुलैह्याच दिवशी ठरला.व माझ्या नणदेला मुलगा ह्याच दिवशी झाला, व साखरपुडा उरकून आलो, त्या वेळी तिच्या जवळ
त्यांचे नातेवाईक होतेच.संपदाच्या जन्माचा दिवस
फार महत्वाचा ठरला आहे.
क्रमशः
(कथा आवडल्यास अवश्य कळवा.)
सौ सुनेत्रा संजय टिकेकर




छान
उत्तम