तुला सांगायचे राहूनच गेले- मराठी कविता
तुला सांगायचे राहूनच गेले- मराठी कविता

तुला सांगायचे राहूनच गेले- मराठी कविता

तुझ्यासाठी माझ्या मनात

एक राखीव कोपरा होता

आज पर्यंत कारण तिथे

कोणालाच भाव नव्हता

तुला सांगाय चे राहूनच गेले

 

एकमेकांचे शब्द अगदी

फुलासारखे जपायचे

शब्दांना सुद्धा हळुवारपणे

चुंबून घ्यावे वाटायचे

तुला सांगायचे राहूनच गेले

 

नजर नजरेला भेटताना

वारा उगाच झंकारायचा

शब्दांनी न बोलता तुझा

स्पर्श मनाला जाणवायचा

तुला सांगायचे राहूनच गेले

 

माझ्या मनाच्या गाभार्‍यात

तुझीच मूर्ती सजली आहे

रित्या मनाची ओंजळ

भाव फुलांनी भरली आहे

तुला सांगायचे राहूनच गेले

 

माझे जीवन गाणे

एक खळाळता झरा

तुषार उडवून अंगावर

येई सरसरून शहारा

माझे जीवन गाणे

एक वादळ वारा

येताजाता सर्वांना

गोंधळून टाकतो खरा

माझे जीवन गाणे

सुगंधाची उधळण

भ्रमरा सारखी गुणगुण

सोबत बासरी ची धुन

माझे जीवन गाणे

ढगाला सोनेरी किनार

सुख दुखाःच्या पसार्यात

प्रेमाचा सुखद विचार

माझे जीवन गाणे

प्रवाहित राहो निरंतर

चढ उताराच्या वाटेवर

मन वारूचा आधार

माझे जीवन गाणे

पुस्तकाचं उघडं पान

जीवनात शेवट पर्यंत

ताठ राहो सदैव मान

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!