सांज..
Marathi Kavita-सिंधु व्हटकर
विश्वाचा हा अफाट …पसारा
अन ही सांजवेळ
अशा या कातरवेळी ……..
मज सांज सावल्या काय खुणावती. ….
कसलीही ओढ अनामिक… अन का? वाटे कुणासाठी….
. कानावर येते दूरवरील शिवालयातील घंटेचा नाद….
सांज सावल्या का लावत असे
मनी हुरहुर ….होते माझे मन सैरभैर….
येते मग सांजवेळी शब्दांनाही मौनत्व..
अन मौनत्वही…. होते कधी
शब्द ….शब्द… अन्
शब्द…अशी ही सांजवेळ देत असे मनी करूणेचे…. भाव अन
येतसे स्निग्धता …कोठून आपसुकच
वाटे लावावी देवापुढे
सांजवात.देण्या झाकोळल्या
तिन्हीसांजेला..
उष:कालासाठी…. प्रकाशाची
वाट…..
जरा वेळाने धरा…
घेईल अवघे विश्व कुशीत…..
स्वप्न पहाण्यासाठी सर्वांना मिळेल तिथे एकांत …….
.मागावे मग विश्वकर्म्याला ओंजळभर… आशीर्वाद…..
गुज
वाटे आज माझ्या मनाला आयुष्याच्या कॅनव्हास वरती रंग भरावे मनासारखे मनातले …..
पण जाणीव झाली तेव्हा पांढऱ्या झाल्या होत्या केसांच्या बटा.
मन म्हणाले जग आता
तुझ्या स्वत्वाने भर आता आयुष्याच्या कॅनवास वरती रंग तुझ्या मनासारखे मनातलेत्याला कसे सांगू अरे समजाऊ
कसे मी तुला मी तर बाई,शृंखलेत
अडकलेली
युगायुगांची घुसमटलेली. आताशा फुटता येत धुमारे. तिच्या स्पंदनाला… मातीत रुजताना.
बळ मिळतय तिच्या पावलांना
गंध कोवळ्या कुपी मध्ये जपून
ठेवलय तिने अलवार स्त्रित्वाला.
.होतोय तिचा वटवृक्ष आता तरीही तिच्या पावलाने घट्ट पकडलय मातीला
तिच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटावयाला
एकमेकींना सांगत आल्या
मृदगंधातल्या वेदना .
सावित्रीला मग साक्षात्कार झाला आणि पेटूनउठले सारे रान .
स्वप्नसारी जाणिवा संवेदना
साऱ्यांनाच आले मूर्तरूप .आता हाती घेईन म्हणते कॅनवास भरण्या रंग
मृदगंधात ललपलेल्या मुक जाणिवांचे अन आत खोलवर कोंडलेल्या हुंकाराचे मनासारखे मनातले…….
असे व्हावे
आज मी पक्षी व्हावे
आकाशात उंच उंच उडावे
आज मी पाऊस व्हावे
भूमीला चिंबचिंब भिजवावे
आज मी भूमी व्हावे
पावसाच्या थेंबा थेंबा चे
ऊदरात माझ्या
सुंदरसे रोपटे व्हावे
आज मी रोपटे व्हावे
हसर्या फुलांनी बहरून यावे
आणि वृक्ष होऊनी सदैव देत रहावे
आज मी सरिता व्हावे
सागराच्या ओढीने मी
पुढे वहात रहावे अन
सागरास मिळावे.
आज मी लाट व्हावे
किनार्याची होऊन रहावे
मनाने पाण्यासम नितळ होऊन
सागराच्या तळाशी रहावे
आज मी राधा व्हावे
मधुसूदना ची होऊन जावे
आज मी मीरा व्हावे
कृष्णाच्या भक्तीत बुडून जावे
कृष्णाच्या भक्तीत बुडून जावे.
रीत
.रोज सकाळी उठून पोतरतेस चूल
तुझ्या अस्तित्वाची खरी खुण
जपतेस तिला जीवापाड
जन्मोजन्मीचे सखी तुझी
व्यक्त होण्यास तुला तिचा आसरा..
रोजच्या तुझ्या भावनेचे तुझे
उमाळे, उसासे टाकतेस तिच्या आगीत .
तिला सांगितलेली मनातील गुपिते
जळून जातात तिच्यात
तीही देते दान तुला भाकरीभाजून अन कुटुंबाचा जठराग्णी शांत करुन
तुझ्या गर्भातून वाहते कुटुंबाच्या वंशाची सरिता
तरीही तू अस्तित्वाच्या तृष्णेने व्याकूळ.
दिवसभर किती थापते किती सोसते.
सवयीने मात्र तुला आता त्याचे देणे घेणे नाही
तुझी लढाई मात्र फक्त कर्माशी आहे
कितीदा पोळतो हात अन् मनही
तरीही जळत रहाते अखंड
देवघरातील सांजवाते समानडोळ्यावर झापड लावून स्वीकारली आहेस
तू ही जगण्याची रीत
उगवती ची आशा
अशीच मनात कहाणी आली
त्याच्यासोबत तीही आली
सात पावल सप्तपदी चालेल त्याच्यासाठी
सर्व दिशा अंधारल्या…… तरीही….
उन्हातानात ती दगड फोडत राही
गाळलेला घाम तिला कळला ही नाही
भरल्यापोटी गाण्याचे सूर
उपाशीपोटी छन्नीचा धूर
झाडाला बांधते पिलासाठी झोका
एक घाव दगडावर
अन एक धाव पिल्लाकडे
नवरा म्हणाला शिकत राह तू
भिऊ नकोस पाठीशी आहे मी
कणाकणाने घडवत जा स्वतःला
दे फेकून तुझ्यातील तमाला
मना मनाने घडवत जा तुला,
फेकून दे छन्नी अन घनाला
अन हातात घे लेखणी
तु घडवता इतिहास उजाडेल पहाट
मग तिच्या कणाकणात तो रुजत गेला
तीचा ध्येयाच्या वाटेवर अन
स्वप्नांच्या लाटेवर प्रवास सुरू झाला.
तिच्या ध्येयाचा आता वटवृक्ष झाला…..
आता ठरेल ती उद्याच्या
उगवती ची आशा…..
उगवती ची आशा…..
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
सुरेख
खूप छान कविता
Wahh 🌹🌹🌹