तेरा जाना-song review in marathi
मनुष्यप्राणी असल्याचा फायदा दुसऱ्याच्या आनंदात आपण सहभागी होऊ शकतो आणि तोटा हा कि दुसऱ्याच्या दुःखाची तीव्रताही आपल्या मनापर्यंत पोहचते. सिनेमातील गाणी,प्रसंग बघतांना टचकन डोळ्यात पाणी येतेच इतके आपण त्याच्याशी समरस होतो.
ही त्या गाण्याची,सिनेमाची ताकद असते.आणि त्याला दिलेली आपल्या संवेदनशीलतेची जोड.
१९५९ साली आलेला अनाडी सिनेमा.त्यातील हे गाणे. नुतन पियानोवर गात आहे.राजकपूर दुःखी मनाने पायऱ्यांवरुन उतरत आहे.
शैलेंद्रने लिहिलेल्या गीताला शंंकरजयकिशनचे संगीत आहे.
आरती(नूतन) ला राज(राज कपुर) सोडून गेला.
आरतीचे विदीर्ण झालेले ह्दय ,सगळे हातात येऊन निसटून गेल्याचा आभास.
अगदी आतापर्यंत दोघांचा आनंद,दुःख एकमेकांशी बांधून होते. आयुष्यभर दोघांना एकमेकांशी जोडून राहायचे होते.दोघे वेगळे कुठे होते? पण दैवाने काही वेगळेच घडवले.
चंद्र रोज नभी उगवत राहणार आणि त्याच्या साक्षीने त्या दोघांनी एकमेकांना दिलेली वचने-रोजच आठवत राहणार.त्याच्या आठवणीने ती रात्र रात्र झोपू शकणार नाही.
त्या आठवणींनी डोळे झरझर वाहतील.ह्दयात कालवाकालव होईल. त्याची समजूत कोण आणि कशी घालणार?
त्याच्या जाण्याने तिच्या जगण्याचा अर्थच संपला आहे.
तेरा जाना, दिल के अरमानों का लुट जाना
कोई देखे, बनके तक़दीरों का मिट जाना
तेरा जाना
तेरा ग़म तेरी ख़ुशी, मेरा ग़म मेरी ख़ुशी, तुझसे ही थी ज़िंदगी
हँसकर हमने था कहा, जीवनभर का साथ है, ये कल ही की बात है
तेरा जाना …
जब-जब चँदा आएगा, तेरी याद दिलाएगा, सारी रात जगाएगा
मैं रोकर रह जाऊँगी, दिल जब ज़िद पर आएगा, दिल को कौन मनाएगा
शंंकरजयकिशनविरहाची तीव्रता लताच्या आवाजातुन आपल्यापर्यंत पोहचते. सगळेच लाजवाब. हे गाणे बघण्यापेक्षा ऐकतांनाची अनुभूती अधिक सुंदर आहे.
हे गाणे तुम्ही शब्दपर्ण youtube channel – वर ऐकू शकता.
गायिका- मनाली राजाध्यक्ष










अप्रतिम
खूप छान👏✊👍
Wahh
मस्तच
जितके छान गाणे तितकेच छान समीक्षण
Waahwaa
सुंदर