बाई हार-फुले आणलेत”.
माधव, अपार्टमेंटचा वॉचमन. अडीअडचणीला नमिताचे छोटे-छोटे काम करत असे. आजही त्याने हार फुलाची कागदाची पुरचुंडी टेबलवर आणून ठेवली.
मोगर्याचा सुगंध दरवळला. नमिताला बाबांची प्रकर्षाने आठवण झाली.
नमिताने फुले टोपलीत काढली. कागद उडून टेबलाच्या खाली पडला.
त्याच्या शेजारी असलेल्या देव्हाऱ्याजवळ नमिता पुजेसाठी बसली. पुजा करता करताच मागच्या दोन वर्षांच्या घटना तिच्या डोळ्यासमोर तरळल्या .
नमिताचे वडील एक नामांकित उद्योगपती. बऱ्याच कंपन्यांमध्ये त्यांचे शेअर्स गुंतवलेले होते. घरात श्रीमंती ओसंडून वाहत होती.
घरच्यांना या सगळ्याची सवय होऊन गेली होती.
नमिता एकुलती एक लाडाची लेक.लहानपणापासून
ऐश्वर्यात वाढलेली. कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती तिला.
तिच्या वडिलांचाही व्यवसाय पुर्ण भरात होता.
सगळं नीट सुरू असताना अचानक नमिताच्या बाबांना व्यवसायात अतिशय हानी झाली . शेअर्सचे भाव उतरले. बरीचशी प्रॉपर्टी त्यांना विकावी लागली.
घरात त्रिकाळ पाणी भरणारी लक्ष्मी अचानक त्यांच्यावर रुसली.
बँकेकडून त्यांच्या बऱ्याच प्रॉपर्टीवर जप्ती आणली होती.
वरून खाली उतरणारा श्रीमंतीचा आलेख जास्त क्लेशदायक असतो.
हा धक्का ते सहन करू शकले नाही. सहाजिकच ते अबोल झाले . आतल्या आत कुढत राहिले.
असं म्हणतात आयुष्यात जगताना नेहमी धडे मिळत जातात. पण आयुष्य कोणताही धडा कधीच फुकट शिकवत नाही.आपण जेव्हा जेव्हा आयुष्यातून काही धडा घेतो , तेव्हा तेव्हा आपण त्याची किंमत पुरेपूर मोजलेली असते. मग स्वरूप कोणतेही असो आर्थिक , मानसिक किंवा शारीरिक, पण किंमत मोजलेली असतेच….
ऐटीत आयुष्य जगणारे नमिताचे बाबा एकदम लाचार झाले. श्रीमंतीला चिकटलेले मित्र, नातलग दुर झाले.
नवऱ्यावर आलेला वाईट काळ बायकोला झेपला नाही.
आणि अशाच परिस्थितीत ती , नमिता आणि त्यांना सोडून देवाकडे जाब विचारायला निघुन गेली.
या दुसऱ्या आकस्मिक धक्क्याने नमिताचे बाबा पार कोलमडले.
धन, दौलत, पैसा, अडकाचे नुकसान कालांतराने भरून निघेलही पण आयुष्यात आपल्या जवळच्या व्यक्तीची साथ सुटून जी हानी होते ती कदाचितच भरून निघते.
सर्व घटनांचा तिच्या बाबांच्या डोक्यावर, मनावर खोलवर परिणाम झाला. ते सगळ्यापासून अलिप्त राहू लागले.
कधी एकटेच खूप बडबड करायचे ,कधी एकदमच शांत, तर कधी जोरजोरात रडायचे सुद्धा.
नामिताने त्यांना चांगल्या चांगल्या मानसोपचार तज्ञांकडे दाखवले होते . नमिता त्यांची सर्वतोपरी काळजी घ्यायची.
एक दिवस अशाच विमनस्क अवस्थेत ते घर सोडून निघून गेले. नमिताने त्यांचा खूप शोध घेतला . सगळं गाव पिंजुन काढलं . गावातले नातलग, हॉस्पिटल्स, अगदी शवागार सुद्धा.
पण सापडले नव्हते.
आज दोन वर्ष उलटली होती. तिला कधी कधी वाटायचे बाबा जिवंत तरी आहेत की नाही ?
कधी एखादे कुटुंब जातांना दिसले की तिच्या मनात कालवाकालव होई, मन सैरभैर होई.
तिच्या आई वडिलांनी तिच्या भविष्याच्या, लग्नाच्या खूप योजना आखल्या होत्या. सगळं सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं.
देवाकडे बघता बघता, सगळ्या घटना तिच्या डोळ्यासमोर फेर धरून तिला हिणवू पहात होत्या. देवाच्या अस्तित्वावरच आता तिला संभ्रम वाटायला लागला होता.
हवेच्या झोताने टेबलाखालचा कागद तिच्याकडे सरकला. तिचं लक्ष गेलं, तसं झटदिशी तिनी कागद उचलला.
त्यात तिच्या बाबांचा फोटो होता.
तिचे बाबा जिवंत होते.
चुकीचे विचार मनात आल्याने तिने आधी देवाला दंडवत घालून माफी मागितली, लाख लाख आभार तिने मानले.
कुठल्या तरी आश्रमाचा पत्ता त्याखाली लिहिला होता.
खूप वाईट अवस्थेतील बाबा आश्रमाच्या कार्यकर्त्यांना सापडले होते. त्यांच्यावर उपचार केले गेले . थोडे बरे वाटल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोसहीत पत्ता, माहिती वर्तमानपेपर मध्ये दिली होती. तिनी तारीख वाचली, दोन महिन्यापूर्वीचा पेपर होता तो.
तिने लगेच त्यावर असलेल्या फोन नंबर वर फोन केला.
बाबांना घेऊन ती घरी आली.
एका कागदाच्या तुकड्याच्या मदतीने आज नमिताचे बाबा तिला परत मिळाले होते.
……… मोहिनी राजे पाटनुरकर










छान लिखाण
छान लिहिलंय
Ty priti Madam
सुंदर …लिहिले
खूप छान
Khup sundar katha 🌹🌹🌹
वाह…खूप खूप भावस्पर्शी
Chhan 👌👍
छान लिहिले आहे
अप्रतिम 👌
अप्रतिम मोहिनी
छान लिहिलय