गार हवेच्या झुळूकेसोबत पावसाच्या पाण्याचे थंड तुषार अंगाला स्पर्शू लागले म्हणून वैदेही खिडकी बंद करण्यासाठी उठली.तितक्यात मोबाईल वाजला म्हणून बघितला तर विदितचा Good night चा मेसेज … ती हसली..इतका वेळ तर आम्ही दोघे बोलतच होतो. आणि आता पुन्हा लगेचच मेसेज.. रात्र झाली तरी विदित पण ना वेडाच आहे..
बाहेर सुटलेल्या सोसाट्याचा वाऱ्यामुळे उघडझाप करणारी खिडकी बंद करीत असताना त्याच्या काचांमधून तिला एवढ्या रात्रीच्या अंधारात खिडकीजवळच कोणीतरी उभे असल्यासारखे वाटल्याने..
घाबरून तिने पटकन पांघरूणात शिरून डोक्यावरून भितीने पांघरूण ओढून घेतले. सर्व गाढ झोपेत असताना ती टक्क जागीच होती..
विदीतच्या प्रेमात पडल्यापासून कोणीतरी सतत तिचा पाठलाग करीत आहे असे तिला आता मनातून वाटू लागले..
या सर्व घटनांचा विदीतसोबत काहीतरी नक्कीच संबंध असणार हे निश्चित..
पण तो यावर विश्वास ठेवणार नाही… म्हणून ती गप्प होती.
पावसाची रिपरिप ओसरल्यावर …. वैदेहीला थोडी गाढ झोप लागली. सकाळी झोपेतून उठली तेव्हा बऱ्यापैकी उजाडले होते.विदीतचे आईवडील आज लग्नाच्या बोलणीसाठी येणार असल्याने आईची सकाळपासून कामाची घाई सुरू झाली होती. वैदेहीला चहाचा कप आणून देत आई म्हणाली..
अग..वैदु तुझे अजून आवरलेच नाही का?पटकन आवरून घे..विदीत कडील मंडळी कधीही येईल.
आईचे बोलणे ऐकून
वैदेही तयार होण्यासाठी आत गेली. विदीत घरी येणार असल्यामुळे ती खूप खुषीत होती.
विदीतच्या आवडत्या लाल रंगाचा सलवारसूट तिने अंगावर चढवत
स्वतःच्याच प्रतिबिंबावर खुष होवून आरश्यासमोर उभी राहून स्वतःला न्याहळू लागली असताना
पाठीमागून हळूच येवून विदीतने मिठीत घेतल्याने ती क्षणभर लाजली..पण तिला लगेच जाणवले की खोलीत आपल्या दोघांशिवाय अजून कोणी तरी हजर आहे.आणि आपल्याकडेच बघत आहे. त्याक्षणी घाबरून ती त्याच्यापासून दूर होवून निघून गेली.
वैदेहीच्या अकस्मात अशा निघून जाण्याने विदीत विचारात पडला. दूरच्या लग्नसमारंभात झालेली वैदेहची पहिली भेट ..श्रीमंत, देखणी वैदेही पहिल्याच नजरेत त्याला आवडली..
लग्नाची बोलणी संपवून विदीत आणि त्याच्यी मंडळी घरी जाण्यासाठी निघाली. तरी वैदेही त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर दरवाजापाशी आली नाही . कुठली तरी अदृश्य शक्ती विदीतसमोर जाण्यापासून तिला अडवत होती.संध्याकाळी खिडकीत बसून तिला तिचे विदीतसोबतचे वागणे आठवले. विदीत नाराज झाला असेल असा विचार करून तिने त्याला फोन केला.
तर त्याने उद्या आपल्या दोघांना माझ्या आईबाबासोबत कुलदेवतेच्या दर्शनासाठी जायचे आहे. तेव्हा तू तयार राहा असे सांगितले.
दुसऱ्या दिवशीच्या प्रवासात नुकताच पाऊस पडून गेल्यामुळें वातावरणात गारवा जाणवत होता. विदीत गाडी चालवण्यात व्यस्त होता वैदेही शेजारी कानात हेडफोन टाकून मागे सीटला डोके टेकवून मंद आवाजात गाणे ऐकत बसली होती. विदीतचे आईबाबा मागच्या सीटवर होते . अचानक तिला वळणाच्या रस्त्यावर थंड हवेची झुळूक स्पर्शून गेल्याने अंगावर सरसरून काटा उभा राहिला. आणि काहीतरी आठवल्याने..
तिने बाहेरील रस्त्यावरून नजर फिरवत झपाटल्यागत कानातील हेडफोन काढून फेकत विदीतच्या हातून गाडीचा ताबा घेत एक्सलेटर पायाने दाबून गाडी सुसाट्याने पळवायला सुरुवात केली. वैदेहीला अशी अचानक भरधाव वेगाने गाडी पळवताना पाहून विदीतची आई घाबरून तिला म्हणाली,
वैदेही अग हळू…काय झाले तुला एकदम ..
तेव्हा वैदेही रागाने वळून त्यांच्यकडे बघून म्हणाली,
वैदेही…नाही मी वासंती.
तुमच्या सूनेला विसरल्या तुम्ही.. एवढ्या लवकर.. म्हणत ताबडतोब करकचून ब्रेक दाबून निर्मनुष्य ठिकाणी गाडी उभी केली आणि विदीतला म्हणाली.
मी वासंती…विदीत तुझी बायको पैशाच्या लोभापायी तू आणि तुझ्या आईवडिलांनी मिळून मला याच ठिकाणी मारून टाकले आणि परत वैदेहीसोबत लग्न करायला निघालास .. म्हणतच रागाने त्याला खोल दरीत लोटुन दिले व गाडीचा
वेग वाढवून उतारावरून गाडी ढकलून देत वेगाने बाहेर उडी मारत
विदीतला दरीत लोटून दिल्यामुळे त्याच्या भितीने थरथरणाऱ्या आईवडीलांना भेसूर हसत म्हणाली, तुम्हाला पण जायचे आहे तुमच्या मुलाजवळ.. घाबरू नका ..
गाडी उतारावरून दरीत कोसळताना दोघांच्या आवाजातील आर्त किंकाळ्या हवेत विरल्या.. अखेर ती जिंकली.. तिचा बदला पूर्ण झाला..
सौ. दर्शना भुरे ..
आमची कथा आवडल्यास नक्की Like आणि Share करा.








बापरे! थरारक लिखाण
बापरे… थरारक
बापरे काय हे थरारक
उत्तम कथा,
असा ही एक बदला.