सख्या
सख्या

सख्या

सख्या,

कसा आहेस रे? मी तुझी वाट पाहतेय हे देखील विसरला असशील. इतका कालावधी लोटला की आठवणीत रहावं असे काही शिल्लक राहिलचं नव्हत. पण तू मला जसा सोडून गेलास अगदी तशीच आहे रे मी.

दूरवर पसरलेल्या अथांग वाळूत आजही तुझेच चित्र रेखाटते आहे. वाळूचच चित्र ते वाऱ्यासरशी हळुहळु पुसट होत जाऊन मिटूनही जात. जस तु माझ्या जीवनातुन सहज निघून गेलास.कधी वळून बघितलेही नाहीस. मी किती गुंतले होते तुझ्यात. अजुनही ती गुंतलेली गुंतावळ उकलत बसले आहे पण ती गाठ अधिकच मजबुत बनत चालली आहे. माझी वाट पाहण्याची सवय इतकी रूळलीय की डोळ्यांना एकच वेध असतो. जळी, काष्ठी, पाषाणी तुझेच स्वरूप दिसते नयनी
सख्या…. का गेलास सोडून मला या छळवादी जगात… तुला माहित होत….. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही..

. पण तरीही… तू गेलास… का असा अगदी अचानक…झाडावर फुललेल फूल तोडून न्याव अगदी तसाच….. अलगद दूर झालास माझ्या पासुन…. कधीही न परतण्यासाठी….. असा काय होता गुन्हा.. तु वळूनही पाहिल नाही पुन्हा…. पण जातांना तुझ्या वस्तू सावडायच्या सोडुनच गेलास… तुझा सुगंध माझ्या ओटीत सोडुन गेलास… सख्या ती ओटी आता फळलीय रे…. तिच्यावरही एक सुंदर कोमल अगदी तुझ्या सारखच टपोर लोभसवाण गुलाबी फुल फुललय….. त्याचा सुगंध दरवळतोय घरभर …. आणि म्हणुनच तुझी आठवण अधिक तीव्रतेने येती आहे…… येशील का रे परत

कसा आहेस रे? मी तुझी वाट पाहतेय हे देखील विसरला असशील. इतका कालावधी लोटला की आठवणीत रहावं असे काही शिल्लक राहिलचं नव्हत. पण तू मला जसा सोडून गेलास अगदी तशीच आहे रे मी.

दूरवर पसरलेल्या अथांग वाळूत आजही तुझेच चित्र रेखाटते आहे. वाळूचच चित्र ते वाऱ्यासरशी हळुहळु पुसट होत जाऊन मिटूनही जात. जस तु माझ्या जीवनातुन सहज निघून गेलास.कधी वळून बघितलेही नाहीस. मी किती गुंतले होते तुझ्यात. अजुनही ती गुंतलेली गुंतावळ उकलत बसले आहे पण ती गाठ अधिकच मजबुत बनत चालली आहे. माझी वाट पाहण्याची सवय इतकी रूळलीय की डोळ्यांना एकच वेध असतो. जळी, काष्ठी, पाषाणी तुझेच स्वरूप दिसते नयनी

त्या क्षितीजाच्या पलीकडून….. माझ्या साठी नाही पण आपल्या सुगंधासाठी….. आपल्या  साठी…. आपणही भिजुन चिंब चिंब होऊ त्या सरीत…. आणि भरून घेऊ अंत:करणाचा डोह…..

सौ. राजश्री म. हिमगिरे(विभुते)
प्रियदर्शिनी कन्या प्रशाला उमरी
नांदेड (उमरी)

6 Comments

  1. Rohit Kulkarni

    चटका … प्रत्येक शब्दातून त्या विरहभावनेचा चटका जाणवतोय.
    वाट पाहताना आणि विरहाचं कारण शोधताना जे अश्रू वाहिले असतील त्या अश्रूंची धग किती असह्य असेल….
    अतिशय उत्कट…. मनामध्ये कायमचं स्थान निर्माण केलं ह्या रचनेने…💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!