मासिक पाळी-लेख
मासिक पाळी मैत्रीण जिवाभावाची
सोबत करते आयुष्यभराची
मासिक पाळी निसर्गाच देण
सर्वात सुंदर बाईच लेण….!!!
मासिक पाळीचे पाच दिवस
करा आनंदाने व्यतित
देवीला पुजा मंदिरात जा
पण स्वच्छता धर्म पाळा निश्चित …!!!
मासिक पाळी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक अगदी वयाच्या बारा-तेराव्या वर्षापासून आपल्या जीवनात आलेली आपली अगदी वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत आपल्या सोबत असते.
आत्ताच्या पिढीतल्या मुलींना मासिक पाळी लवकर येण्याचे प्रमाण वाढत आहे यास शास्त्रीय कारण आहे की दिवस-रात्र टीव्हीवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून नको असलेली दृश्य पाहून हार्मोन्समध्ये बदल होणे हे असू शकते असं माझं मत आहे
आपल्या भारतात काही धर्मांमध्ये पाळी येणे हा आनंदाचा दिवस मानला जातो त्या दिवशी मुलीला नवीन कपडे घरी गोडधोड बनवणे नातेवाईकांना आमंत्रित केले जाते मुलीला भेटवस्तू देणे हीसुद्धा प्रथा आहे जेणेकरून मुलगी पुढील आयुष्य सुरु करण्यास सक्षम आहे तसे पाहिले तर मेडिकल फिट आहे म्हणून तो आनंदाचा दिवस साजरा करतात…
पारंपारीक प्रथेनुसार पाळीचे पाच दिवस सर्वांपासून वेगळे बसवून तिला घर कामात किंवा देवघरात प्रवेश नाकारला जायचा एका अर्थी त्या पाच दिवसात तिला शारीरिक विश्रांतीची गरज असल्याने व पूर्वीच्या काळी मुलींची लग्न १३ -१४ वर्षात होत होती लहान वय व एकत्र कुटुंब पद्धती या सर्व कारणांमुळे तिला घरी कामाचा रामरगाडा उपसावा लागत असे त्या दिवसात तिला शारीरिक व मानसिक विश्रांतीची गरज जाणून ही प्रथा कदाचित उदयास आली असावी, फक्त धार्मिक कारणे देऊन तिचे काटेकोर पालन होत होते.
परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती किंवा घराबाहेर पडून महिला नोकरी करू लागल्या त्यामुळे ही प्रथा लोप पावत चालली आहे प्रथा खूप सुंदर होती तिचे पालन होत होते. परंतु कधीकधी प्रथेच्या नावाखाली अतिरेक होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
देवळात त्या पाच दिवसात प्रवेश नाकारणे हे कितपत योग्य आहे हे कारण काही मनाला पटत नाही यावर बऱ्याच चर्चा वाद-विवाद यापूर्वी झालेले आहेत निसर्गाच्या नियमानुसार त्या पाच दिवसात जी गादी तयार होते त्याचा आपल्या पुढील पिढीची वंशावळ वाढते मग ते दूषित घाण विटाळलेली कशी असू शकते त्या पाच दिवसात ती अपवित्र कशी असू शकते आणि त्यातून जन्मलेले बाळ पवित्र कसे असू शकते हे मनाला पडलेले फार मोठे कोडे आहे.
बऱ्याच घरात आता सुद्धा त्या पाच दिवसात घरी काम करायला येणाऱ्या मावशींना प्रवेश नाकारला जातो.
त्या पाच दिवसात आमच्या घरी सोवळे पाळतो असे सांगून तिचा अपमान तरी करू नये. दया भावनेने एखादा दिवस तिला आराम मिळावा म्हणून कामावर येऊ नको असे सांगावे. कारण बाईनेचबाईचा विचार करायला पाहिजे.
मला यापुढे जाऊन असं मत मांडायचा आहे की आपण जी फूले देवाला वाहण्यासाठी विकत आणतो किंवा हार आणतो किंवा देवी करिता वेणी आणतो इतकेच नव्हे तर फुलशेतीत महिला व पुरुष फुलांची वेचणी करतात त्या महिला किंवा किंवा तेथे काम करणारे पुरुषांच्या बायका यांना काय मासिक पाळी येत नाही का? तसेच आपण हॉटेलमध्ये चविष्ट पदार्थ खातो ते बनवणारे आचारी पाणी आणून देणारे वेटर यांच्या बायकांना पाळी येत नाही का ?बस, रेल्वे प्रवास करताना तिकीट काढतो त्या तिकिटाला कंडक्टर हात लावतो. कांऊटरवरुन तिकीट घेताना कारकूनाचा हात लागतो त्यांच्या बायकांना पाळी येत नाही का?
वर उल्लेखित या मुद्द्यांचा विचार केला असता असे वाटते की पाळी या विषयाचे एवढे गांभीर्य करून त्याचे थोताड माजविणे कितपत योग्य आहे
समाज सुधारणा व्हायला हवी पण समाजात चित्र असं दिसतं की बऱ्याचदा बाईच बाईचा द्वेष करते पुरुषांना याचा काही फरक पडत नाही आपण आपल्या घरातून या नवीन प्रथेची प्रत्यक्ष सुरुवात करायला हवी आपण स्वतः आपली मुलगी सून यांना समजावायला हवे कारण त्या जर प्रथा पाळत असतील तर त्यांना त्यापासून परावृत्त करायला हवे असं माझं मत आहे
शीला रंगारी










खूपच सुंदर विषय…
अप्रतिम लिखाण👌
खूप खूप आभार
सत्य.. आणि परखड …छान…
जी धन्यवाद
छानच 👌
मनस्वी आभार
Khupch chhan
Adhunik vicharanchi kavita
Sunder
खूप खूप धन्यवाद
खूप खूप आभार
Nice opinion. Well written madam.
खूप खूप आभार मॕडम