भोपळ्याने फुलवली बाग…
भोपळ्याने फुलवली बाग…

भोपळ्याने फुलवली बाग…

 

थंडीचे दिवस होते सरु पटकन जेवण आटपून गोष्ट ऐकण्यासाठी आजीच्या पांघरूणत शिरली ..
आजी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली, सरु आज मी तुला एका भोपळ्याची गोष्ट सांगाणार तो तुझ्या किंवा माझ्यासारखा नव्हता बरं का? अगदी वेगळा होता.
भोपळा आणि वेगळा कसा तो ..सांग ना ग आजी पटकन सरुला लवकर गोष्ट ऐकण्याची घाई झाली होती…
हो हो सांगते ..
तर मग ऐक असे म्हणत आजीने सरुला गोष्ट सांगायला सुरुवात केली..

एक भोपळा होता. तो बागेत राहत होता.भोपळा बिचारा लंगडा होता त्याला चालायला येत नव्हते. म्हणून तो सतत एका झाडाखाली बसून राहायचा. त्याला ती बाग खूप आवडत होती बागेतील रंगबिरंगी फुले त्याला आवडत होती तो त्या फुलांना बोलत असे. फुलांसोबत त्याची चांगली गट्टी जमली होती. पण तेथील काही खोडकर मुलांना त्या बिचाऱ्या भोपळ्याचे असे बागेत बसणं बिलकुल आवडत नसे. ती मुले त्याच्या सतत खोड्या काढीत त्याला जातायेता चिडवत होती यामुळे तो सतत दुःखी राहायचा रडत बसायचा, तेथील झाडावर बसलेला एक छोटा पक्षी त्याला असं दुःखीकष्टी होऊन रडताना नेहमी बघायचा त्याला फार वाईट वाटायचे .. आपण ह्या भोपळ्याला काहीतरी मदत केली पाहिजे असे त्याला सतत वाटायचे.
मग एके दिवशी वेळ पाहून भोपळा ज्या झाडाखाली बसला होता तिथे तो छोटासा पक्षी उडत उडत येवून त्याच्या बाजूला बसला.. व भोपळ्याला चीची करत म्हणाला, तू असा नाराज नको राहू मी तुझी मदत करेन तुला चालायला शिकवेन भोपळा त्याचे बोलणे ऐकून खुश होत म्हणाला खरंच तू मला चालायला शिकवशील तो पक्षी म्हणाला हो मी खरच तुला चालायल शिकवीन आजपासून आपण दोघे दोस्त माझे नाव चीची तू मला चीची म्हणून हाक मारत जा
भोपळा त्याला मान हलवून हो म्हणाला

तसा चीची त्याला म्हणाला “चल, मी तुला आजपासूनच चालायला शिकवतो.” भोपळा ही खुशीने तयार होऊन चीची च्या मागे. चालू लागला..

मग चीचीही रोज सकाळी येऊन भोपळ्याला चालवायला शिकवू लागला. मग भोपळा चीची च्या मदतीने चालू लागला. स्वतः जवळच्या चांगल्या चांगल्या गोष्टी तो चीचीलाही शिकवू लागला.
भोपळा आणि चीची आता रोज एकत्र चालत होते. ते दोघे जण त्यांच्या दोस्तीवर खूप खुश होते.

एक दिवस, भोपळा आणि चीची एका नदीच्या काठावर गप्पा मारत बसले होते. गप्पा मारता मारता भोपळा चीची ला म्हणाला मला वाटते माझी स्वतःची सुंदर बाग फुलवावी तिथे मला छान वाटेल कोणी मला चिडवणार नाही सतवणार नाही. चीची म्हणाला नक्कीच पण त्यासाठी आपल्याला नदी पलीकडील तीरावर जावे लागेल तेथील जागा बागेसाठी योग्य राहील पण नदी ओलांडून जायचे कसे नदीचे पात्र खूप खोल होते आणि पाणीही खूप वेगाने वाहत होते. ते पाहून भोपळा खूप घाबरला आणि चीची ला म्हणाला चीची तू ही नदी पार करू शकतो पण मी नाही पार करू शकत ”

चीची त्याचे बोलणे ऐकून म्हणाला, “दोस्ता, असे घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे.तू माझ्या पाठीवर स्वार हो मग आपण दोघे एकत्र नदी पार करून.पलीकडे पोहोचू” नंतर भोपळा चीचीच्या पाठीवर स्वार होऊन नदी पलीकडील तीरावर पोहोचला .चीची च्या पाठीवर बसून नदी पार करताना
भोपळ्याला खूप मजा आली.
नदीच्या पलीकडे एक सुंदर बाग होती. भोपळा आणि चीचीने तिथे अनेक रंगीबेरंगी सुंदर सुंदर फुले पाहिली ती सुंदर सुंदर फुले त्यांना बघून हसू लागली होती .मग ते दोघे त्या फुलांजवळ गेली . आणि त्यांच्याशी गप्पा मारू लागली फुल त्या दोघांना आपल्या बागेविषयी छान छान माहिती देऊ लागली
भोपळा चीची आणि बागेतील रंगीबिरंगी फुलांची गट्टी जमली..
आणि फुलांसोबत जमलेल्या गट्टी मधून त्यांना आपली बाग फुलवण्याविषयी छान माहिती मिळाली..
ते एकमेकांना म्हणाले की जीवनात अनेक सुंदर गोष्टी आहेत, पण त्या मिळवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागतो.
त्यांच्या गप्पा रंगात आल्या असताना
त्या सर्वांना तिथे एक छोटी खारुताई दिसली ती झाडावरून छोटे छोटे फळ तोडून खाण्यात गर्क होती . मग ती सर्व त्या खारुताई जवळ गेली खारुताई त्यांना बघून गोड हसली आणि आपल्यापुढ्यातील गोड फळ त्यांना खाण्यास दिली.
त्यांनी खारूताईला तिचे नाव विचारले
खारुताईने तिचे नाव पिंकी सांगितले
पिंकी खारुताई नावाप्रमाणे खूप मायाळू आणि खुश होती. ती भोपळा आणि चीचीला म्हणाली, “मी एक छोटासा प्राणी आहे, पण मी खूप गोष्टी करू शकते.”

मग भोपळा पिंकीला म्हणाला, “तू खूप गोष्टी करू शकतेस, मग मला माझी बाग फुलवण्यासाठी मदत कर ..चीची आणि मी तुझ्यासोबत काम करू.” पिंकी त्यांना म्हणाली आपली स्वतःची बाग , छान आयडिया
“चला, आपण एकत्र कामाला लागू.”
या दोघेही माझ्या मागे असं म्हणून पिंकी त्यांना एका वाळूच्या ढिगार्‍यावर घेऊन गेली.
तिथे भोपळा, चीची आणि पिंकीने वाळूच्या साह्याने छोटेसे घर बनवले . त्यांनी तिथे अनेक छोटी छोटी फुल झाडे आणि फळांची झाडे लावली .
काही दिवसांनी आपल्याला आपण लावलेल्या झाडांची फळे खायला भेटतील म्हणून ती सर्व खुश झाली.
मग सर्वांनी आपल्या कामाची विभागणी केली. खारुताईने बाग साफ करायची जबाबदारी घेतली, ची ची झाडांना पाणी टाकू लागला, भोपळा झाडांची राखण करू लागला
हळूहळू त्यांची बाग बहरु लागली. आणि नवीन नवीन मित्र त्यांच्या बागेत जमू लागली. नवीन नवीन मित्र भेटल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार वाढू लागला..
बागही बहरु लागली..भोपळ्याने चीची ,आणि पिंकी च्या मदतीने स्वतःची सुंदर बाग फुलवली .. स्वतःची बाग बघून तो खूप आनंदी झाला..व आपल्या दोस्तांसोबत बागेत आनंदाने राहू लागला ..

बालपणातील आठवण..

दर्शना ओमकुमार भुरे..

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!