कागदाची नाव – बालकथा
कागदाची नाव – बालकथा

कागदाची नाव – बालकथा

कागदाची नाव – बालकथा

सकाळपासून बाहेर जोरदार पाऊस पडत होता. रविवारची सुट्टी असल्यामुळे विजय बाल्कनीतील झोपाळ्यावर अगदी आरामात बसून गरमा-गरम चहाचा आस्वाद घेत..घेत पावसाचा मनसोक्त आनंद लुटत होता. त्याचा लहान मुलगा अन्वय आणि शेजारील त्याची मित्र मंडळी त्याच्या घरासमोरील अंगणात एकमेकांच्या अंगावर पावसाचे पाणी उडवत खेळत होती . खेळता-खेळताच अचानक सर्व मुले आपसात काहीतरी कुजबुजली आणि लगेच आपआपल्या घरात धावत गेली. अन्वय ने सुध्दा घरात धावत- धावत येऊन त्याच्या शाळेचे दप्तर उघडून वही बाहेर काढली. आणि अगदी बेफिकिरपणे वहीची पाने फाडायला सुरुवात केली. विजयला आपल्या मुलाला एवढ्या बिनधास्तपणे वहीची पाने फाडताना बघून आपले बालपण आठवले..

“कसं आपण वहीचे एकेका पान मिळविण्यासाठी अगदी आपल्या जीवाचे रान करत होते.. आपल्या वडीलांची आर्थिक परिस्थिती अगदीच बिकट होती. 

ते दारोदार वणवण हिंडून चणे फुटाणे विकत होते. तर आई घरोघरी फिरून लोकांची धुणीभांडी करीत होती. त्यातून चार पैसे मिळत होते. त्यात आपला कसाबसा उदरनिर्वाह चालत असे. कधी कधी तर .. 

एक वेळच्या पोटभर जेवणासाठी सुध्दा आपण तरसत होतो. पण याही परिस्थितीत शिक्षण घेण्याची जिद्द काही मनाला शांत बसू देत नव्हती. इकडच्या तिकडच्या मित्रांकडून मागून आणलेल्या जुन्या पुस्तकांवर बरेचदा भागत होते. पण कधी कधी मित्र पण पुस्तके द्यायला भाव खाऊन जात होती. आणि वह्यांच काय त्या तर आपल्याच आपल्याला विकत घ्याव्या लागत होत्या. त्यांचा खर्च खिशाला परवडणारा तर नव्हताच.शिवाय एखाद दुसरी वही विकत घेऊन चालणार नव्हतं. मग अशावेळी वडील गावातील ओळखीच्या रद्दीवाल्याकडून किलोच्या भावात वह्यांची कोरी पाने विकत आणून त्याची घरीच सुई दोर्याने शिवून वही बनवून देत… त्याच वह्या आपण त्या परिस्थितीत किती आनंदाने वापरत होतो.

कधी कधी जवळ वही नसल्यामुळे गृहपाठ अर्धवट रहात होता. म्हणून मास्तरांचा मारही सर्वांसमोर अनेक वेळा खाल्ला.. इतर मुले वर्गात कधी-कधी नवीन वह्यांची कोरी पानं टराटरा फाडून त्या कागदांची नाव, विमान करून खेळत तर कधी-कधी कागदाचे बोळे करून एकमेकांवर फेकून विनाकारण मारामारी करीत असत. तेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये नकळत पाणी येत असे.कोणाचे लक्ष नसताना ते कागदाचे सर्व तुकडे उचलून जपून ठेवून वापरत होतो. त्यमुळे मुले चिडवत होती. टिंगल करीत होती. वही चे एक न एक पान त्यावेळी आपल्यासाठी किती अनमोल होत. आणि आता आपलाच मुलगा….”

“बाबा…बाबा… मला कागदाची नाव बनवून द्या ना….”असे 

म्हणत अन्वय विजय समोर कोरे कागदं हातात घेऊन उभा राहिला. त्याच्या आवाजाने एकदम विचारांच्या तंद्रीतून जागे होत विजय अन्वयच्या हातातून कागद घेऊन कागदाची नाव बनवून देता-देता त्याला म्हणाला. “बेटा… हा कागद किती अनमोल आहे . माहीत आहे तुला .. आज तुला मी याचे महत्त्व सांगतो. ऐकायचे ? 

” सांगा ना बाबा मग…”

मला कागदाचे महत्व..तो उत्सुकतेने म्हणाला.. 

“तर मग ऐक….हा कागदच नसता तर… तुम्ही अभ्यास कशावर केला असता?? कागदच नसता तर… पुस्तके वह्या कशापासून बनवल्या असत्या?? हा कागदच नसता तर… डॉक्टरचे बिल, किराणाचे बिल कसे बनले असते… शेतकर्यांचा सात-बारा, शाळेचे प्रमाणपत्र अजून बरेचसे काही ..ज्यांच्याकडे हा कागद आहे त्यांना त्याचे मोल माहित नाही.आणि ज्यांना हा भेटत नाही त्यांच्यासाठी याची किंमत अनमोल असते….

म्हणून सर्वांनी जपून वापरावा… असा आहे हा अनमोल कागद ….. 

                 – दर्शना भुरे जैन

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!