लहानपणी आकाशात उडणाऱ्या पक्षाकडे पाहून पडणारे प्रश्न ‘आईला बोलून दाखवले.आणि खऱ्या अर्थात जागेपणी पाहिलेल स्वप्न मोठे झाल्यावर प्रत्यक्षात जीवनात वास्तवात उतरवले. परिस्थिती कुठेही आडवी आली नाही. हे सिद्ध करून दाखवले. वर्गाच्या शेवटच्या बाकावर बसणारा विद्यार्थी डॉक्टर. ‘ए.पी.जे अब्दुल कलाम’ देशाचा उत्तम वैज्ञानिक बनू शकतो.
तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही का… नाही बनू शकत? “उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येय गाठत नाही, तोपर्यंत जिद्द सोडू नका”. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने बाल वैज्ञानिक निर्माण व्हावे. त्यांना पडणारा प्रश्नांची उत्तरे त्यांनाच सोडवता यावी. या उद्देशाने शहरातील, तळागाळातील शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून अनेक विषयाला हात घालत विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून त्यांच्यात असलेल्या कौशल्य निर्मितीतून उत्तम वैज्ञानिक निर्माण व्हावा. त्यांनी केलेले अनेक प्रयोग हे यशस्वी ठरले. त्यासोबतच “मिसाईल मॅन” म्हणून ओळखले जाणारे लेखक, शिक्षक, वैज्ञानिक, अभियंता, प्रोफेसर, राजनीतिज्ञ अशा महान व्यक्तिमत्त्वाला सलाम करत. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आदर्श घेतला आणि यशस्वी वाटचाल केली. “विज्ञानाची किमयाणारी अचंबित दुनिया सारी ”
विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. आय. सी. टी. तसेच ए. आय. च्या माध्यमातून तर अनेक चमत्कारिक प्रयोग सिद्ध होत आहेत. माणसाच्या डोक्यातून निघालेल्या नवनवीन कल्पना तसेच अनेक प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञानाची प्रगती होत आहे. इंजिनीयर, डॉक्टर आपल्या क्षेत्रामध्ये विज्ञानाशी मैत्री करून नवनवीन प्रयोग यशस्वी करत आहेत.
वर्तमान जर आपण बघितला तर आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम व अभ्यासू वृत्ती आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टीतून उत्तम विद्यार्थी शिकू शकतो.विद्यार्थ्यांशी स्वतः संवाद ‘मन की बात’ हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना बोलक केलं. विद्यार्थी जीवनामध्ये गुरुचे महत्व अधिक असतं. ते आयुष्याचे दिशादर्शक असतात हे विद्यार्थ्यांना उत्तम रित्या त्यांनी पटवून दिलं. तसेच घरातील संस्कार, उत्तम विचार, संगत, समाजातून मिळत असलेल अनौपचारिक शिक्षण यातून हळूहळू विद्यार्थी घडत असतो. अशा महान व्यक्तींचा अभ्यास जर आपण केला तर कठीण परिश्रम, जिद्द, चिकाटी ह्या गोष्टी भविष्यात यशाच्या मार्गाने घेऊन जातात.
“जर तुम्हाला सूर्यासारखे
चमकायचे असेल तर,
प्रथम सूर्यासारखे
जळावे लागेल.”असा संदेश गुरु आपल्या कृतीतून नेहमी देत असतात. विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे याचा वापर जो आयुष्यात करत नाही, तो खरोखरच आंधळा आहे.
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो,
“विज्ञानाची क्रांती
विज्ञानाची प्रगती
विज्ञानाचा नवा ध्यास
विज्ञानाने देशाचा विकास!”म्हणूनच शाळा स्तरावर अशा विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करणे विज्ञान प्रदर्शनीतून विद्यार्थी करतात. नवनवीन अविष्कार विद्यार्थ्यांच्या हितासाठी उत्तम रित्या काम करतो. चला तर मग “तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमची आयुष्य….!”
सौ. सुरेखा गजानन मोगरे
कलाध्यापिका
विश्वनाथसिंह बयास हिंदी हायस्कूल, पुसद
जिल्हा -यवतमाळ
9011976555











विज्ञानाने देशाचा विकास… छान लेख