रंगआठवणीतले-मराठीभूतकथा
रंगआठवणीतले-मराठीभूतकथा

रंगआठवणीतले-मराठीभूतकथा

रंग आठवणीतले-मराठीभूतकथा

 

रत्नाकरने सुरू असलेले चित्र पूर्ण केले.चित्र काढणे त्याचा श्वास बनून गेले होते.त्या शिवाय तो कसा जगणार? मीराला खूप सारी चित्रे दाखवायची होती.मीरा सतत त्याला प्रेरणा देणारी. तो खूप मोठा चित्रकार बनायलाच पाहिजे ही अंतरमनात असलेली तळमळ त्या करिता मीरा किती मेहनत घेत होती. मीराची आठवण येताच तो कासावीस झाला.कधी मीराला भेटतो असे त्याला वाटायला लागले.तसाही एवढ्यात तो एकटेपणाला कंटाळला होता. . हे सर्व सोडून खूप लांब निघून जावे आणि खूप आराम करावा असे झाले होते त्याला.कुठे तरी मीरासोबत फिरायला जाऊन छान आराम करावा आवडीचे सिनेमे बघावे ..मनसोक्त गप्पा कराव्यात असे वाटायचे.सुंदर ..सुंदर फुललेले झाडे , त्यांचे मोहक रंग त्याला खुणवीत होते.तो घरी आला.घरात नोकर होता .त्याने छान वाफळलेला चहा आणला.समोरच अलबम पडून होता.आठवणींचा खजिना ..रोज..रोज बघायचा आणि आठवणीत रमून जायचे.किती तरी वेदना दुःख पुन्हा पुन्हा उगाळत बसायचे .किती यातना सहन करायच्या या मनाने ? मन अगदीच व्याकुळ होऊन जाते तरीही एक आस मनाला स्वस्थ न बसू देणारी.

मनाच्या यातना त्याची वेदना कुणालाही न कळणारी पण अमर्याद.त्याला मर्यादा नाही…अगदिच हळूवार फुलपाखराप्रमाने येतात पण मन व्यथित आणि घायाळ करून जातात.रक्तबंबाळ करून सोडतात.

रत्नाकरला अल्बम बघितल्याशिवाय चैन पडेना
ते रोजचे काम झाले होते.
. .जखमेवरच्या खपल्या तरी किती वेळा काढायच्या.आतमध्ये जखम तर …रक्तबंबाळ …ताजी.
अलबम काॕलेजच्या दिवसांचा होता.त्याचे मित्र ..आणि त्याचे सर्वस्व…मीरा… गोड दिसायची मीरा

मीराचा लाघवी स्वभाव कुणालाही प्रेमात पाडायचा.सालस..सोज्वळ…देखणी…कोणालाही चटकन आपले करून घेणे तिला लिलया जमायचे.रत्नाकर आणि मीरा लहानपणापासून एकाच वर्गात होते.दोघांची छान मैत्री…मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले ते कळलेच नाही.रत्नाकरला खूप मोठा चित्रकार बनायचे होते.त्याचे चित्र शाळा …काॕलेज मध्ये खूप प्रसिध्द होते.
त्याची खरी प्रेरणास्रोत होती मीरा..तिला दाखविल्या शिवाय त्याचे एकही चित्र पूर्ण होत नसे.ज्या दिवसी मीरा येत नसे त्या दिवसी तो रंगाकडे बघायचा नाही.मीरा त्याला रागवायची…समजावून सांगायची..पण त्याचे मात्र ठरलेले उत्तर राहायचे…

अग मीरा तुझ्या  शिवाय  या कुंचल्यात मी रंग कसे भरू?तूझ्याशिवाय मला सर्व  रंगहीन  वाटते.तू समोर असली तर आपोआप सुंदर  रंगसंगती  होत जाते आणि  सुंदर  कलाकृती  जन्म  घेते..तुझ्या  शिवाय सर्व  बेंरग आहे ग

मीराला तर त्याच्या  वेडेपणाची भीती  वाटायची.दिवस  चालले होते.रत्नाकर खूप  प्रसिध्द  झाला होता.त्याच्या  चित्राचे  प्रदर्शन  भरायचे.मीरा तर खूपच  आनंदी  होती  तिचा  रत्नाकर  यशाचे मार्ग  ओलांडून  जात होता..ज्या  क्षणाची ती वाट बघत होती …तो क्षण जवळ येत होता.तिला रत्नाकर खूप  मोठा  चित्रकार झालेला  पाहायचे होते.मीरा श्रीमंत घरातील ….घरात नोकर..चाकर…सर्वच  तिच्यावर  खूप प्रेम  करायचे.
निसर्गाच्या  कुशीत  नटलेले त्यांचे गाव…दोघेही  छान  फिरायचे …स्वप्ने  बघायचे…कधी गाडीने  तर कधी रेल्वेने  फिरायचे .गावाला लागूनच  रेल्वेस्टेशन होते.चित्रांचे प्रदर्शन  असले  कि दोघेही  सोबत  जायचे …
जवळच्या  शहरात रत्नाकरच्या चित्राचे प्रदर्शन  भरणार होते.दोघेही  गाडीवर निघाले.दोघेही  खूप  आंनदात होती.पण  अचानक गाडीला अपघात झाला ..दोघांनी  दवाखान्यात  भरती करण्यात  आले …दोघेही  बेशुद्ध  होते
देवाचा धावा सुरू  झाला.डाॕ.ने हात टेकले.
अचानक मीराला होश आला ती रत्नाकरला शोधत होती.
तिला  दुरूनच त्याला  बघावे  लागले.तिला  माहिती  होते  आपल्याला  काही झाले तर रत्नाकर जगू शकणार  नाही
त्याची स्वप्ने  कायम अपूर्ण  राहतील.मला जगायलाच हव रत्नाकरसाठी.त्या  करिता तिने देवाला  साकडे घातले.
आठ दिवसांनी  रत्नाकर होश मध्ये  आला .त्याचे डोळे मीराला शोधत होते …तो डाॕक्टरला भेटला.  तिला परदेशात नेले.. आणि  आता ती तिकडेच राहणार ..असे  ते बोलले त्याला  तर काही  कळतच नव्हते .वेडा झाला होता तो .त्याने ते गाव सोडले ..चित्र  काढणे  बंद  केले …सारखा मीराच्या आठवणीत गुंग राहत असे …मीराचा त्याला  खूप  राग येत होता…आता तर तिचे लग्न  पण  झाले असेल…मला तर  ती  कायमची  विसरून  गेली  असेल.तो सारखा तिच्या  विचारात  गुंग असायचा.
असेच एक  दिवस पोर्णिमेच्या रात्री  तो उदास  बसून  होता .मागून  खांद्यावर  हळूच  हातांचा स्पर्श  झाला …हा स्पर्श  तर मीराचा …मीरा…मीरा.. तो आवाज देत होता ..
मीरा मागे उभी होती.तिच्या  डोळ्यात  अश्रू  होते. तो चिडला  होता.त्याला  खूप प्रश्न  विचारायचे होते.तू का अशी वागली?मला सोडून  कुठे  गेली होती ? ….खूप ….खूप  बोलायचे होते.पण  मीरा फक्त  बघत होती.
रत्नाकर तू मला आधीसारखा हवा आहेस. चल ऊठ  आणि  चित्र  काढ…तो ऊठला भराभर  चित्र  काढू लागला…
मीरा तू मला सोडून  जाऊ नको..तो सांगत  होता.
बर बाबा….मी नाही  सोडून  जाणार.
पण   आता समोर नाही भेटता येणार  आपल्याला. मी पुन्हा  परदेशी  जाणार  आहे. तिथे  उपचार  सुरू  आहेत  माझ्यावर.नंतर  भेटू असे सांगून  ती निघाली   रत्नाकरने तिला  घट्ट  पकडले.मला सोडून  जाऊ नको  मीरा तो विनंती  करत होता.पण  मीराने त्याचा हात सोडला ती निघून  गेली. तो फक्त  बघत राहिला.
मीराचे वागणे  त्याला  आवडले नाही. का अशी वागली असेल मीरा याचा  तो विचार  करत होता.पण तिच्या सहवासात पुन्हा  त्याच्या  आशा पल्लवित झाल्या.तो नव्या  जोमाने  चित्र  रंगवू लागला. आता  तो  मोठा  चित्रकार झाला होता
पण मीरा कुठे  हरवून  गेली  कळत नव्हते …
मीराला शोधायला  निघाला  होता  तो…पुन्हा  त्या  आठवणी …मिटून  गेलेल्या  खूणा तो शोधत होता..कदाचित  डाॕ.ला माहिती  असेल सर्व ..तो त्या  गावात आला.
डाॕ.बघतच राहिले…किती  बदलला  होता  रत्नाकर
मीरा कुठे  आहे सर…please  मला सांगा…मी तिची  वाट बघत  आहो.
अरे ती उपचार  घेण्यासाठी  परदेशी  गेली  आहे डाॕ सांगत   होते .
हो…माहिती  आहे मला…पण  ती आली होती  मला भेटायला  …माझ्यात स्वप्नांचे रंग भरून  निघून  गेली.
कसे शक्य  आहे रत्नाकर ?कसे सांगू  तुला  मीराने वचन  दिले  होते  मला पण  मी डाॕ. आहे तुझ्याशी  कसा खोटे बोलू?
अपघात  झाल्यानंतर  मीरा शुध्दीवर आली होती …तिला  तुझी खूप काळजी वाटत होती.काही  झाले तरी चालेल पण रत्नाकर  उध्वस्त  झालेला मला बघायचे नाही. म्हणून  तिने आमच्या  कडून  वचन  घेतले. चार दिवसांनी  ती कायमची  सोडून  गेली.
रत्नाकर शून्य  नजरेनं  बघत होता …मीराने मेल्यावरही त्याची साथ सोडली नव्हती .त्याला  किती  प्रेरणा  देत होती .त्याच्या  रंगात रंगून  गेली  होती.तो चांगला  चित्रकार म्हणून  नावारूपास यावा यासाठी  किती  तळमळ होती  तिची.खरे प्रेम  केले  होते मीराने.या जगात  ती नव्हती  पण तिला सतत  त्याच्या  सोबत जगायचे होते.तिची अतृप्त इच्छा ….तिचे राहिलेले स्वप्न  पूर्ण  करायचे होते.त्याच्या   स्वप्नाला भरारी द्यावयची  होती.
रत्नाकला आता मीराचे स्वप्न  पूर्ण  करायला जगायचे होते.
तो पुन्हा  नव्याने  रंग  भरायला लागला..फक्त  आणि  फक्त  मीरासाठी.
ज्योती रामटेके
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

2 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!