आज (२८ जानेवारी) सुमन कल्याणपुरकरांचा वाढदिवस.त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
सुमनजींच्य गाण्यांची ओळख झाली मराठी गाण्यांपासून.त्यातही पहिले गाणे आठवते
नाविका रे वारा वाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे.
अतिशय माधुर्याने भरलेले हे गीत आहे.यातील
धाव घेई बघ माझे मन…
सांजवेळ झाली आता…पैल माझे गाव रे…ओळ विशेष गोड.
निसर्गाचे अप्रतिम वर्णन असलेले हे सुमनताईंच्या आवाजातील गीत कितीदाही ऐकले तरी समाधान होत नाही.
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर
बहिणाईंनी लिहिलेले संसारावरील यथार्थ गाणे.
सुमनताईंंच्या आवाजातील हे गाणे कवितेतील गंभितार्थ
अचूकपणे आपल्यापर्यंत पोहचवते.
केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर
अशोक परांजपे यांनी लिहिलेले हे नितांतसुंदर गीत अशोक पत्कींनी स्वरबद्ध केले आहे.आणि सुरेल,मधुर गायले आहे सुमनताईंनी.
अंगाई गीत म्हंटले कि
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही
हे गीत आठवल्याशिवाय राहत नाही.
मराठी आई आपल्या बाळासाठी हेच गीत गातात.
बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील हे अंगाई गीत मधुसूदन कालेलकर यांनी लिहिले.आणि एन. दत्ता यांनी संगीतबद्ध केले आहे. सुमन कल्याणपूर यांनी अगदी शांत शांत आवाजात ही अंगाई गायली आहे.
वाट इथे स्वप्नातील संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू
गीतातील ओळीओळीत निसर्ग आहे.
अशोक पत्की यांचे अवीट संगीत आणि सुमनताईंचा प्रसन्न दैवी आवाज.गाणे ऐकतांना ऐकतच रहावे…..असे वाटत राहते.
सुमनताईंची मराठीत अवीट गोडीने भरलेली गाणी आहेत तसेच हिंदीतही त्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत.
ना तुम हमे जानो….
न तुम हमें जानो
मगर लगता है कुछ ऐसा
मेरा हमदम मिल गया
बात एक रात की सिनेमातील, एस.डी.बर्मन यांनी स्वरबद्ध केलेले,मजरूह सुल्तानपुरी यांच्या लेखाणीतून उतरलेले हे गीत सुमनताईंच्या आवाजात ऐकतांना डोळे कधी भरुन येतात कळतही नाही.हे गीत सुमताईंच्या आवाजामुळे ह्दयस्पर्शी बनले.
नजर बन गयी है,दिल की जुबां…लाजवाब शब्द,गायकी
अपने पिया की मैं तो बनी रे जोगनिया
हँसी उड़ाये चाहे सारी दुनिया
मैं तो बनी रे जोगनिया
पंडित शिवहेमजी यांचे संगीत,भरत व्यास यांचे शब्द आणि सुमनताईंचा आवाज….गाण्यात समर्पण भाव ओतप्रोत भरला आहे.
बहना ने भाई की कलाई से प्यार बाँधा है
प्यार के दो तार से, सँसार बाँधा है
रेशम की डोरी चित्रपटातील हे गीतशैलेन्द्र यांनी लि.सहिले आहे.संगीत शंकर-जयकिशन यांचे आहे.अर्थाचत बहिणीची माया मधुर आवाजात व्यक्त झाली आहे सुमन कल्यानपुर यांच्या स्वरात.
याशिवाय रफी,मुकेश,किशोरकुमार,मन्नाडे या दिग्गज गायकांबरोबर सुमनताईंनी तेवढ्याच ताकदीने गायलेली द्वंद्व गीते आहेत.
रफी यांच्या बरोबर
ना ना करते प्यार तुम्हीसें कर बैठे
आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे
ऐसे तो ना देखो
तुमने पुकारा और हम चले आये है….
रफी आणि सुमन कल्याणपुरकर यांची अतिशय मधुर,आल्हाददायक द्वंद्व गीते आहेत.
मुकेश सोबत
मेरा प्यार भी तू है
आया ना हमको प्यार जताना
हाँ मैने भी प्यार किया
अँखियोका नूर है तू,अँखियोसें दूर….
ये मौसम,रंगीन समां
किसने गीत छेडा
मन्नाडे सोबत
भीगी हवामें तेरी अदाएँ….
तुम जो आये तो….
ये नशीली हवाँ,छा रहा है नशा
जबसे तुम्हें देखा है….
ना जाने तुम कहाँ थे….
किशोर कुमार सोबत
ना जाने कैसे….
सुनोजी तुम बडे वो हो…
कर गयी मस्त मुझे
हम मुहब्बत ना जाने
तेरा मेरा मेरा तेरा…..
एकापेक्षा एक दर्जेदार गाणी गाणाऱ्या, अवीट गोड सुरांची धनी असलेल्या, महान गायिका सुमनताईंना निरामय आयुष्याच्या शुभेच्छा………
प्रिती गजभिये











अप्रतिम
छान लिहिले
सुंदर लिहिलाय
खूप छान
अप्रतिम 👌
Chana ch