१२-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
Written by-ज्योती रामटेके
सुरेख संसार सुरू होता दोघांचा. सर्व विसरून दोघे आनंदात होते. पियूषचे शेती करणे सुरू होते. जोडधंदा म्हणून दुकान सुरू करण्याचा चंदनाच्या बाबांनी सल्ला दिला.
आई,बाबा मध्ये मध्ये नौकरीचा विषय काढायचे पण चंदना काहीतरी कारणे सांगून तो विषय टाळायची. शेवटी त्यांनी विचारणे कमी केले. त्यांना मुलगी सुखात दिसत होती. काही कमी नव्हते. अपर्णाचे शिक्षण सुरु होते. आई, बाबा आता निश्चिंत झाले होते.
दुकान सुरू करायला बाबा मदत करणार होते. चंदना अधूनमधून शेत बघायला जायची.
पियूष चे मित्र जेवायला यायचे.त्यांना चंदनाने बनवलेला स्वयंपाक अतिशय आवडायचा. खासकरुन तिच्या नरम लुसलुशीत पोळ्या.
अशा नरम पोळ्या मी तरी अजून बघितल्या नाही असे खाणारे म्हणायचे. कशा करता हो वहिनी पोळ्या असे सर्व विचारायचे.
चंदनाला मुळातच आवड होती.तिची आई पण अशाच सुंदर पोळ्या करायची. सुमनताईच्या स्वभावात कौतुक हा शब्द नव्हता त्यामुळे त्या काही बोलायच्या नाही.दोन वेळ जेवण मिळने हे त्यांच्या करता महत्वाचे होते. तसीही त्यांना स्वयंपाकाची विशेष आवड नव्हती. नमु चंदनाच्या मागे,मागे राहायची. मैत्रिणी झाल्या होत्या त्या.
रीनाच्या घराचे बांधकाम सुरू होते.
चंदनाला दिवस गेले.आपण आई होणार या कल्पनेने ती आंनदी होती. पियूष तिची खूप काळजी घेत होता. बाबा रोज येत होते. रोज आई काहीतरी खायला पाठवायची. अपर्णा मावशी होणार म्हणून खूष होती. प्रत्येक दिवस आनंदात न्हाऊन निघत होता. पियूष स्वयंपाक करायचा. रोज चंदनाला गरम खाऊ घालायचा. सातव्या महिन्यात माहेरी बाळंतपण करायला ये म्हणून आई, बाबा मागे लागले. पियूषला करमणार नाही हे चंदनाला माहित होते. पियूषला तर तिच्या शिवाय दोन दिवस करमत नव्हते. शेवटच्या महिन्यात माहेरी जायचे ठरले.
चंदना माहेरी गेली. पियूषला तिच्या शिवाय करमत नव्हते.
रोज तो एकदा तरी तिच्या माहेरी जात होता. थोड्या दिवसांनी चंदनाच्या पदरात सुंदर, गोंडस बाळ आले. अपर्णा,आई, बाबा आंनदी होते. सुमनताई बाळाला बघायला आल्या. पाच मिनिटे थांबून नेहमीप्रमाणे कामे आहेत भरपूर असे सांगून निघून गेल्या. सासरे रोज येत होते. चंदना दोन महिने राहून सासरी आली.पियूषच्या मदतीने दोघेही बाळाला सांभाळायचे.नमु चंदनाला मदत करायची. रीना तिच्या नविन घरात राहायला गेली. पियूष शेतात भरपूर उत्पादन काढत होता.
काही दिवसांनी घरात दुसरे बाळ आले. पियूषला मुलगी हवी होती. त्याची इच्छा पूर्ण झाली.
पियूष-आता आपला संसार कसा बहरेल बघ चंदना. घर कसे भरल्यासारखे वाटत आहे. आता घरातील खर्च वाढणार.
मला जास्त मेहनत करायला हवी. त्यांना कशाची कमी नको पडायला. आजकाल शिक्षण किती महाग झाले आहे.
कसे सुखात लोळले पाहिजे दोघे.माझी गार्गी तर किती गोड दिसते.तिला तर पायलट बनवायचे आहे मला.आपल्या शहरातील पहिली पायलट.
चंदना -बरे बाबा.. आणि प्रेमला काय बनवायचे?
पियूष -हे बघ मुलगा तुझा आहे तुच ठरव. तो तुझ्या जास्त लाडाचा आहे. मला काय वाटते चंदना त्याचे बाबाच ठरवतील. तो तसाही बाबाजवळ जास्त राहतो. तेच अभ्यास घेतात त्याचा. मला आता शेतीला हातभार म्हणून दुकानाचे बघावे लागेल. मुले मोठी होत आहेत . आपल्याला खर्च झेपायला हवा. तू पण आता बी,एड चे बघ. गावातच जमले तर फारच बरे होईल.
मी आजपासून दुकान शोधायला सुरुवात करतो.
अरे हो, तुला सांगायला विसरलो तो माझा मित्र राम आहे नं
त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे उद्या. स्वयंपाकाची जबाबदारी तुझ्यावर टाकली त्याने.
मी नाही म्हटले पण तो मागेच लागला शेवटी हो म्हटले मी.अग एकदा त्याला जेवायला बोलावले तेव्हापासून चांगलाच चटकला तो.
मदतीसाठी बाया आहेत तू भाज्या करायच्या.
चंदना -करते मी, तुम्ही काही काळजी करु नका. चांगले मित्र आहेत तुमचे ते नाही म्हणणे बरे दिसणार नाही. उद्या किती वाजता जायचे आहे तिकडे. मुलांना आईकडे सोडून देईल.
चंदना तुझे आई,बाबा आहेत तर काळजी नाही. अपर्णा पण किती जीव लावते .
पियूष- माझ्या आईने तर कधी प्रेमाने स्पर्श नाही केला त्यांना.सतत घाई असते तिला. काही म्हटले तर
तिचे एकच ठरलेले कारण हे सर्व तुमच्यासाठी करते.
तिला हे कसे कळत नसेल कि हा काळ पुन्हा वापस येणार नाही. सतत पैशाच्या मागे असते ती. या उलट बाबा आहेत .
शांत, संयमी. बाबांनी टिकवला संसार.
क्रमशः
https://marathi.shabdaparna.
आधीच्या भागाची लिंक
https://marathi.shabdaparna.in/११सुन्या
कशी वाटत आहे कथामालिका…अवश्य कळवा.
प्रिय वाचक,तुम्हीही लघूकथा,कथामालिका,लेख,रसग्रहण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.








छान
Khup rangat ahe katha,mast….