११-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
Written by-ज्योती रामटेके
चंदनाने बी..एड करण्याचे ठरवले. पियूषचे शेती करणे सुरू होते. लग्नाला सहा महिने झाले होते. पियूष नौकरी बद्दल काही बोलत नव्हता. तो दुखावला जाईल म्हणून चंदना विषय काढत नव्हती. पण तिच्या एक गोष्ट लक्षात आली होती कि पियूषच्या शिक्षणाच्या बाबतीत आपली फसवणूक झाली आहे. पण पियूषला कसे विचारणार?
तो नाराज होईल, त्याला वाईट वाटेल ही भीतीही होती.
बरेचदा शिक्षण विषयावर त्याला जास्त काही माहिती नसायचे. चंदनाला आश्चर्य वाटायचे.
एकदा हिंमत करून तिने नौकरी बद्दल विचारले. पियूष हसला. मला कोण नौकरी देणार?मी साधा बारावी झालेलो.
तुम्हाला गंमत करायची फार वाईट सवय आहे चंदना हसली.वेळ,काळ पाहून गंमत करावी माणसाने.
ही गंमत नाही चंदना मी खरेच बारावी आहे.
आईने तुम्हाला सांगितले नाही का?चंदनाची शंका खरी ठरली होती.
आईने आम्हाला B..com सांगितले होते. कसे शक्य आहे. मी प्रथम तुझ्या घरी तुला बघायला आलो तेव्हा सर्व गोष्टी स्पष्ट वाटल्या मला.मला तर शंका पण नाही आली आई खोटे बोलेल म्हणून. मी B..com ला प्रवेश घेतला होता. नंतर मी शेतात गुंतलो. आईला हे सर्व माहिती आहे.चंदना मी तुलाच हे सर्व सांगायला हवे होते.
प्रथम तुझ्या घरी आलो तेंव्हा या विषयावर आपले बोलणे नाही झाले.तुझे शिक्षण माझ्या पेक्षा जास्त आहे हे मला माहीत होते पण मला वाटले कदाचित तुला पण शेतीची आवड असेल. म्हणून तू हो म्हणाली असशील. मी तुझी फसवणूक नाही केली ग चंदना. मला माफ कर नकळत माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे.
चंदनाला काय बोलावे कळत नव्हते.आई..
बाबांनी सुमनताईवर किती आंधळा विश्वास ठेवला होता. आता या गोष्टीचा काही फायदा नव्हता. आई,बाबाला कळले तर किती दुःखी होतील ते.मला तर कल्पना करवत नाही. आयुष्यभर दुःखात होरपळत राहतील ते. त्यांना काही कळायला नको. त्यांच्या पासून सर्व लपवून ठेवावे लागेल.
जे झाले ते झाले. मी सुखी आहे. माझ्यावर जिवापाड प्रेम करणारा पियूष खरेच साधा आहे.तो माझी फसवणूक कधीच करणार नाही. मी त्याला शेतीमध्ये मदत करेल. नाही माझ्या बरोबरीने शिक्षण.
काय फरक पडणार त्याने. पियूष माझ्या साथीला नेहमीच असणार आहे. आईने केलेल्या चुकीची शिक्षा मी त्याला का देऊ?
रात्र झाली. सुमनताई घरी आल्या. चंदना शांत होती.
पियूषने त्यांना जाब विचारला. तू खोटे का बोलली. का त्या साध्या लोकांना फसवले हे रागाने विचारत होता.
मी हे सर्व तुझ्यासाठी केले.तू आता B..com कर. मी बारावी म्हटले असते तर चंदना तुझ्या आयुष्यात आली नसती. तू एखादा व्यवसाय कर. चंदना हुशार, मेहनतीआहे. दोघे मिळून आयुष्याचे सोने कराल तुम्ही. सुमनताई
आपले खोटे ठामपणे खरी करुन सांगत होत्या.
नौकरी करणे म्हणजेच सर्वस्व नाही. आपण दोघे मिळून काही व्यवसाय करु. मेहनत करु. मार्ग असंख्य आहेत पियूष. हार मानायची नाही.मी आहे नं सोबत.चल, मागचे सर्व विसरून नव्याने, जोमाने आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द करु. होईल सर्व ठीक.मी करेल नौकरी.
चला जेवण करु. वातावरण निवळले होते. बाबा बाहेर गेले होते. घरी आल्यावर पियूषने सर्व सांगितले.
पियूष, चंदना या इकडे बाबानी आवाज दिला. चंदना या घरात तू नवीन आहे. खूप काही गोष्टींची तुला कल्पना नाही.
सुमन खूप स्वार्थी बाई आहे. ती फक्त स्वतःसाठी जगते. आपली जबाबदारी कशी दुसऱ्यावर टाकायची हे तिला चांगले कळते. तिला माहित होते आपल्याला चंदना सारखी सुन नाही मिळणार. तिच्या अशा वागण्याने दोन्ही मुले वेगळी राहतात.
आता रिना पण जाईल.
माझे ऐका तुम्ही दोघे वेगळे रहा. मी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. पियूष आहे मेहनती. चंदना तू खरेच चंदना सारखी आहेस.
स्वतः झिजून दुसऱ्याला आनंद देणारी. तुला बघायला आलो तेव्हा मला काही कल्पना आली नाही. सुमन असे करेल वाटले नाही. मला तर तिने बोलूच दिले नाही.
चंदना-नाही बाबा तुम्हाला सोडून नाही जाणार आम्ही. मला काही फरक नाही पडणार पियूषच्या शिक्षणाचा. त्याची शैक्षणिक पातळी जरी कमी असली तरी वैचारिक पातळी प्रगल्भ आहे.आई तशाही घरात कुठे असतात? सध्या ताई आहेत सोबत. त्या नवीन घरात जायला वेळ आहे अजून. हा विषय नंतर घरात कधीच काढणार नाही मी. उद्या सकाळी शेतात
जायचे आहे.मजा करु मस्त. बाबा तुम्ही पण चला. मला लहानपणापासून शेतात जायला आवडायचे. बाबाला मी म्हणायची,बाबा आपल्या घरी शेती हवी होती. ते हसायचे.आई म्हणायची तुला शेतकरी नवरा बघून देऊ.
चंदना,तू प्रगल्भ विचारांची आहेस.किती सहज सर्व विसरली तू. माफ करणे तुझ्याकडून शिकावे. आयुष्याच्या वाटेत पहिली स्त्री माझी आई तिच्या सारखी सोशिक, प्रेमळ स्री मला तुझ्यात दिसली. तो काळ तसा होता.स्रियांना बंधने होती त्यामुळे त्या तशा बनायच्या.
या काळात तुझ्या सारख्या मुली बहुतेक नसणार.
तुला कधीच कशाची कमी पडणार नाही.कोणत्याही संकटात मी तुझ्या पाठीशी राहिल.
क्रमशः
पुढील भागाची लिंक
https://marathi.shabdaparna.in/सुन्या
https://marathi.shabdaparna.in/२-सुन्या
https://marathi.shabdaparna.in/३-सुन्या-सुन्या-मैफिलीत
https://marathi.shabdaparna.in/४सुन्या
https://marathi.shabdaparna.
https://marathi.shabdaparna.in/६-सुन्या
https://marathi.shabdaparna.in/७-सुन्या
https://marathi.shabdaparna.in/८-सुन्
कशी वाटत आहे कथामालिका…अवश्य कळवा.
प्रिय वाचक,तुम्हीही लघूकथा,कथामालिका,लेख,रसग्रहण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.








फार मोठी फसवणूक चंदना ची.
वेगळं वळण घेतलं कथेनी.
छान कथा.