अर्धा राहिलेला डाव-मराठी लघुकथा
अर्धा राहिलेला डाव-मराठी लघुकथा

अर्धा राहिलेला डाव-मराठी लघुकथा

अर्धा राहिलेला डाव-मराठी लघुकथा
मिताने सकाळी मैसेजेस बघायला मोबाईल घेतला.एका  गृपवर  पोस्ट दिसली.
 Kirankumars dance show….. किरणकुमार…किरण… फोटो तर किरणचाच आहे. किरण…मोठा माणूस झाला…मिताने आनंदाने सुस्कारा सोडला.त्याला सोडून इथे आली पण सोबत होताच तो.
 एका पाठोपाठ त्याच्या आठवणी येत राहतात.ते सगळे डोळ्यासमोर तरळत राहते. आयुष्यातील सोनेरी दिवस कसे विसरणार?
 मिताच्या मनात मुंबईचे दिवस रुंजी घालायला लागले.सगळे डोळ्यासमोर आले.
मिता ब्युटीशियन.मुलगा सहावीत.नृत्य शिकायची इच्छा लहानपणापासून मनात होती.पण परिस्थितीमुळे जमले नाही.लग्नाआधी गरिबी होती.
वयस्क, श्रीमंत मयंकसोबत लग्न झाले.मयंक घटस्फोटीत,स्वभावाने कोरडा होता.
मुलगा झाला वेद. वेद जरा मोठा झाल्यावर मिताने पुन्हा पार्लर सुरु केले.मयंकने गोव्यात फार्महाऊस,काही जमीन घेतली.ती सांभाळायला तो जास्त वेळ गोव्यात राहू लागला. मिताला खूप  एकटे वाटायचे.पण मयंकच्या गरजा वेगळ्या होत्या.मिता तिचे चालणारे पार्लर आणि वेदची शाळा सोडून गोव्याला जाऊ शकत नव्हती.मयंकचीही तशी इच्छा नव्हती.वेद मोठा होत होता. त्यालाही आईसारखी नृत्याची आवड होती.मिताच्या मैत्रीणींनी एक डान्ससर शोधले….किरणकुमार.
तिथे मिता मैत्रीणींसोबत  नृत्य शिकायला जाऊ लागली. किरणकुमार जेमतेम विशी उलटलेला तरुण मुळ बनारसचा-अनाथ.बनारसमध्ये मंदिराच्या आसपास फिरत असायचा.तो पाच-सहा वर्षाचा असतांना मुंबईतून बनारसला गेलेल्या एका कुटुंबाने त्याला मुंबईला आणले.आणि काही दिवसांनी त्याला घरकामाला जुंपले.किरणमध्ये नृत्याचे गुण उपजतच होते.गाणे ऐकले कि त्याचे पाय आपसुक थिरकायचे.पण ज्यांच्यासोबत तो रहायचा त्यांना किरणचे नृत्य आवडायचे नाही.किरणने नृत्यासाठी घर सोडले.
आयुष्यात काही चांगली माणसे भेटली आणि निरक्षर किरण नृत्यशिक्षक बनला.
मिताची पस्तीशीला आली होती.किरणकुमारची कथा ऐकून तिला सहानुभूती वाटायची.अनाथ किरणसाठी काहीतरी करायला हवे असे तिला वाटत राहायचे.तिने वेदसाठी घरी किरणसरांचा क्लास लावला.किरणचे घरी जाणे येणे वाढले.मिताने त्याला लिहायला वाचायला शिकवले. एकटी राहात असलेली मिता किरणच्या आकर्षणाने वेढल्या गेली.मयंक तसाही महिन्यातुन एकदाच यायचा.
मिता एकटेपणाने त्रासली होतीच,किरणकुमारला आयुष्यात त्याच्यावर प्रेम करणारे प्रथमच कोणी भेटले होते.विस वर्षाचा एकटा तरुण,मागेपुढे कोणीच नाही.वहावत जाण्याचे वय आणि कारणेही होती.
दोघे जवळ आले. सिनेमा,हाॕटेल…मिता सगळीकडे त्याला सोबत नेऊ लागली. मयंकसोबतचे नाते विसरली. सगळ्या मर्यादा संपल्या.प्रेमातील हळूवारपणा प्रथमच तिने किरणसोबत अनुभवला.
कुठूनतरी मयंकला  हे कळले.
त्याने आधी तिला नृत्याचा क्लास बंद करायला लावला.किरणचे घरी येणे बंद केले.
तो किंवा किरण?दोघांपैकी  एकाची निवड मिताला करायची होती.
वेदच्या भवितव्याचा विचार करता पारडे मयंकच्या बाजूनेच झुकते होते.मिताने पार्लर बंद केले. वेदला घेऊन कायमची गोव्याला मयंकजवळ निघून गेली.तिचे नृत्य बंद झाले.
आज मिताला सगळे आठवले आणि खूप दिवसांपासून मनात येत असलेला एक विचार उफाळून आला.
वेद आता मोठा झाला.मयंकला माझी गरज कधी नव्हतीच.
पण मला गरज आहे प्रेमाची,भावनिक आधाराची…किरणची. नृत्याची.त्याला शोधायला मी मुंबईला जाणार होतीच.आता तोच इथे येत आहे.मी भेटते त्याला .आता आम्ही सोबत राहू शकू. अर्धा राहिलेला डाव पूर्ण करु.
मिता ठरल्या दिवशी कार्यक्रमाला जाते.
ह्दयात प्रेमाची आवर्तने सुरु असतात.किरण…मला अचानक बघून किती सुखावेल तो.जीवापाड प्रेम केले त्याने माझ्यावर.
कार्यक्रम सुरु झाला. आधी दोघा तिघांचे नृत्य झाले.किरणकुमारचा पदन्यास सुरु झाला.प्रत्येक ठेक्यावर तो लिलया नृत्य करत होता. ठेक्यावर मिताची पावलेही थिरकत होती.
मीता देहभान हरवून बघत होती.डोळ्यातून अश्रु वाहत होते.टाळ्यांच्या कडकडाडात नृत्य संपले. मिताने स्वतःला सांभाळले.उठून उभी झाली.स्टेजच्या दिशेने जलद पावले टाकायला लागली. तेवढ्यात एक announcement झाली
किरणकुमार आज घाईत आहेत.ते एअरपोर्टकडे रवाना झाले.आज त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे.
एक वर्षापासून सोबत असलेल्या त्यांची सहकारी कलिका सोबत उद्या त्यांची engagement …..पुढचे शब्द मिताच्या कानापर्यंत पोहचले नाही….एक बंध निखळून पडला.
प्रिती
प्रिय वाचक,कथा आवडल्यास नक्की  like,comment,share करा.तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.
तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!