वृक्षारोपण-marathi article
वृक्षारोपण-marathi article

वृक्षारोपण-marathi article

वृक्षारोपण-marathi article

वृक्षारोपण व संवर्धन ही आता काळाची गरज भासू लागली आहे. जंगल तोड रोखण्यास शासन प्रयत्नशील आहे परंतु जन माणसाने आपल्या परीने या मोलाच्या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे.

जंगलतोड प्रामुख्याने खेडेगावात चुलीला सरपण याकरिता मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे खेडोपाडी अशिक्षित वर्ग जास्त असल्याने त्यांचे संवर्धन व वृक्षारोपण हा मौलिक विषय त्यांना समजावणे थोडेसे कठीण जाते. खेडोपाडी शाळेतील कॉलेजमधील मुले यांचे द्वारे काही छोट्या डॉक्युमेंटरी फिल्म बनवून किंवा गावागावात जाऊन ग्रामसभेचे आयोजन करून महत्त्व समजून दिले तर फायदेशीर ठरेल
सरपणा ऐवजी ऐवजी गोबर गॅसची निर्मिती केली तर जंगलतोड कमी होईल. ज्या प्रमाणात जंगल तोड होते त्या प्रमाणात झाडे लावण्याचे प्रमाण अल्प आहे असे दिसते

बऱ्याचदा मौल्यवान झाडे तोडून अवैध मार्गाने या झाडांची तस्करी केली जाते याकरिता जंगलतोड प्रामुख्याने केली यांस  एकदम आळा घालणे शक्य होणार नाही परंतु काही उपाययोजना केल्यास हे शक्य होईल असे दिसते. शासन प्रयत्नशील आहे परंतु शासन कुठवर  उपाययोजना करणार याकरिता जनमाणसांमध्ये जागृती होणे गरजेचे असे दिसते.

आपल्या घरी नूतन बालकाचा जन्म झाला असेल तर त्याचे नावाने एखादे रोपटे लावण्यास काहीच हरकत नाही या उपाययोजनांमुळे नक्कीच वृक्ष संगोपनात चालना मिळेल मुलांचे वाढदिवस आपण केक कापून थाटामाटात साजरे करतो याबरोबर त्यादिवशी एखादे रोपटे लावले तर फायदेशीर ठरेल शिवाय मुलांना यातून वृक्ष संगोपनाची शिकवण मिळेल

लग्नाचा वाढदिवस, मुलांचा वाढदिवस अशा प्रसंगी आपण एकमेकांना भेटवस्तू देत असतो याच बरोबर एखादे रोपटे भेट मधून देण्याचा प्रघात सुरू करण्यास काहीच हरकत नाही यामुळे सुद्धा वृक्ष संगोपन व वाढीस चालना मिळेल तसेच वृक%

10 Comments

  1. Warsha

    खूप छान. काळाची गरज आहे
    ऑक्सिजन अभावी किती जीव गमवावे लागले.

Comments are closed.

error: Content is protected !!