जीवन म्हणजे नेमकं काय असत हो? लेख
 जीवन म्हणजे नेमकं काय असत हो? लेख

 जीवन म्हणजे नेमकं काय असत हो? लेख

जीवन म्हणजे नेमकं काय असत हो? लेख

नेहमीचाच तुम्हाला आणि मला पडणारा प्रश्न   प्रश्न एकच छोटासाच पण अनेक उत्तरं असलेला आपल्या आवाक्यात ही नसणारी व्याप्ती असणारा .
वेगवेगळ्या जाणकारांचे , लेखकांचे आणि आपल्या सारख्या सामान्य माणसांची निरनिराळी मत असतात यावर.
जीवनाकडे बघण्याचा प्रत्येकांचा दृष्टिकोनही वेगळाच असतो. सर्वजण खरतरं स्वच्छंदी, स्वतंत्र, मनाला वाटेल तसचं जीवन जगण्याचा आणि तो आनंद अनुभवायच्या प्रयत्नात असतात .
पण खरचं येतं का सर्वांच्या वाट्याला हे असं स्वप्नवतं जगणं ? विचार केलाय कधी ? या प्रश्नाने  मला पुरेपूर ग्रासलय.
नाही मी विचारच नाही केला या गोष्टीचा कारण आपली मानसिकता इतकी स्वकेंद्री झालीये की दुसऱ्या कुणाच्या जीवना बद्दल विशेषतः अडचणी विषयी विचार करायला आपलं मन मूळी तयार नसतं .
आपलचं दुःख कुरवाळत बसण्यात आपल्याला धन्यता वाटते पण आपल्या पेक्षा ही  दुःखीकष्टी लोक या जगात आहेत आणि तरीदेखील आपल्यापेक्षा जीवनाचा आनंद अगदी मजेत अनुभवताहेत .
कारण त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी सकारात्मक असते म्हणतातच ना “जशी दृष्टी तशी सृष्टी”.
आपणही अगदी त्यांच्या दृष्टीने नाही बघता आले तरी आपले सुंदर डोळे खडखडीतपणे उघडे ठेवून या जीवनाचा अजून स्वैरपणे आस्वाद घेऊ शकतो.
आपण आपल्यात असलेला आनंद सगळीकडे उगाच शोधत असतो त्यासाठी आपण आयुष्यभर लपंडाव खेळत असतो तोही स्वतःशीच.
जगण्यातला आनंद आपल्यातच लपलेला असतो फक्त तो शोधण्यासाठी हवी ती आनंदी किंवा प्रसन्न दृष्टी जिच्या जोरावर आपण अगदी आपल्या अंतरंगी दडलेला आनंद सुद्धा शोधू शकतो .
जीवन खरंच खूप सुंदर, खूप निर्मळ, नितळ अगदी खळाळणाऱ्या पाण्यासारखं  सगळ्यांसाठी स्वत्व विसरून सतत वाहणारं प्रत्येकानी यातून ओंजळभर पाणी जरी घेतलं तरी पुरेसं आहे .
रोजच्याच दिवसात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी  खूप छोट्या असतात आपल्या लेखी ज्याची किंमत शून्य असते अगदी अशा छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला कधीकधी खूप आनंदी करून जातात.
आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे आपला आनंद ती नेहमी जपली की आपल्याला कधीच आनंदाची उणीव भासणार नाही.मस्त संगीत ,मनाला वेड लावणार गाणं असो की आपल्या आवडीच एखाद काव्य किंवा पुस्तक ,छानशी फुलांची बाग, आपल्या मित्रमैत्रिणींचा एखादा ग्रुप, कुणाचेतरी चारच प्रेमाचे शब्द, आपल्या घरातील मनीमाऊने किंवा मोती ने आपल्याकडे पाहून  हलवलेली शेपटी, पावसाची पहिली सर ,ओल्या मातीचा गंध ,अंगावर थरार आणणारा तुफान गार वारा अशा असंख्य गोष्टी ज्या की आपल्याला विकत घेण्याची गरज नाहीये या अशाच गोष्टी आपल्याला मनोमन सुखावून जातात .
पण मला वाटतं या साऱ्या गोष्टी आपण आपल्या चकचकीत वाटणाऱ्या पण कृत्रिम जीवनशैलीत हरवून बसलोय .
आणि मग शोधतोय सुख तेही कशात तर अघोरी अशा पाश्चात्य जीवन-शैलीचे अनुकरण करून जे सर्व परीने घातक आहे हे कळत असून सुद्धा त्याच्या आहारी जातो. कारण काय तर आपल्याला आनंद हवा असतो  स्वच्छंद असल्याचा अनुभव म्हणण्यापेक्षा आपल्याला भासच होतो .
अशावेळी मग व्यसन आणि अजून बरंच काही वाईट सवयींचे आपण आहारी जातोय आणि स्वतः मध्ये असलेल्या अंतरंगातील सुंदरशा आनंदाचा एक प्रकारे अपमानच करतोय.
मग कसा मिळेल तो आपल्याला, उलट या सर्वांमध्ये आपण निराशेच्या गर्तेत खोलवर रुतत जातो आणि तेव्हा सर्वच हरवून बसतो.
यावर साधा उपाय म्हणजे स्वतः मधली एकदम आतल्या कप्प्यातील सुगंधी अत्तराच्या कुपीत असलेली आपली नाजूक पण अगदी धडाडीची दृष्टी उघडून आपल्यातील आत्मशक्ती जागृत केली पाहिजे जेणेकरून आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण एकदम बदलेल .
मग पहा काय होतं ते जीवनाचा नूरच बदलतो आणि सुगंधी फुलांचा, अलगद सरींचा वर्षाव होतो आणि आपण अगदी त्यात न्हाऊन निघतो.
जीवन काय असतं ?कसं असतं? हे असंच असतं, हे असंच असतं तुमच्या माझ्या प्रश्नाचे उत्तर .
तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण नक्की कसा आहे  हे मला जाणून घ्यायला आवडेल कमेंट्स मध्ये मला कळवू शकता म्हणजे माझ्याही दृष्टिकोनात थोडा बदल घडेल .
धन्यवाद!
: प्रतिमा कुलकर्णी – जोशी.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!