बोलके चित्र-स्मिता औरंगाबादकर
बोलके चित्र-स्मिता औरंगाबादकर

बोलके चित्र-स्मिता औरंगाबादकर

 भास क्षितिजापलिकडले.

 

बोलके चित्र-स्मिता औरंगाबादकर

नभ आणि धरतीचा संगम कधी झालाच नाही.
नभ…निळेशार महासागरासारखे अनंत, अफाट दुरपर्यत चारही दिशांनी व्यापलेले.
तसे नभाचा अंत शोधणे कठीणच..!

क्षितिजापलीकडे बघितले की… आपल्याला भास होतो की,
नभ आणि धरती कुठेतरी दूरवर… अनंत अंतरावर भेटत आहेत.जेव्हा…
निळ्याभोर अथांग नभात काळे भोर ढग दाटून गर्दी करतात.
रविच्या प्रखर किरणांची वाट अडवली जाते.
संपूर्ण नभ अंधारमय होते.
जसे….
पहाटेच्या प्रहरी पक्ष्यांचा थवा नभात शिस्तीने स्वच्छंद विहार करतांना/ उडतांना दिसतो.
तसेच…
ढगांना पंख नसतांनाही…
अथांग चौफेर पसरलेल्या नभांत ढग एकाच दिशेने शिस्तीत धावतानां दिसतात…
कुठेतरी दूरवर नभ धरतीवर उतरल्याचा भास होतो.
तेव्हा…!
कोसळण्यासाठी ढगांना
फक्त आणि फक्त….
धरतीचीच आठवण येते
आणि…..
कोसळत्या सरी धो धो कोसळून नभ मोकळे होते…
(अतृप्त तहानलेली धरती कोसळलेल्या सरीमुळे तृप्त होतेही.)
नभ निळेभोर चक्क दिसू लागते.
रविकिरणांची वाट मोकळी होते.
नयनी सुखावणारी सृष्टी दृष्याची अनुभूति मिळते.
पाखरांना गगनभरारी घेण्यासाठी उद्युक्त करणारे…
अनंत चौफेर व्यापलेले….
“नयनी शीतलतेची सुखद अनुभूति देणारी वातावरण निर्मिती होते”.
खरे पाहता….
धरती आणि नभ दोघेही जीवन देणारे.
पण दोघेही स्वतःच्या जीवनात अतृप्तच.
तसा नभाचा अंत लागणे कठीणच.
पण…
धरतीचे मिलन तर तरीही झालेच नव्हते!.
कारण “क्षितिज हा फक्त भास आहे”.
दूरवर पसरलेले क्षितिज फक्त कल्पना आहे आणि नभ, धरतीची भेट हा भास आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात देखील,
“डोळ्यांना जी दिसते ती प्रत्येक गोष्ट खरी असतेच असे नाही”.
“हा संदेश धरती आणि नभ आपल्याला नेहमीच देत असतात”.
“सृष्टीच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील एक दुर्मिळ सत्य कथितही होतेच की”.

 

भंगलेली मुर्ती बोलके चित्र

सकाळी मैत्रिणी सोबत देव-दर्शनासाठी मंदिरात गेले.

चप्पल बाहेर सोडली आणि घाईघाईत च मंदिरात प्रवेश केला. तिथे काही भक्तगण एका मुर्तीला उचलून बाहेर नेत होते.
म्हणतात ना,
आपल्या आजुबाजूला अनेक छोट्या-मोठ्या घटना घडत असतात…पण त्यातील एखाद्याच घटनेकडे आपले लक्ष केंद्रित होते आणि तिच घटना आपल्या विचारशक्तीला आव्हान ही देते आणि आपण घडणार्या घटनेवर आपसुकच विचारही करू लागतो.

आपल्या विचारशक्तीनुसार अर्थ ही जोडण्याचा अर्थपुर्ण प्रयत्न करीत असतो.
माझ्या मनाने मला लगेचच प्रश्न विचारला,

“मंदिरातील मुर्ती बाहेर नेण्याचे काय कारण असावे?”.

सहजच मुर्ती वरून नजर फिरवली तेव्हा माझ्या लक्षात आले नाही पण भक्तगणांनी मुर्ती जेव्हा प्रवेशद्वाराजवळ उभी केली तेव्हा आपसुकच उत्सुकतेपोटि मुर्ती कडे माझे पाऊल वळले.

मी मुर्ती समोर उभी राहून निरीक्षण करू लागले.
“दगड डोक्याला लागला तर निश्चित च डोक्याला ईजा होते…पण मुर्ती काराने जर त्याच दगडावर कोरीव काम केले तर लोक डोक टेकवतात”.

“दगड एकच होता पण क्रिया घडण्यापूर्वीच महत्त्व आणि क्रिया घडल्या नंतर चे महत्त्व दोन्ही मधे जमीन-आसमान चा फरक होता”.
तसे काही कलाकृती स्वतःच आपल्या विचारांना प्रवाहीतही करतात.
जणूकाही ही मुर्ती मला काही सांगत होती की,

“तुमच्या पद-प्रतिष्ठेला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे”.

डोक्यामधे विचारचक्र सुरू असतानांच मुर्तीचा कान भंगल्याचे माझ्या लक्षात आले.

“अरेच्चा मुर्तीचा कान भंगल्यामुळे तिला प्रवेशद्वाराजवळ जागा मिळाली तर”.
विचलित झाले मन…मुर्तीला भंगलेले पाहून… डोळ्यात अश्रू आलेत माझ्या … ज्या मुर्तीची रोज थाटात पुजा होत होती….
“त्या मुर्तीला भंगल्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जागा मिळाली होती”.

स्मिता औरंगाबादकर .

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

https://marathi.shabdaparna.in/प्रेमकथा

 

7 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!