कातळ वाट-बोलके चित्र
एक चित्र / फोटो प्रदर्शन पहात असताना, ह्या फोटो समोर थबकायला झाले….
तसे पाहिले तर काय आहे फोटो मधे….?समुद्राकडे जाणारी एक चिंचोळी वाट.
पण फोटोग्राफरला फक्त हेच दिसले का?
कलाकार एखादी कलाकृती जेव्हा तयार करतो, आणि बघणारे ती कलाकृती, स्वतःच्या आयुष्याशी, भावभावनांशी जोडू पहातात. आणि ती जितकी relate होईल, तितकी त्यांना आवडू लागते.
ह्या फोटो बाबत ही माझे तसेच काहीसे झाले.
मनात एकदम काही विचार चमकून गेले
कदाचित ही चिंचोळी वाट म्हणजे एखादा कलाकार, खेळाडू, विद्यार्थी, उद्योजक घेत असलेले कष्ट, मेहनत दर्शवते, निसरडेपणातून त्याला ध्येयापासून विचलित करणारी ईतर अनेक प्रलोभने अथवा टिका टोमणे, इत्यादी प्रतित होते,
आणि ह्या सगळ्यावर मात करून पुढे गेल्यावर समोर असणारा ocean of opportunities…..संधिंचा अथांग सागर.
असे काहीसे मनात येते.
किंवा ह्या अथांग सागर जर आपण, नीट तोल सावरून, सावधपणे चाललो तर पुढील काळात आपण उज्वल भविष्याचा आनंद घेऊ शकू अन्यथा खोल गर्तेत जाऊन पडू आणि एकूण परिस्थितीच्या, समाजाच्या, क्रूर वास्तवाच्या लाटा आपलं आयुष्य गिळंकृत करतील.
ह्या फोटेकडे पाहिल्यावर माझ्या मनात असे विचार आले, आणि तो फोटो हा माझे eye opener ठरला.
तुम्हाला कुणाला,जर काही जाणवत असेल तर जरूर सांगा….
प्रवास ज्ञानाचा-बोलके चित्र
असेच नेटवर काही चित्रे पहात असताना, हे चित्र डोळ्यासमोरून गेले. तशीच पुढे जात होते आणि अचानक मला त्या चित्रात काहीतरी जाणवले… पटापट मागे येत मी परत त्या चित्रापाशी थांबून नीट बघीतले..अन्
एक वेगळाच अर्थ मला जाणवला, माहीती. नाही की खरच त्या चित्रकाराला तसेच काही सांगायचे आहे का?
इथे एक उघडे पुस्तक दिसते आहे. ते एक रूपक वाटते…ज्ञानाचे…आत्मज्ञान चे, ज्यावेळेस हे ज्ञान, आत्मज्ञान, आत्मभान…एखाद्याला होते त्या वेळेस त्याचा प्रवास, वाटचाल, ही त्याच्या धेयाकडे, सूरू होते….हे त्या सायकल वरून निघालेल्या माणसाच्या रूपात दिसते….जाणवते.
बर हा प्रवास संपणारा आहे का?….नाही…न संपणाऱ्या वाटे मध्ये दाखवले आहे. ते जे प्रकाशमान बिंब दिसते…त्याचा अर्थ…असा की…हे आत्मज्ञान, आत्मभान घेऊन त्याचा न संपणारा प्रवास सुरू होतो पण इतरांसाठी मात्र ते एक उदाहरण, एक benchmark, एक ध्येय बनून रहातो.
सामान्य माणूस ते एक असामान्य idol हा प्रवास फक्त ज्ञाना मूळेच होतो.
इथे ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी कीडा नाही, तर कोणत्याही क्षेत्रात, आपल्यातल्या स्व ची जाणीव होणे….आणि त्यासाठी घेतलेली मेहनत,कष्ट हे आहेत….
Books gives you a wings …
ह्यामुळेच मला हे चित्र एक मोठी फ्रेम करून घरात लावावे असे वाटते….
वैशाली जोशी ..खोडवे
https://marathi.shabdaparna.











Mast 🌹🌹🌹