किनारा-बोलके चित्र
समुद्राशी बरोबरी करणारे नदी चे असे अथांग पात्र मनाला थक्क करते.
जसे ट्रॅफिक सिग्नल वर देश कळतो,तसेच नदी किनारी ही देश कळतो, असे मला वाटते
अथांग पात्रात दुथडी भरून वहाणारी नदी…..स्वच्छ किनारा…नितळ पाणी…..असा नदी किनारा, नक्कीच देशाची सुबत्ता, समृद्धी आणि सामाजिक शिस्त दाखवतो.
नदी बाबत, तसे पाहीले / बघितले तर कवी कल्पना खूप आहेत. पण मी त्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करते आहे.
जो रोप वे इथे दिसतो, ते एकीकडे तांत्रिक प्रगती दाखवते, तर दुसरीकडे पर्यटन व्यवसायाची भरभराट दाखवते.नदी आपल्या सांस्कृतिक कल्पनांशी जोडलेली असतेच. पण सगळ्याच नद्यांबाबत असे म्हणता येत नाही. आगदी आपल्या पुण्याचेच उदाहरण घेतले, तर मुठे काठी वसलेले पुणे….अशी पुण्याची ओळख कधीच नव्हती. पुण्याची सांस्कृतिक नाळ मुठे शी जोडलेली जाणवत नाही.
म्हणजे,पुणतांबे हे गाव गोदावरी तीरी आहे, जर नदीला पूर आला तर तिथल्या वाड्यांच्या जोत्या पर्यंत पाणी येते, त्या वेळेस, तेथील बरीच कुटूंबे उंबऱ्या जवळ, खण आणि नारळ ठेवतात, कारण ते नदी माहेरी आली असे मानतात, आणि तिची ओटी भरतात. असे सांस्कृतिक नाते पुणेकरांचे मुठे शी आहे असे मला तरी वाटत नाही.
ब्रह्मपूत्रा नदीला तर आसाम चे अश्रू म्हणतात. कारण तिचे पात्र सारखे बदलत असते, आणि त्यामुळे तेथील रहिवाशांची अतोनात जिवित वा वित्त हानी होते.
आणखी थोडा विचार केला तर असे जाणवते की आपण ज्या विजेवर सर्वतोपरी अवलंबून आहोत, त्यातील जवळपास ७०% विज ही जलविद्युत प्रकल्पातून तयार होते.
म्हणजे जल हे जीवन आहे ….हे वेगळ्या अर्था ने ही सिद्ध होते.
नद्यांवरून प्रदेश, गावे ओळखली जातात. पण ही पद्धत generalized वाटत नाही. जसे पाच नद्यांचा प्रदेश :- पंजाब,(रावी, चिनाब,बियास झेलम,आणि सतलज) पण आपल्या आसपास किती नद्या आहेत…मुळा,मुठा,ईंद्रायणी, पवना, भीमा….मग आपले पुणे पाच नद्यांचा प्रदेश म्हणून का नाही ओळखला जात..?..असो…
आणखीन एक गोष्ट सहज मनात आली…की रामायण आणि महाभारत..ही इतकी मोठी खंडकाव्ये, पण त्यात नद्यांबाबत, गोष्टी आख्यायिका नगण्यच.
…..शरयू तीरी अयोध्या मनू निर्मित नगरी…..ह्या नंतर नदीचा उल्लेख शोधावाच लागतो….
सहज हा ब्रह्मपूत्रा नदी चा फोटो पहाताना माझ्या मनात जे विचार आले ते मांडले….पण काहीही असो….खळाळून वहाणारी नदी पाहिली की मन प्रसन्न होते.
वैशाली जोशी ..खोडवे..
https://marathi.shabdaparna.











नदी आणि तिचा किनारा….बरेच काही सांगून जाते.
छान लिखाण .
अप्रतिम 👌
खुप छान कल्पना, नदी बाबत हा एक वेगळाच दृष्टीकोन मांडला.
नदी किनाऱ्यावरून, देशाची सामाजिक शिस्त लक्षात घेण्याची कल्पना एकदम out of the box, पण अतीशय खरी आहे
छान चित्र वर्णन
सुंदरच
Superb perspective…nice visual perception …..Nice article👌🏻👍🏻
मस्तच
छान
नदीचे एका वेगळ्या आणि सुंदर प्रकारे शब्दांकन