कंदिल-एक प्रकाशवाट-बोलके चित्र
वैशाली जोशी खोडवे
Picture speaks a thousand words.
चित्र फक्त चित्रच असतात का? खचितच नाही. चित्राकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. जसे बघू तसे चित्र आपल्याशी बोलतात.
असेच एक बोलके चित्र
कंदिल-एक प्रकाशवाट
मागच्या आठवड्यात, नागपूरला माहेरी आले होते. चांगला दोन आठवडे मुक्काम होता एक दिवस संध्याकाळी उशिरा लाईट गेले.म्हणून माझ्या वहिनीने कंदिल लावला त्याचा मंद असा प्रकाश दिवाणखान्यात पसरला.
आमच्या गप्पा चालूच होत्या. पण मी मात्र त्या कंदिलातच गुरफटली गेले.
लाईट होते त्यावेळेस बाहेर कसा लख्ख ऊजेड होता,झगमगाट होता. पण त्या झगमगाटात एक प्रकारचा कोलाहल दाटला होता. शरीराला दृष्टीतेच्या अर्थाने ते योग्य होते. पण मनात अशांतता होती. एरवी ती जाणवलीही नसती,
पण ज्यावेळेस झगमगाट जाऊन
मंद तेवणारी वात समोर येते त्यावेळेस तो कोलाहल नक्कीच जाणवतो. अशा मंद तेवणाऱ्या वातीच्या उजेडात आपण खरच अंतर्मुख होतो. बाहेरची दृष्टिता कमी झाली तरी मनात लख्ख उजेड पडतो.
म्हणूनच की काय, ध्यान धारणेच्या प्रकारामधे बिंब त्राटक (समईच्या वातीवर मन एकाग्र करणे) हा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे.
कंदिलला आकाश दिवा सुध्दा संबोधले जाते कारण सुर्यास्त झाल्यावर स्रुष्टीवर काळोख पसरतो ह्याच काळोखावर प्रकाशाचा विजय कंदिलाच्या आगमनाने होते सृष्टी वरील प्रत्येक वस्तू कंदिलाच्या टिमटिमत्या प्रकाशात प्रकाशमय होऊन जिवंत झाल्याचा आभास होतो.
समुद्र किनारपट्टीवर कंदिलाचे स्वतः चे अद्भुत महत्त्व आहे. प्राचीन काळापासून कोळी मासेमारीसाठी नावेत समुद्रामधे दूर दूर जातात तेव्हा समुद्राच्या विस्तृत पात्रात सूर्यास्तानंतर प्रकाशाचे माध्यम फक्त कंदिल च असतो..
रवींद्रनाथ टागोरांनी तर अशा मंद तेवणाऱ्या वातीचा एक वेगळाच स्वभाव समोर आणला आहे.
सूर्य अस्ताला जाताना, चिंताग्रस्त होतो. विचारतो, माझ्या नंतर कोण या चराचर सृष्टीला प्रकाश देईल? सगळीकडे शांतता पसरते. पण एक पणती धिटाई ने पुढे होते. म्हणते मी देईन उजेड, प्रयत्न तर नक्कीच करेन.
सगळी सृष्टी हसते..म्हणते तू तर एवढीशी कशी पूरी पडणार?
पणती म्हणते असेन मी एवढीशी, नाही देऊ शकणार प्रकाश सगळ्या सृष्टीला….पण प्रकाशाने अंधार नाहीसा होतो यावर मी सगळ्या जगाचा विश्वास (पून्हा सुर्य उगवेपर्येंत) कायम नक्कीच ठेऊ शकेन.
रूपक समजून घेतले तर किती मोठा अर्थ दडला आहे एका मंद तेवणाऱ्या वाती मधे….
https://marathi.shabdaparna.











छान
छान.. अर्थपूर्ण लिखाण
Nice artical…. Vaishali
Subject of the artical is alike ur personality… As u r rightly like a candle in the darkness 👍😊keep writing
Chan
अप्रतिम
सुंदर
खूप विस्तृत आणि परिपूर्ण लेख ! वैशाली खूप आवडला . जवळपास ९ वी पर्यंत कंदिलाच्या साथीनं केलेला अभ्यास बालपणात घेऊन गेला ! अभिनंदन ! अशीच लिहिती रहा !