या जगण्यावर शतदा प्रेम करावे
आजकाल डिप्रेशन हा शब्द वारवांर ऐकू येतो.
काय असेल हे?
प्रियजणांचा मृत्यू
मनाचा कमकुवतपणा
अपेक्षाभंग
नैराश्य
प्रेमात नकार
आई वडिलांनी लादलेल ओझ
स्पर्धेच्या जगात न टिकून राहण्याची भीती
आधीच्या काळात नसेल का हे
आताच हे सर्व कसे काय फोफावले?
स्पर्धा …समोर जाण्याची धडपड आधीही असेलच
पण कोणी डिप्रेशनमध्ये गेलेले नाही आठवत
मान्य आहे , हे स्पर्धेचे युग आहे.शाळेमध्ये नाव टाकले की स्पर्धा सुरू होते.आपआपल्या परीने समोर जाण्याची धडपड सुरू होते ..आणी इथेच सुरूवात होते
लहान वयात त्याच्यांवर अपेक्षेचे ओझे टाकले जाते
उदाहरण दिले जातात.
प्रत्येक वेळेला मार्कांची तुलना केली जाते.त्यांच कोवळे मन…कुठेतरी दुखावले जात असेलच
प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे हा अट्टाहास.कुठेच
न केलेली तडजोड आयुष्याला स्थैर्य देत नाही
कधी..कधी ते इतके भरकटत जाते की कळायला मार्ग नसतो.
खूप लोकांना यातून निघता येते ….काही प्रयत्न करतात
आणि काही डिप्रेशन मध्ये जातात.जे प्रयत्न करतात ते
निघतातही
डाँक्टर..आई वडिल..जवळचे मित्र ..सर्व प्रयत्न करत असतात.मन चांगल्या गोष्टीत रमवा..स्वतःला चांगल्या कामात गुंतलेले ठेवा , या पलिकडे कोण किती सांगणार ?
जवळील प्रत्येक जण मानसिक , भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करत असतो.आणि एवढे करूनही त्या व्यक्तीला कुणाचाही आधार नको असतो…तेव्हा हेच वाटते की हे डिप्रेशन इतके भयानक असते का?तसे बघितले तर आसपास इतके जिवापाड प्रेम करणारे लोक असताना एवढे एकाकीपण कसे येत असेल ?
आयुष्यात खुप काही गोष्टी न कळत होत राहतात
कुणाला सुख..आंनद नको असतो .त्यासाठीच इतकी धावपळ करतो ना आपण .पण नियतीला काही गोष्टी
मान्य नसतात.अचानक असे काही घडून जाते कि आपण बघण्यापलीकडे काहीच करू शकत नाही.मग अशावेळी लोक हताश होतात.काहीच सुचत नाही , जगामध्ये फक्त मीच दुःखी आहे असे वाटायला लागते.
खरे म्हणजे जगामध्ये किती तरी गोष्टी सौदंर्याने ओतप्रोत आहेत.फक्त आपली दृष्टी तिथे जात नाही.लहान , लहान
गोष्टीमध्ये आंनद शोधायचा असतो.आयुष्यात कधी सुखाचे तर कधी दुःखाचे क्षण येनारच.सुखाने लोक लगेचच हुरळुन जातात , आणि दुःखात अगदीच हताश होतात .आणि मग इथेच डिप्रेशनची सुरूवात होत असेल
खूप काही गोष्टी हसण्यावरी नेल्या कि त्या सहज होऊन जातात.आयुष्य कस हसत , खेळत जगायचे .मनापासून आंनदी राहणे महत्त्वाचे असते नाहीतर फक्त मुखवटा धारण करून हसायचे , मी किती सुखी आहे हे दाखवते राहायचे.
आंनद हा आतून व्यक्त झाला पाहिजे .छोटया ..छोट्या गोष्टी ज्यांना करायच्या राहून गेल्या होत्या , त्या करायला कधी वेळच मिळाला नव्हता त्या गोष्टी सुध्दा आपल्याला खूप काही आंनद देऊन जातात.स्वतःच्याच हातामध्येच खूप काही गोष्टी असतात.कसे जगायचे हे तर आपण आपले ठरवूच शकतो .जीवनात मित्रांना स्थान असायलाच पाहिजे , दुःखात , संकटात…अडचणीत ते आपल्याला मोलाची साथ देतात , धीर देतात.तेच एक हक्काच ठिकाण असते जिथे आपण आपले सुख , दुःख व्यक्त करु शकतो ,मन मनसोक्त मोकळे करण्याची हक्काची जागा असते ती.
जीवनात फक्त आणि फक्त आनंद शोधायला शिकायचे मग बघा निराश झालेला आंनद कसा सहज आयुष्यात येऊन डोकावतो.आणि मग सहजच वाटू लागते.
रंगाचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा रुतुचे सहा सोहळे , येथे भान हरावे
या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे.









