स्पर्श-लेख
स्पर्श-लेख

स्पर्श-लेख

स्पर्श-लेख
वेदा चे सकाळीच  आज …क्षुल्लक कारणावरून समीरशी ..वाजले होते ….लग्न होऊन  नुकताच महिना झाला होता …अन्…त्यात हे भांडण ….आईची आठवण येऊन दिवसभर  तिला खुप रडायला  येत होते …..असाच …दिवस .कंटाळवाणा गेला होता  ..उदास  होउन ..वेदा अशीच बाल्कनीत ऊभी होती …..अचानक .. तिला ..एक स्पर्श जाणवला …अन् ..पाठोपाठ सुगंधही ….समीर तिच्या केसांत …गजरा माळत होता ….त्याच्या त्या ..गजऱ्याच्या .स्पर्शाने ..तिने एकदम ..वळून समीरकडे बघितले ..आणि दोघेही ..एकदम ..जोरात हसायला लागले …..दिवसभराची उदासी ….एका स्पर्शाने ..कुठल्या कुठे पळून गेली होती .
किशोर ला कसे आवरावे ..ते आजुबाजूच्यांना  कळत नव्हते ..छोट्याशा accident चे  निमित्त होऊन ..ते आज सकाळीच हे जग … सोडून निघुन  गेले होते …किशोर   किती तरी वेळी …त्यांचा हात हातात घेऊन बसला होता …त्यांचा शेवटचा स्पर्श ..अनुभवता …त्यांचे आधीचे  …कितीतरी ..प्रेमळ स्पर्शांच्या  आठवणीत ..बुडून गेला होता …..सायकल  शिकवताना …त्यांचा तो आश्वासक स्पर्श …. वर्गात चांगले  मार्कस ..मिळवल्यावर ..  पाठीवर पडलेल्या  थापेचा  कौतुकाचा स्पर्श … …
आज ….हे सगळे ..आठवून …किशोर ..अजूनच ..उदास झाला ….वडिलांचा हक्काचा,मायेचा स्पर्श ..त्याने आज नेहमीसाठी गमावला होता ….
 स्पृहा सकाळपासून  वेदनेने तळमळत होती …. नववा महिना लागला होता आणि दिवस भरत आल्या मुळे …सकाळीच तिला दवाखान्यात अँडमीट केले होते …
जेव्हा नर्सने ..दुपट्यात …गुंडाळलेले बाळ ..तिच्या जवळ आणुन ठेवले …..बाळाचा तो पहिला स्पर्श …जेव्हा तिने अनुभवला …..सगळ्या वेदनेचा ..विसर पाडणारा … शब्दांत कधीच व्यक्त न करता येणारा …..स्पर्श …..
स्पृहाला कळेचना …आपल्या मनात …नेमक्या …कुठल्या भावना …उचंबळून आल्यात.ते ….
जगातील सर्वात सुंदर स्पर्श ….
मायेचा …मातृत्वाचा   ममतेचा  …
स्पर्श …शब्दच ..किती ..जादूई वाटतो …अनेक   गोष्टी  ज्या  आपण  शब्दाने व्यक्त करु शकत नाही… त्याचे काम ..एक स्पर्श करून जातो ….
जीवनात स्पर्शाचे महत्त्व या आणि अशा अनेक प्रसंगातून व्यक्त होते.
पण त्याची जाणीव मात्र आपल्याला, तो स्पर्श आपल्या पासून दूरावल्या नंतरच होते.
एक स्पर्श, शेकडो शब्दांपेक्षा जास्त भावना व्यक्त करतो.
म्हणूनच की काय, स्पर्शा ला पाच ज्ञानेंद्रीयापैकी एक मानले जाते.
शब्दाचा सुद्धा स्पर्श असतो
स्पर्शाला असतो गंध …
हा अनुभव असा कि ..
पसरतो …मनोमनी ..
त्याचा सुगंध…..
–वैशाली जोशी खोडवे.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!