आॕगस्टचा महिना होता.पाऊस चांगलाच पडत होता. दोन दिवस झाले सुर्याच दर्शन झाले नव्हते. त्याच्या आईला दम्याचा त्रास असल्या कारणाने .तिची तब्येत ठीक नव्हती. त्यात, तिचे औषध ही संपले होते.
औषध आणण्यापूरते पैसे त्यांच्या जवळ नव्हते.पण कोणत्याही परिस्थितीत आज औषध आणणे जरुरी होते.
औषधा पूरते पैशाची जोड करून तो शहराकडे पायीच निघाला.
तसे शहर त्याच्या गावापासून जास्त दूर नव्हते. पायी चालत जाणे सहज शक्य होईल असे त्याला वाटले.अंधार पडायच्या आधी वापस येणे होईल.
पाऊस चालुच होता. त्यामुळे त्याला शहरात पोहचायला थोडासा उशीर झाला.
औषध विकत घेतली व तो परत गावाकडे निघाला. अंधार पडायच्या आधी गावाकडे पोहचायचे होते.
आभाळ काळवंडून आले होते. त्यामुळे आज लवकरच दिवस मावळतीला गेला असे वाटत होते.तरीही तो चालतच होता.
पाऊस चालू असल्या मुळे रस्त्याने पण कोणीही नव्हते .
नेहमीचा पाण्याखालील रस्ता असल्या मुळे त्याला काही वाटत नव्हते.
रात्र अमावस्येची नव्हती पण आभाळ असल्याने खूप काळोख होता.
तो चालतच होता.
गावापासून थोड दुर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या जवळ आल्यावर थोड बरे वाटले, कारण मंदिरातून घंटा वाजल्याचा आवाज येत होता.
त्याला वाटले मंदिरात कोणी आपल्या सारखाच वाटसरू असेल. गावापर्यंत जायला सोबत तर होईल, म्हणून तो मंदिरात गेला . मंदिरात खूप अंधार होता. पण घंटा वाजतच होती. त्याने आवाज दिला ,
कोण आहे का ?
प्रती उत्तर आलं नाही. त्याला वाटले आपला आवाज गेला नसेल. घंटेच्या आवाजामुळे.
त्याने हाताने पूर्ण मंदिर चाचपडून पाहीले. महादेवाच्या पिंडी शिवाय त्यांच्या हाताला कोणीही लागले नाही.कारण तीथे कोणीही नव्हते. घंटा मात्र वाजतच होती.
घंटा वाऱ्याने वाजत असेल म्हणावे तर , वारा हा अजिबात नव्हता आणि,घंटा खूप वजनदार होती.
आता मात्र तो खूप घाबरला.
त्याला खूप भिती वाटत होती . त्याच्या अंगावर भितीने काटा आला.कारण , त्याला आईनं सांगितलेली गोष्ट आठवली.
त्याच्या गावात एक माणूस होता. तो महादेवाचा भक्त होता. रोज महादेवाची पूजा केल्याशिवाय कामाला सुरुवात करत नसे. एकदा पूजेला जात असतांना त्याचा अचानक मृत्यू झाला. त्यादिवशी पूजा करायची इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणून असे म्हणतात की रोज रात्री येवून तो महादेवाची पूजा करतो.
घंटेच्या आवाजामुळे तो भानावर आला.
कसाबसा तो मंदिराच्या बाहेर आला. ‘ घंटा मात्र वाजतच होती.’
त्याला भितीने काहीच सुचत नव्हते. तो खूप घाबरला होता. धड चालता ही येत नव्हते. तो तिथून जो पळत सुटला , जीव मुठीत घेऊन पळत होता. अंधार , पाऊस कशाचेही भान नव्हते. फक्त त्याला घर गाठायचे होते.
शेवटी घर दिसले . दारावरची कडी वाजवली आणि घरात गेला. तो भितीने थरथरत होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता.
घडला प्रकार त्याने आईला सांगितला .
तेव्हा पासून ठरवले. चालत शहरात कधी ही जायचं नाही.
ज्योती कुलकर्णी ✍🏻
नांदेड










अद्भुत शक्ती असते का ?
कथा उत्तम